
Bangladesh News Sheikh Hasina Sentenced to Death, But No Execution Chamber
Sheikh Hasina News in Marathi : ढाका : बांगलादेशच्या (Bangladesh) आंतरराष्ट्रीय गुन्हे न्याधिकरणाने मानवेविरुद्ध गुन्ह्यांच्या आरोपाखाली पदच्युत पंतप्रधान शेख हसीना (Sheikh Hasina) यांना मृत्यूदंड सुनावला आहे. यामुळे बांगलादेशात मोठी खळबळ उडाली आहे. हसीना यांच्या अवामी लीग पक्षाने या निर्णयाविरोधात संप पुकारला आहे. पण या घडामोडी दरम्यान एक गोंधळ उडवणारी बातमी समोर आली आहे. बांगलादेशच्या माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, सरकारकडे महिलांसाठी फाशीची जागाच नाही.
‘शिरच्छेद की गोळी’? बांगलादेशात मृत्यूची शिक्षा नेमकी कशी दिली जाते? जाणून कायद्याचे स्पष्टीकरण
हो, स्थानिक कालेर कथा वृत्तापत्राने याबाबत एक वृत्त दिले आहे. या वृत्तात सांगण्यात आले आहे की, १९७१ पासून बांगलादेसाच १०० हून अधिक महिलांना मृत्यूदंड सुनावण्यात आला आहे. पण आतापर्यंत एकाही महिलेला फाशी देण्यात आलेली नाही. सध्या बांगलादेशच्या तुरुंगात ९४ महिला आहे, ज्यांना अद्याप त्यांची शिक्षा देण्यात आलेली नाही. या अहवालानुसार, बांगलादेशात गाझीपूरमध्ये महिलांसाठी स्वतंत्र तुरुंग आहे. पण या ठिकाणी फाशी देण्याची जागा नाही.
आता या तुरुंगात फाशी देण्यासाठी जागा का नाही असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर यामागचे कारण म्हणजे माजी कारागृह महानिरीक्षक ब्रिगेडियर झाकीर हुसेन यांनी सांगितले की, बांगलादेशात आतापर्यंत कोणत्याही महिलेला फाशी देण्यात आलेली नाही. कारण बांगलादेशात बहुतेक मृत्यूदंडाची शिक्षा राष्ट्रपतींपर्यंत पोहोचते आणि जन्मठेपेत बदलली जाते. यामुळे बांगलादेशात आतापर्यंत महिलांच्या फाशीची शिक्षा जन्मठेपेत बदलली आहे.
हसीना यांना आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायाधिकरणाने (ICT) मानवतेविरुद्धच्या पाच गंभीर गुन्ह्यांसाठी दोषी ठरवून मृत्युदंडाची शिक्षा सुनावली आहे आणि त्यांना तीन दिवसांत अटक करण्याचे आदेश दिले आहेत. या खळबळजनक निकालानंतर, बांगलादेशमध्ये मृत्युदंडाच्या शिक्षेची पद्धत (शिरच्छेद, इस्लामिक कायदा, फाशी) याबद्दल लोक इंटरनेटवर जोरदार शोध घेत आहेत.
बांगलादेशच्या कायद्यानुसार मृत्युदंडाची शिक्षा ही एकमेव पद्धत आहे. बांगलादेशच्या फौजदारी कायद्यानुसार, फाशी एकमेव कायदेशीर पद्धत आहे. तुरुंग नियमावली आणि फौजदारी प्रक्रिया संहितेत हे स्पष्ट करण्यात आले आहे. देशात कुठेही शिरच्छेद करण्याची तरतूद नाही, तसेच त्यासाठी कोणतीही न्यायिक किंवा प्रशासकीय पद्धत नाही. देशाच्या संविधानानुसार इस्लाम राज्यधर्म असला तरी न्यायव्यवस्था केवळ दिवाणी आणि फौजदारी कायद्यावर आधारित निर्णय घेते. देशाची न्यायव्यवस्था धार्मिक कायद्यावर आधारित नाही.
सध्या बांग्लादेश सरकार शेख हसीना ढाकात परत आणण्याची तयारी करत आहे. हसीना सध्या भारतात राजधानी दिल्ली येथे आश्रयित आहेत. यामुळे बांगलादेशने भारताला पत्रही लिहिले आहे.
Seikh Hasina : संयुक्त राष्ट्रांचे दुटप्पी निकष! एकीकडे हसीनांच्या मृत्यूदंडावर खेद तर दुसरीकडे…
Ans: बांगलादेशच्या फौजदारी कायद्यानुसार, मृत्युदंडाची एकमेव कायदेशीर पद्धत फाशी (Hanging) आहे.
Ans: बांगलादेशात महिलांना मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली जाते, परंतु महिलांना फाशी देण्याची जागा तुरुंगात नाही. यामुळे राष्ट्रापतींच्या आदेशानुसार शिक्षेचे जन्मठेपेत बदल केले जाते.
Ans: बांगलादेशच्या संविधानात इस्लामला राज्य धर्म घोषित केले असले तरी, देशाची संपूर्ण न्यायव्यवस्था आधुनिक दिवाणी आणि फौजदारी कायद्यावर आधारित आहे, धार्मिक कायद्यावर नाही. यामुळे बांगलादेशात तातडीने मृत्यूदंड दिला जात नाही.