Bangladesh News Sheikh Hasina's Awami League Leaders Give Statements on BDR massacre
Bangladesh News Marathi : ढाका : संपूर्ण जगाचे लक्ष इराण आणि इस्रायल युद्धकडे असताना तिकडे बांगलादेशात मोठी खळबळ उडाली आहे. सध्या बांगलादेशात सत्ताधारी पक्षांमध्ये मोठ्या ङालचाली सुरु आहे. शेख हसीना यांना मोठा झटका लागला आहबे. बांगलादेशाच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या जवळच्या व्यक्तीने त्यांचा विश्वासघात केला आहे. यामुळे सध्या बांगलादेशात मोठा गोंधळ उडाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शेख हसीन यांच्या जवळच्या विश्वासू जनरल त्यांच्याविरोधात उभे राहिले आहे. सध्या बांगलादेशात पिलखानामधील हत्याकांडाची चौकशी सुरु आहे. याअंतर्गत राष्ट्रीय स्वतंत्र तापस आयोगाने (NIIC) एका पत्रकार परिषदेदरम्याम धक्कादायक खुलासे केले आहेत. NIIC ने दावा केला आहे की, अवामी लीगच्या दोन मोठ्या नेत्यांनी पिलखानामधील हत्याकांडासंदर्भारत साक्ष दिली आहे.
NIIC चे माजी बीडीआर डीजी आणि चौकशी आयोगाचे अध्यक्ष (निवृत्त) मेजर जनरल ए. एल. एम फजलुर रहमान यांनी यासंदर्भात माहिती दिली. त्यांनी सांगतिले की, अवामी लीगचे अध्यक्षीय मंडळाचे सदस्य जहांगीर कबीर नानक आणि पक्षाचे संघटन सचिव मिर्झा आझम यांनी ईमेलद्वारे शेख हसीनांविरोधात पिलखानामधील हत्याकांडासंदर्भात साक्ष दिली आहे. सध्या हे दोन्ही नेते बांगलादेशातून फरार झाले आहेत. यामुळे शेख हसीना यांचा मोठा विश्वासघात झाला आहे.
तपास अधिकाऱ्यांमनी आतापर्यंत ८ राजकीय नेत्यांची साक्ष घेतल्याचे म्हटले आहे. यामधील ३ जणांची तुरुंगात चौकशी करण्यात आली, ३ जणांनी प्रत्यक्षात साक्ष दिली आणि दोन जणांनी ईमेलद्वारे शएख हसीनांविरोधात साक्ष दिली आहे. रहमान यांच्या म्हणण्यानुसार, ५५ लष्करी अधिकाऱ्यांचे जबाब नोंदवण्यात आले आहे. यामध्ये माजी लष्कर, नौदल आणि हवाई दलाच्या प्रमुखांचा समावेश आहे. तसेच गुप्तचर संस्थांचे उच्च अधिकारी यांचाही समावेश आहे.
या प्रकरणाअंतर्गत शिक्षा झालेल्या व्यक्तींचीही चौकशी करण्यात आली आहे. यामध्ये २५ बीडीआर जवानांचाही समावेश आहे. तसेच पत्रकार, नोकरशह आणि माजी चौकशी समितीचे सदस्यांची देखील कठोर चौकशी करण्यात आली आहे. सामान्य नागरिकांचीही साक्ष नोंदवण्यात आली आहे.
आतापर्यंत जवळपास १५८ लोकांची चौकसी NIIC केली आहे. सध्या शेख हसीना मोठ्या संकटात आडकल्या आहेत. स्वत:च्याच लोकांनी विरोधात साक्ष दिल्याने त्यांचा गोंधळ उडाला आहे. NIIC ने पिलखाना हत्याकांडाबाबत कोणतीही माहिती लोकांकडे असल्यास पुढे येऊन साक्ष देण्याचे आवाहन केले आहे.