निवडणुकीच्या तोंडावर बांगलादेश रक्तरंजित! हसीना विरोधकाची डोक्यात झाडली गोळी (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
मिळालेल्या माहितीनुसार, उस्मान हादी असे या विरोधकाचे नाव असून इस्लामी संघटना इन्किलाब मंचा चा तो प्रवक्ता आहे. तसेच ढाका येथे अपक्ष उमेदवार म्हणूनही तो कार्यरत आहे. हादी रिक्षातून प्रवास करत असताना एका दुचाकीस्वाराने थेट त्याच्या डोक्यात गोळी झाली. सध्या हादीची ढाका येथील मेडीकल रकॉलेज रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात आले आहे. हादीला लाईफ सपोर्टवर ठेवण्यात आले आहे.
या घटनेनंतर बांगलादेशात मोठी खलबळ उडाली होती. या घटनेचा एक सीसीटीव्ही व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये एक दुचाकीस्वारी हादी बसलेल्या रिक्षाचा पाठलाग करत असून जवळ जाऊन त्याने गोळी झाडली आहे. दुचाकीस्वाराने घटनेनंतर तिथून पळ काढला होता. यावेळी दोघांनी हेल्मेट घातले होते यामुळे त्यांची ओळख पटली नाही. सध्या या गुन्हेगाराचा शोध घेणे सुरु आहे. ढाकाच्या विजयनगर परिसरात ही घटना घडली असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, हादीने काही तासांपूर्वीच भारतीय भूभागांसह (7 Siters) ग्रेटर बांगलादेशचा नकाशा सोशल मीडियावर शेअर केला होता. यामुळेच त्याला मारण्यात आले असल्याचे म्हटले जात आहे. सध्या हादीची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याच वेळी बांगलादेशच्या अंतरिम सरकारचे मुख्य सल्लागार मोहम्मद युनूस यांनी या घटेवर तीव्र चिंता व्यक्त केली आहे. त्यांनी निवडणुकीच्या वातावारणा अशा हिंसाचाराला सहन केले जाणार नाही असे म्हटले आहे.
या घटनेमुळे देशातील शांततापूर्ण राजकीय वातावरणावर परिणाम होत आहे. हादीला हल्ल्यापूर्वी जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्या होत्या. यामुळे या घटनेनंतर जास्त गोंधळ उडाला आहे. अशी परिस्थिती हिंसाचाराचा घटना घडणे हे दुर्दैवी असल्याचे युनूस यांनी म्हटले आहे. त्यांनी सुरक्षा यंत्रणांना या घटनेच्या सखोल चौकशीची आणि हल्लेखोरांची ओळख लवकरात लवकर पटवून शिक्षा देण्याचे निर्देश दिले आहेत.
Ans: उस्मान हादी हा इस्लामी संघटना इन्किलाब मंचा चा तो प्रवक्ता आहे. तसेच ढाका येथे अपक्ष उमेदवार म्हणूनही तो कार्यरत आहे.
Ans: उस्मान हादीवर ढाकाच्या विजयनगर विजयनगर परिसरात शुक्रवारी हल्ला झाला आहे.
Ans: हादीने काही तासांपूर्वीच भारतीय भूभागांसह (7 Siters) ग्रेटर बांगलादेशचा नकाशा सोशल मीडियावर शेअर केला होता.
Ans: या हल्ल्यावर अंतरिम सरकारचे सल्लागार युनूस यांनी प्रतिक्रिया देत निवडणुकीच्या काळात अशा हिंसाचाराला सहन केले जाणार नाही, असे म्हटले आहे.
Ans: हादीवर हल्ल्याच्या पूर्वी एक दिवस आधीच बांगलादेशाच्या निवडणुकीची तारीख जाहीर करण्यात आली होती. यामुळे या घटनेने बांगलादेशातील राजकीय वातावरण तणावपूर्ण होण्याची शक्यता आहे.






