India France Defence Deal: युद्धाच्या तयारीने भारताचे महत्वपूर्ण पाऊल; फ्रान्ससोबत राफेल करारावर स्वाक्षरी (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
नवी दिल्ली: आज भारत आणि फ्रान्समध्ये एका महत्वाच्या करारावर स्वाक्षरी करण्यात आली. भारताचे संरक्षण सचिव राजेश कुमार सिंग यांनी भारत आणि फ्रान्समधील 26 राफेल करारावर स्वाक्षरी केली. या करारांतर्गत, भारताला फ्रान्सकडून 22 सिंगल सीटर विमाने आणि 4 डबल सीटर विमाने मिळणार आहेत. हा करारा 63 हजार कोटी रुपयांमध्ये करण्यात आला आहे. या विमानांची क्षमता अणुबॉम्ब डागण्याची आहे. शस्त्रास्त्र खरेदीबाबत भारताचा फ्रान्ससोबत हा सर्वात मोठा करारा आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली 23 एप्रिल रोजी सुरक्षा विषयक मंत्रिंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत भारत आणि फ्रान्समधील विमान खरेदीच्या कराराला अंतिम मंजूरी देण्यात आली. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर ही बैठक घेण्यात आली होती. यामुळे हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर हा करार झाला असून भारतासाठी महत्वपूर्ण असल्याचे म्हटले जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या लढाऊ राफेल विमानांची डिलिव्हरी 2028-29 मध्ये सुरु होणार आहे. सर्व विमान 2031-32 पर्यंत भारतात पोहोचतील.
भारताच्या INS विक्रांतंवर राफेल सागरी विमाने तैनात करण्यात येमार आहेत. विमान उत्पादक कंपनी डसॉल्ट एव्हिएशनने भारताच्या म्हणण्यानुसार, या विमानांमध्.ये अनेक बदल केले आहेत. या राफेल विमानांमध्ये जहाजविरोधी हल्ला, क्षेपणास्त्रे डागण्याची श्रमता आणि 10 तासांपर्यंत उड्डणाची क्षमता आहे. याशिवाय भारताला शस्त्र प्रणाली, सुटे भाद आणि विमानांसाठी आवश्यक ती साधने देखील पुरवली दाणार आहेत.
Today, India and France signed a mega Rs 63,000 crore deal to buy 26 Rafale Marine aircraft for the Indian Navy. The Indian side was represented by Defence Secretary Rajesh Kumar Singh, where Navy Vice Chief Vice Admiral K Swaminathan was present
(Video source: Indian Navy… pic.twitter.com/5W6SdwcuD8
— ANI (@ANI) April 28, 2025
राफेल खरेदी करण्यापूर्वी भारताने फ्रान्सकडून हवाई दलासाठी 36 राफेल जेट विमाने देखील खरेदी केली आहे. 2016 मध्ये भारत आणि फ्रान्समध्ये झालेल्या करारातील सर्व विमानेही भारतात पोहोचली आहे. ही विमान हवाई दलाच्या अंबाला आणि हशिनार हवाई विमानतळावर तैनात करण्यात आली आहे. हा करार 58 कोटी रुपयांना करण्यात आला होता. राफेल मरीन विमानांची वैशिट्ये हवाई दलाच्या राफेल विमानांपेक्षा अधिक प्रगत आणि अत्याधुनिक आहेत.
सध्या भारताच्या हवाई दलाकडे मिग-29 विमान आहेत. ही विमाने आयएनएस विक्रमादित्यवर तैनात आहेत. नवीन लढाऊ विमाने ही मिग-29 च्या मदतीसाठी आहेत. नवीन राफेल सागरी विमानांची वाढती मागणी आणि मर्यादित उपल्बधतेमुळे भारताने राफेल सागरी विमाने खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच हा करार भारत आणि फ्रान्स संबंधा मजबूत करण्याच्या दृष्टीने एक महत्वपूर्ण पाऊल मानले जात आहे. या करारामुळे भारताची समुद्री ताकद वाढणार आहे. पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर या करारामुळे चांगल्या संबंधामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताला फ्रान्सकडून पाठिंबा मिळण्याची शक्यता आहे.