Seikh Hasina : संयुक्त राष्ट्रांचे दुटप्पी निकष! एकीकडे हसीनांच्या मृत्यूदंडावर खेद तर दुसरीकडे... (फोटो सौजन्य: नवराष्ट्र टीम)
UN on Sheikh Hasina Death Penalty : ढाका : बांगलादेशच्या आंतरराष्ट्रीय गुन्हे न्याधिकरणाने मानवेविरुद्ध गुन्ह्यांच्या आरोपाखाली मीज पंतप्रधान शेख हसीना (Sheikh Hasina) यांना मृत्यूदंड सुनावला आहे. यामुळे बांगलादेशात मोठी खळबळ उडाली आहे. हसीना यांच्या अवामी लीग पक्षाने या निर्णयाविरोधात संप पुकारला आहे. सध्या बांगलादेशात (Bangladesh) बिकट परिस्थिती आहे. याच वेळी संयुक्त राष्ट्राने देखील यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. यामधून संयुक्त राष्ट्रांचे दुटप्पी निकष समोर आले आहेत.
शेख हसीना नाही तर इतर नेत्यांच्याही गळ्याभोवती अडकला आहे फास; ‘या’ नेत्यांना मिळाला आहे मृत्युदंड
संयुक्त राष्ट्रांनी हसीना यांच्या मृत्यूदंडावर खेद व्यक्त केला आहे. परतु हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा असल्याचे म्हटले आहे. जिनेव्हा येथील संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार प्रवक्त्या शामदासानी यांनी यावर अधिकृत निवदेन जारी केले आहे. या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, हसीना आणि माजी गृहमंत्र्यांविरोधात न्याधिकरण्याच्या निकाल अत्यंत महत्त्वाचा आहे. पीडितांना त्रास देणाऱ्याला शिक्षा झाली पाहिजे. पण, आम्हाला या शिक्षेचाही खेद आहे, ज्या सर्व परिस्थितीत संयुक्त राष्ट्र विरोध करते. याशिवाय संयुक्त राष्ट्राचे प्रमुख अँटोनियो गुटेरेस याच्या प्रवक्त्यांनी देखील पत्रकार परिषदेत, या निवेदनावर सहमती दर्शवली आहे. तसेच कोणत्या परिस्थिती मृत्यूदंडाच्या वापराच्या विरोधात असल्याचे त्यांनी म्बटले आहे.
STORY | UN says verdict against Hasina ‘important’ step for victims but regrets death penalty The United Nations has said that the verdict against Bangladesh’s ousted prime minister Sheikh Hasina on charges of crimes against humanity is an “important moment” for the victims but… pic.twitter.com/QsRwh7vRuw — Press Trust of India (@PTI_News) November 18, 2025
हसीना यांच्यावर १५ जुलै ते १५ ऑगस्ट दरम्यान झालेल्या विद्यार्थी आंदोलनांवर पोलिस आणि सुरक्षा दलांना प्राणघातक कारवाई करण्याचे आदेशच दिल्याचा आरोप करण्यात आला होता. या आरोपात ICT ने हसीना यांना दोषी ठरवले आहे. याअंतर्गत मानवाधिकारांचे उल्लंघन केल्याच्या आणि कायद्याचा गैरवार केल्याच्या आरोपाखाली त्यांना मृत्यूदंडाची शिक्षा देण्यात आली आहे. बांगलादेशच्या आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायाधिकरणाने हसीनासह माजी गृहमंत्री असदुज्जमान खान यांनाही मृत्यूदंडाची शिक्षा दिली आहे. तसेच एका माजी पोलिस प्रमुखाला पाच वर्षांच्या तुरुंगवास सुनावला आहे.






