बांगलादेश नॅशनल पार्टीचे कार्यकारी अध्यक्ष तारिक रहमान (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
ढाका: सध्या बांगलादेशात राजकीय गोंधळ सुरु आहे. बांगलादेशच्या अंतरिम सरकारचे मुख्य सल्लागार मोहम्मद युनूस यांनी २०२६ च्या एप्रिलपर्यंत सार्वत्रिक निवडणुका घेण्याची घोषणा केली आहे. त्यांच्या या निर्णयाला विरोध पक्षाकडून तीव्र विरोध होत आहे. तसेच मोहम्मद युनूस यांच्याविरोधात निदर्शने देखील सुरु आहेत.
अशातच मोहम्मद युनूस यांना आणखी एक मोठा धक्का बसला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बांगलादेश नॅशनल पार्टीचे कार्यकारी अध्यक्ष तारिक रहमान पुन्हा बांगलादेशात परत येत आहे. जवळपास १७ वर्षानंतर त्यांची बांगलादेशात पुन्हा एन्ट्री होत आहे. यामुळे मोहम्मद युनूस यांचे पद धोक्यात आल्याचे म्हटले जात आहेत. यामुळे मोहम्मद युनूस यांचा चिंता वाढली आहे.
सध्या तारिक रहमान यांच्या परत येण्याने मोहम्मद युनूस यांची चिंता वाढली आहे. त्यांच्या परतण्याने मोहम्मद युनूस यांची खुर्ची तारिक यांना मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तारिक रहमान हे बांगलादेशातील झिया खालिदा यांच्या बीएनपी पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष आहेत.झिया खालिदा या त्यांच्या आई आणि झियाउर रहमान त्यांचे वडिल आहे.
यामुळे त्यांच्या परत येण्याने बीएनपी पक्षाची ताकद वाढेल आणि निवडणुकांमध्ये त्यांच्या पक्षाला बहुमत मिळण्याची देखील शक्यता आहे. बीएनपी पक्षात तारिक यांना प्रभावशाली व्यक्तीमत्व म्हणून ओळखले जाते यामुळे तारिक सत्तेत येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, नुकतेच मोहम्मद युनूस यांनी लंडन भेटी दिली होती. या भेटीच्या पार्श्वभूमीवर युनूसयांच्यानंतर बांगलादेशच्या अध्यक्षपदी तारिक रहमान यांची निवड केली जात असल्याचे म्हटले जात आहे. लंडनमध्ये देखील युनूस यांच्याविरोधत निदर्शने झाली होती. यावेळी त्यांच्या पायउताराची मागणी निदर्शकांनी केली होती. यामुळे बांगलादेशच्या अगामी निवडणुकांमध्ये बीएनपी पक्षाचे कार्यरारी अध्यक्ष तारिक रहमान उभे राहण्याची शक्यता आहे.
लंडन दौऱ्यावरुन परत आल्यापासून मोहम्मद युनूस यांना तीव्र विरोध केली जात आहे. जमात-ए-इस्लामी पक्षाने त्यांच्याविरोधात आवाज उठवण्यास सुरुवात केली आहे.
शेख हसीना २००८ मध्ये सत्तेत आल्या होत्या. त्यावेळी तारिक रहमान यांनी कुटुंबासह बांग्लादेश सोडला आणि लंडनला स्थायिक झाले. हसीना सरकारच्या काळात तारिकविरोधात अनेक गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले होते. दरम्यान हसीना यांच्या सत्तापालटानंतर, अंतरिम सरकारने तारिक यांच्यावरील सर्व खटले मागे घेतले आहे. यामुळे येत्या काळातील निवडणुकांमध्ये तारिक यांना उभे राहण्यात कोणतीही अडचण येणार नाही. परंतु यामुळे बांगलादेशात त्यांचे आगमन युनूस यांच्यासाठी धोकादायक मानले जात आहे.