
bangladesh politics sheikh hasina key strategic shifts
शेख हसीना यांनी अमेरिका, पाकिस्तान आणि सेंट मार्टिन बेटावरील आपल्या पूर्वीच्या कठोर विधानांपासून मोठा यू-टर्न घेतला आहे.
मुहम्मद युनूसविषयीची भूमिका मऊ करून त्या पुन्हा वॉशिंग्टनशी संबंध सुधारण्याचा प्रयत्न करत असल्याचे संकेत दिसत आहेत.
२०२६ च्या निवडणुकांपूर्वी राजकीय समीकरणे बदलत असल्यामुळे हसीना नवीन रणनीती आखत आहेत.
Bangladesh Political Twist : बांगलादेशच्या ( Bangladesh) राजकारणात एक अनपेक्षित वळण आले आहे. ऑगस्ट २०२४ मध्ये पदच्युत झाल्यानंतर सतत संघर्षमय आणि आक्रमक विधानांमुळे चर्चेत असलेल्या माजी पंतप्रधान शेख हसीना (Sheikh Hasina) आता एका नव्या राजकीय अवतारात दिसत आहेत. त्यांच्या ताज्या मुलाखतीतून उघड झालेल्या विधानांनी ढाक्यापासून वॉशिंग्टनपर्यंत, तसेच संपूर्ण दक्षिण आशियाई राजकीय वर्तुळात भूकंप घडवला आहे. एकेकाळी अमेरिका, पाकिस्तान आणि मुहम्मद युनूस यांना लक्ष्य करत असलेल्या हसीनांनी आता अचानक चार मोठे यू-टर्न घेतले आहेत. २०२६ च्या निवडणुकांपूर्वी ते आपल्या राजकीय समीकरणांचा फेरआढावा घेत असून हा प्रवास केवळ बांगलादेशच नव्हे तर संपूर्ण प्रदेशासाठी महत्त्वाचा मानला जात आहे.
सत्ता उलथवून टाकल्यानंतर लगेचच, हसीना यांनी ठामपणे सांगितले होते की अमेरिकेच्या हस्तक्षेपामुळे त्यांचे सरकार कोसळले. त्यांचे अनेक मंत्रीही तेच म्हणत होते. वॉशिंग्टनने जाणीवपूर्वक राजकीय अस्थिरता वाढवली, हा त्यांचा ठाम दावा होता. परंतु आता परिस्थिती पूर्णपणे बदललेली दिसते.
नव्या मुलाखतीत हसीना म्हणाल्या की,
“मी कोणत्याही एका देशाला दोष देत नाही. चुकीच्या माहितीमुळे परिस्थिती वेगळी दिसली. या कथेत काही व्यक्तींची भूमिका अधिक महत्त्वाची होती.”
हे विधान स्वतःच त्यांच्या पूर्वीच्या आक्रमक भूमिकेला विरोध करणारे आहे. तज्ज्ञांच्या मते, हे वॉशिंग्टनशी तणाव कमी करण्याचा स्पष्ट संदेश आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : जगाने पहिली फ्रान्सच्या सुपरसॉनिक ASMPA-R ची पहिली झलक; रशियासोबत तणाव वाढत असतानाच शक्तीप्रदर्शन
मुहम्मद युनूस यांना एकेकाळी “अमेरिकेचे साधन” म्हणणाऱ्या हसीना यांनी आता त्यांच्याकडे अधिक संतुलित नजरेने पाहण्यास सुरुवात केली आहे.
त्यांच्या मते,
“युनूस फक्त अमेरिकेचाच नाही तर अनेक पाश्चात्य देशांच्या नेटवर्कचा भाग आहेत.”
हे विधान सूचित करते की हसीना आता वैयक्तिक आरोपांपासून दूर जात आहेत आणि त्यामागील व्यापक राजकीय समीकरण समजून घेत आहेत. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेशी संबंध सुधारणे गरजेचे आहे, हे त्यांना उमगले असावे.
बंदोबस्त काळात पाकिस्तानवर जोरदार टीका करणाऱ्या हसीना आता अत्यंत मर्यादित आणि कूटनीतिक स्वरात बोलताना दिसत आहेत.
त्या म्हणतात
“ढाका आणि इस्लामाबाद यांच्यात मोठे मतभेद नसावेत.”
ही भाषा दक्षिण आशियाई भूराजकारणातील शांततेचे संकेत देत असून त्यांच्या रणनीतीत परिवर्तना दाखवते.
सेंट मार्टिन बेटावर अमेरिकेचा दबाव आहे, असा दावा हसीनांनी अनेकदा केला होता. पण यावेळी त्यांनी पूर्ण मौन बाळगले. कोणताही आरोप नाही, कोणताही संरक्षणात्मक सूर नाही.
हसीनांचे शब्द होते —
“काही गोष्टी बंद दाराआड घडल्या. सध्या त्यावर चर्चा करण्याची योग्य वेळ नाही.”
यातून स्पष्ट संकेत मिळतो की ते विवाद शमवण्याच्या तयारीत आहेत.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : ‘Asim Munir चा नवा ‘Bleed India’ प्लॅन? पाकमध्ये लष्करी सत्ता केंद्रीकृत; भारतावर पुन्हा कारगिलसारख्या छुप्या युद्धाची छाया
राजकीय तज्ज्ञांचे मत आहे की हसीनांच्या या चार मोठ्या यू-टर्नमागे एक शक्तिशाली रणनीती लपलेली आहे.
२०२६ मध्ये निवडणुका होणार असल्याने त्यांना आंतरराष्ट्रीय समर्थन हवा आहे.
त्यांच्या समर्थकांनी सरकारविरोधात सुरू केलेले आंदोलन सत्ताधाऱ्यांना दडपणात आणत आहेत.
बीएनपी आणि जमातमधील मतभेदांमुळे विरोधी पक्ष कमजोर झाला आहे, ज्याचा फायदा हसीना घेऊ शकतात.
हसीनांची ही नव्याने आखलेली भूमिका : संयम, समन्वय आणि रणनीतीचा उत्तम संगम आगामी निवडणुकीत त्यांचे भविष्य ठरवणारी ठरू शकते.