Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bangladesh Politics: बांगलादेशात शेख हसीना आणि अवामी लीगवर संकट; निवडणुक लढवण्याची परवानगी नाही?

गेल्या काही काळापासून बांगलादेशच्या राजकारणात उलथापालथ सुरु आहे. दरम्यान एक धक्कादायक संकेत समोर येते आहेत. शेख हसीना आणि त्यांचा पक्ष अवामी लीगला बांगलादेशात निवडणुक लढवता येणार नाही असे म्हटले जात आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Jan 26, 2025 | 02:04 PM
Sheikh Hasina's Awami League party Not allowed to contest elections

Sheikh Hasina's Awami League party Not allowed to contest elections

Follow Us
Close
Follow Us:

ढाका: गेल्या काही काळापासून बांगलादेशच्या राजकारणात उलथापालथ सुरु आहे. बांगलादेशमध्ये झालेल्या हिंसक विद्यार्थी आंदोलनानंतर शेख हसीना यांना देश सोडून जावे लागले. त्यानंतर त्यांनी भारतात आश्रय घेतला. सध्या बांगलादेशमध्ये मोहम्मद युनूस यांचे अंतरिम सरकार स्थापन झाले आहे, मात्र, शेख हसीना यांच्या देश सोडून गेल्यानंतर त्यांच्यांवर आणि पक्ष आवामी लीगच्या नेत्यांवर विविध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यामध्ये खून, अपहरण, हिंसा आणि दंगलींचा समावेश आहे. मात्र, सध्या धक्कादायक  संकेत मिळत आहेत की बांगलादेश सरकार आवामी लीगवर बंदी घालण्याच्या तयारीत आहे आणि पक्षाला निवडणूक लढवण्यास परवानगी दिली जाणार नाही.

बांगलादेश समर्थक गटच निवडणुकीत सहभागी होतील

मोहम्मद युनूस यांच्या अंतरिम सरकरचे वरिष्ठ सल्लागार महफूज आलम यांनी याबाबत एक मोठे विधान केले आहे. त्यांनी म्हटले आहे की, बांगलादेशमध्ये निवडणुका फक्त बांगलादेश समर्थक गटांमध्येच होतील. एका रॅलीदरम्यान त्यांनी स्पष्ट केले की, माजी पंतप्रधान खालिदा झिया यांचा पक्ष बीएनपी, जमात-ए-इस्लाम आणि अन्य बांगलादेश समर्थक गट देशात आपली राजकीय प्रक्रिया सुरू ठेवतील. मात्र, शेख हसीना यांच्या आवामी लीगच्या राजकीय पुनर्वसनाला परवानगी देण्यात येणार नाही. आलम यांनी असेही स्पष्ट केले की, शेख हसीना सरकारने जी संस्थात्मक हानी केली आहे, ती सुधारित केल्याशिवाय कोणत्याही निवडणुका होणार नाहीत.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- युद्ध पुन्हा सुरु होणार? डोनाल्ड ट्रम्प यांनी इस्त्रायलला मिळणाऱ्या शस्त्र पुरवठ्यावरील उठवली बंदी

आलम हे मोहम्मद युनूस यांच्या सरकारमधील एक वरिष्ठ आणि महत्त्वाचे मंत्री असून, त्यांनी बांगलादेशातील विद्यार्थी आंदोलनामागील प्रमुख व्यक्ती म्हणून भूमिका बजावली आहे. युनूस यांनी संयुक्त राष्ट्र महासभेतील एका कार्यक्रमात आलम यांची प्रशंसा केली होती. तसेच आलम यांना आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या प्रमुख व्यक्तींपैकी त्यांना महत्त्वाचे स्थान देण्यात येते.

BNP चे आवामी लीग ला समर्थन

जवळजवळ 5 ऑगस्ट 2024 पासून आवामी लीग राजकीय क्षेत्रातून गायब आहे. आवामी लीगच्या पक्षातील बहुतांश नेते आणि शेख हसीना यांचे कॅबिनेट सदस्य खुनासारख्या गुन्ह्यांमध्ये तुरुंगात असून काही नेते देश-विदेशात फरार झाले असल्याचे म्हटले जात आहे. तरीही, बीएनपीने(BNP) कोणत्याही राजकीय पक्षावर बंदी घालण्याच्या धोरणाला विरोध दर्शवला आहे आणि आवामी लीगच्या अस्तित्वाला समर्थन दिले आहे.

निवडणुका आणि सुधारणा

बांगलादेशात पुढील निवडणुका कधी होणार? तसेच आवामी लीग निवडणुक लढवणार का याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. मोहम्मह युनूस यांना याबाबत विचारले असता त्यांनी, बांगलादेशमध्ये पुढील निवडणुका 2025 च्या अखेरीस किंवा 2026 च्या सुरुवातीस होऊ शकतात असे म्हटले आहे. मात्र, निवडणुकीची वेळ सुधारणा आणि राजकीय सहमतीवर अवलंबून असणार. त्यामुळे बांगलादेशच्या राजकारणात पुढील काही महिने निर्णायक ठरण्याची शक्यता आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- ७६ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त अमेरिकेने दिल्या भारताला शुभेच्छा; म्हणाला…

Web Title: Bangladesh politics sheikh hasinas awami league party not allowed to contest elections

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 26, 2025 | 02:04 PM

Topics:  

  • Bangladesh
  • Muhammad Yunus
  • shaikh hasina
  • World news

संबंधित बातम्या

Fact Check : निमिषा प्रियाला वाचवण्यासाठी जनतेकडून पैसा गोळा करतंय सरकार? परराष्ट्र मंत्रालयाने दिला धोक्याचा इशारा
1

Fact Check : निमिषा प्रियाला वाचवण्यासाठी जनतेकडून पैसा गोळा करतंय सरकार? परराष्ट्र मंत्रालयाने दिला धोक्याचा इशारा

कोण आहेत मार्क वॉरेन? ज्यांना रशियन राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी गिफ्ट दिली महागडी बाईक
2

कोण आहेत मार्क वॉरेन? ज्यांना रशियन राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी गिफ्ट दिली महागडी बाईक

Israel Gaza Plan : गाझामध्ये इस्रायलची मोठी लष्करी हालचाल; हमासविरोधी ५० हजार सैनिक तैनात
3

Israel Gaza Plan : गाझामध्ये इस्रायलची मोठी लष्करी हालचाल; हमासविरोधी ५० हजार सैनिक तैनात

पाकिस्तान आणि सौदीपेक्षाही क्रूर निघाला मलेशिया ; नमाज न अदा केल्यास देणार कठोर शिक्षा
4

पाकिस्तान आणि सौदीपेक्षाही क्रूर निघाला मलेशिया ; नमाज न अदा केल्यास देणार कठोर शिक्षा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.