Bangladesh's Islamic fundamentalists threaten Mohammad Yunus
ढाका: एकीकडे भारत आणि पाकिस्तानमध्ये तणावाचा वातावरण आहे, तर दुसरीकडे बांगलादेशात मोठी राजकीय उलथापालथ सुरु आहे. मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या अंतरिम सरकारला इस्लामिक कट्टरपंथीयांकडून धमकी मिळाली आहे. यामुळे युनूस यांना मोठा धक्का बसला आहे. अंतरिम सरकारने महिला हक्कांसाठी स्थापन केलेल्या महिला सुधार आयोगावरुन बांगलादेशात वाद सुरु आहे. या संघटेनवरुन बांगलादेशातील इस्लामिक कट्टपंथी संतप्त झाले आहे. या आयोगमध्ये इस्लामविरोध प्रस्ताव मांडल्याचा आरोप इस्लामिक कट्टरपंथींयांनी केला आहे.
तसेच कट्टरपंथीयांनी सरकारला याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील अशी धमकी दिली आहे. ढाका येथे 30 एप्रिल रोजी महिला आयोगाविरोधात सभा घेण्यात आली होती. या सभेदरम्यान अनेक इस्लामिक नेत्यांनी महिला सुधार आयोग बरखास्त करण्याची मागणी करत आक्रमक भूमिका घेतली. “जतिया ओलमा मशायेख एम्मा परिषद” असे या सभेला नाव देण्यात आले होते. या सभेत इस्लामिक कट्टरपंथीयांनी मोठ्या मोर्चाची धमकी दिली. इस्लामिक मूव्हमेंच बांगलादेश चे अमीर मुफ्ती यांनी, सरकारने आमची मागणी मान्य की नाही, तर त्यांना देश सोडून जायला वेळही मिळणार नाही असे म्हटले.
याशिवाय, खिलाफत मजिसल या इस्लामी संघटनेचे अमीर मामुनुल हक यांनीही कडक शब्दात इशारा दिला आहे. त्यांनी म्हटले आहे की, महिला आयोगाच्या कोणत्याही प्रस्तावाची अंमलबजावणी झाल्यास, याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- न्यूझीलंडमध्ये मुसळधार पाऊस आणि वादळाचे थैमान; देशात आणीबाणी लागू
तसेच याचा संबंध शेख हसीना यांच्या 5 ऑगस्ट 2024 रोजी घडलेल्या सत्तापालटाशी जोडला जात आहे. शेख हसीना यांना देश सोडण्यासाठी केवळ 45 मिनिटे मिळाली होती. यातही त्यांना त्यांचे निवासस्थान सोडून जावे लागले होते. यामुळे या घटनेता उल्लेख खरत इस्लामिक कट्टरपंथींनी मोहम्मद युनूस आणि त्यांच्या सरकारला पाच मिनिटांची धमकी दिली आहे. हा गंभीर राजकीय इशारा मानला जात आहे.
बांगलादेशात अनेक वर्षापासून धर्म आणि समाजसुधारामध्ये संघर्ष सुरु आहे. महिला सुधार आयोगाने महिलांच्या हक्कांलाठी काही पाश्चिमात्त तत्वांवर आधिरित शिफारशी केल्या आहेत. यामुळे कट्टर धार्मिक अधिक आक्रमक झाले आहेत. सध्या बांगलादेशात धर्म आणि समासुधारणेवरुन वातावरण चांगलेच तापलेले आहे. तसेच दुसरीकडे भारत आणि पाकिस्तानमध्ये दहशतवादावरुन तणावाचे संबंध निर्माण झाले आङे. या घडामोडी आणखी काय नवे वळण घेतील हे पाहणे अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे.