Bangladesh warns citizens for travel India and Pakistan amid tension on pahalgam between both countries
ढाका: पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणापूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे. याचदरम्यान बांगलादेशने एक मोठी घोषणा केली आहे. यामुळे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहे. बांगलादेशचे परराष्ट्र व्यवहार सल्लागार मोहम्मद तौहिद युनूस यांनी, सध्या भारत पाकिस्तानचा प्रवास टाळला पाहिजे असे मोठे विधान केले आहे. यामुळे मोठी खबळ उडाली आहे. तौहिद हुसेन यांनी भारत आणि पाकिस्तानला अनावश्यक प्रवास टाळण्याचा सल्ला नागरिकांना दिला आहे. तौहिद हुसेन यांचे हे वक्तव्य अशा वेळी आले आहे जेव्हा पहलगाम गोळीबारानंतर भारत आणि पाकिस्तानमधील संबंधांमध्ये तणाव वाढला असून युद्धाची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.
अलीकडेच अंतिरम सरकारचे मुख्य सल्लागार मोहम्मद युनूस यांनी चीनला भेट दिली होती. या भेटीदरम्यान युनूस यांनी भारताविरोधात अनेक विधाने केली होती. याचवेळी बांगलादेशने चीनशी आणि पाकिस्तानशी जवळीक साधण्याचा देखील प्रयत्न केला होता. पण पहलगाम हल्ल्यानंतर युनूस यांनी पाकिस्तानला देखील पाठ दाखवली आहे. तसेच भारतासोबतही बांगलादेशचे संबंध अलीकडे बिघडले आहेत.
बांगलादेशन आपल्या नागरिकांना भारत आणि पाकिस्तानमध्ये न जाण्याचा सल्ला दिला आहे.
भारत आणि पाकिस्तान वादावर तौहिद यांनी, दोन्ही देशांनी संवादाद्वारे वाद सोडवला पाहिजे अशी आशा व्यक्त केली आहे. तौहिद यांनी बांगलादेश यामध्ये कोणतीही मध्यस्थी करणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. परंतु भारत आणि पाकिस्तानने औपचारिकपणे मदत मागितील तर यावर विचार केला जाईल असे तौहिद यांनी म्हटले आहे.
बांगलादेशचे परराष्ट्र व्यवहार सल्लागार तौहिद यांनी पत्रकारांशी बोलताना म्हटले की, भारत आणि पाकिस्तानमधील वाढत तमाव अप्रत्यक्षपणे बांगलादेशवर परिणाम करु शकतो. याचा परिणाम बांगलादेशच्या व्यापार आणि आर्थिक करारांवर होण्याची शक्यता असल्याचे तौहिद यांनी म्हटले आहे. यामुळे सावधगिरी बाळगणे आवश्यक असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
सध्या बांगलादेशला भारताकडून मिळणारी वाहतूक सुविधा पूर्णपणे संपुष्टात आली आहे, यामुळे बांगलादेशसमोर नवीन आव्हाने निर्माण झाली आहे. शिवाय, 1971 च्या भारत आणि पाकिस्तानमधील शिमला करारामुळे बांगलादेशची स्वतंत्र्य निर्मिती झाली होती. हा करार स्थगित झाल्यास बांगलादेशला अप्रत्यक्ष धोका निर्माण होण्याची शक्यता असल्याचे म्हटले जात आहे.
याच वेळी तौहिद यांना भारतातील बांगलादेशींच्या अटकेबद्दलही प्रश्न विचारण्यात आले. यावर उत्तर देताना तौहिद यांनी म्हटले की, भारताकडून याबाबत आतापर्यंत कोणतीही औपचारिक माहिती मिळालेली नाही. त्यांनी हेही म्हटले की, केवळ बंगाल बोलल्याने एखाद्याची बांगलादेशी म्हणून ओळख सिद्ध होत नाही. तसेच एखादी व्यक्ती बांगलादेशाची असल्याचे सिद्ध झाल्यास सरकार त्याला परत आणण्याची खात्री घेईल असे म्हटले आहे. संपूर्ण प्रकरणाची पडताळणी केल्यावर योग्य ती कारवाई केली जाईल असे तौहिद यांनी म्हटले.