
Bangladesh Violence
Osman Hadi : उस्मान हादीच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा! परदेशात पळून गेला मारेकरी? जाणून घ्या
हा तणाव अशा वेळी वाढला आहे, जेव्हा फेब्रुवारी २०२६ मध्ये बांगलादेशच्या सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत. ही परिस्थिती निवडणुकांसाठी अत्यंत धोकादायक मानली जात आहे. याच वेळी आपला जीव वाचवण्यासाठी बांगलादेशी नेत्यांनी कडक सुरक्षा उपाययोजना केल्या आहे. तसेच गन्स आणि त्याचे लायसन्सची व्यवस्था करण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये सर्व हसीनाचे विरोधक आहे. स्थानिक माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत १५ विरोधकांनी जीवाच्या सुरक्षेसाठी धडपड केली आहे.
याच वेळी बांग्लादेश नॅशनल पार्टी (BNP)च्या नेत्या खालिदा जिया आणि तारिक रहमान यांच्या सुरक्षेतही वाढ करण्यात आली आहे. सध्या तारिक रहमान हे पंतप्रधान पदाचे उमेदवार आहेत. त्यांच्यासाठी माजी ब्रिगेडियरची नियुक्ती करण्यात आलीआहे. त्यांच्याकडे रहमान यांच्या सुरक्षेची संपूर्ण जबाबदारी देण्यात आली आहे. खालिदा जिया यांच्याही सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. हे दोन्ही नेते हसीनांचे कट्टर विरोधक मानले जातात.
याच वेळी हादीच्या हत्येचा संबंध जोडल्या जाणाऱ्या जमात-ए-इस्लामीच्या पक्षाच्या नेत्यानेही सरकारकडे सुरक्षेसाठी विनंती केली आहे. जमात हा बांगलादेशमधील कट्टरपंथी मुस्लिम देश आहे. या पक्षाला पाकिस्तान समर्थिक म्हणीन ओळखले जाते. या पक्षाच्या अमीरने सुरक्षेची मागणी केलीआहे. याशिवाय बांग्लादेश पोलिसांनी विद्यार्थी नेता नाहिद इस्लाम आणि हसनत याच्या सुरेक्षितही वाढ केली आहे. या विद्यार्थी नेत्यांसोबत एक पोलिस कर्मचारी तैनात करण्यात आला आहे. बांगलादेशमध्ये जुलै २०२४ मध्ये झालेल्या हसीनाविरोधातील उठावात नाहिद हा महत्त्वाचा आणि प्रमुख नेता होता.
याच वेळी अंतरिम सरकारचे सल्लागार युनूस यांनी देखील निवडणुकांदरम्यान वाढत्या अस्थिरतेमुळे आपत्कालसीन बैठक बोलावली आहे. या बैठकीत सुरक्षा व्यवस्थांवर चर्चा करण्यात आणि असून सर्व अधिकाऱ्यांना कोणत्या परिस्थिती सुरक्षा राखण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. युनूस यांनी तणाव कमी करण्यावरही चर्चा केली आहे. हा तणाव कमी न झाल्यास येत्या निवडणुकांना मोठा धक्का पोहोचण्याची शक्यता आहे.
निवडणुकीच्या तोंडावर बांगलादेश रक्तरंजित! हसीना विरोधकाची डोक्यात झाडली गोळी