Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

बांगलादेशच्या ‘या’ निर्णयामुळे दहशतवादविरोधी लढाईवर प्रश्नचिन्ह; जागतिक स्तरावर खळबळ

बांगलादेश सतत कोणत्या ना कोणत्या निर्णयाने चर्चेचा विषय बनत आहे. आता पुन्हा एकदा बांगलादेशन एक धक्कादायक निर्णय घेतला आहे. बांगलादेशच्या या निर्णयाने जागतिक स्तरावर खळबळ उडाली आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Jan 06, 2025 | 10:55 AM
बांगलादेशच्या 'या' निर्णयामुळे दहशतवादविरोधी लढाईवर प्रश्नचिन्ह; जागतिक स्तरावर खळबळ

बांगलादेशच्या 'या' निर्णयामुळे दहशतवादविरोधी लढाईवर प्रश्नचिन्ह; जागतिक स्तरावर खळबळ

Follow Us
Close
Follow Us:

ढाका: बांगलादेश सतत कोणत्या ना कोणत्या निर्णयाने चर्चेचा विषय बनत आहे. आता पुन्हा एकदा बांगलादेशन एक धक्कादायक निर्णय घेतला आहे. बांगलादेशच्या मोहम्मद युनूस सरकारने मोस्ट वॉंटेड दहशतवादी मेजर जिया उल हक याच्या मृत्यूदंडाटी शिक्षा माफ केली आहे. युनूस सरकारच्या या निर्णयामुळे दहशतवादाविरोधातील लढाईवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. तसेच बांगलादेशच्या या निर्णयाने जागतिक स्तरावर खळबळ उडाली आहे. विशेष, म्हणजे जिया उल हक हा “जमात-उल-मुजाहिदीन बांग्लादेश” या दहशतवादी संघटनेचा मोठा नेता असून त्याच्यावर अमेरिकेनेही मोठे बक्षीस जाहीर केले आहे.

कोण आहे जिया उल हक?

जिया उल हक उर्फ मेजर जिया पूर्वी बंगालादेशच्या लष्करामध्ये अधिकारी होते. मात्र, त्यांच्या दहशतवादी प्रवृत्तीकडे कल वाढला आणि त्यांनी पाकिस्तानच्या ISI या गुप्तचर संस्थेशी हात मिळवणी केली. त्यांनी बांगलादेश लष्करामध्ये राहून सरकारविरोधात कट रचला यामुळे त्यांना लष्करातून काढून टाकण्यात आले. त्यानंतर त्यांनी स्वत:चा एक दहशतवादी गट तयार केला. या गटाचे नाव जमात-उल-मुजाहिदीन होते.

जिया याने अनेक ब्लॉगर आणि विचारवंतांची हत्या केली आहे. विशेषतः ब्लॉगर दीपन आणि अभिजीत यांच्या हत्यांमध्ये त्याचा सहभाग होता. त्यांच्यावर सात हत्यांचे आरोप आहेत, यापैकी तीन प्रकरणांमध्ये मृत्यूदंड सुनावण्यात आला होता. अशा गुन्हेगाराची शिक्षा माफ केल्यामुळे बांगलादेश सरकारच्या धोरणांवर गंभीर प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- कोण होता एली कोहेन? ज्याचा इस्त्रायलने सीरियाकडून 60 वर्षांनंतर परत मागितला मृतदेह

युनुस सरकारवर प्रश्नचिन्ह

युनुस सरकारने जिया याच्यासह अनेक दहशतवाद्यांची नावे मोस्ट वाँटेड लिस्टमधून काढली आहेत. या निर्णयामुळे सरकारवर दहशतवाद पोसण्याचा आरोप होत आहे. अमेरिकेने जिया याच्यावर बक्षीस ठेवले असून, युनुस सरकारच्या या कृतीमुळे अमेरिकेसोबतचे बांगलादेशचे संबंध तणावपूर्ण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

भारतावर परिणाम

मेजर जिया याच्यासारख्या दहशतवाद्यांचे बांगलादेशातू सुटणे भारतासाठीही चिंताजनक ठरू शकते. भारतात आधीच जमात-उल-मुजाहिदीनचे सदस्य दहशतवादी कारवायांमध्ये गुंतलेले आहेत. बेंगळुरूमध्ये नुकत्याच एका प्रकरणात बांगलादेशी नागरिक जाहिदुल इस्लामला सात वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली. तो भारतात जमात-उल-मुजाहिदीनसाठी काम करत होता. युनुस सरकारचा हा निर्णय बांगलादेशातील दहशतवादविरोधी प्रयत्नांसाठी धोकादायक असल्याचे म्हटले जात आहे. यामुळे दहशतवाद्यांना प्रोत्साहन मिळू शकते, तसेच भारतासह आंतरराष्ट्रीय संबंधांवरही परिणाम होऊ शकतो असे तज्ञांनी म्हटले आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- पाकिस्तानने साजरा केला काश्मिरी लोकांसाठी ‘आत्मनिर्णय दिवस’; दुसरीकडे भारतावर आरोप म्हणाला…

Web Title: Bangladeshs mohammad yunus government takes shocking decision by released most wanted terrist zia ul haq nrss

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 06, 2025 | 10:55 AM

Topics:  

  • Bangladesh

संबंधित बातम्या

मोठी बातमी! बांगलादेशमधे हिंदू हादरले! धडाधड गोळ्या झाडून मृत्यू, २० दिवसात तब्बल ५ ….
1

मोठी बातमी! बांगलादेशमधे हिंदू हादरले! धडाधड गोळ्या झाडून मृत्यू, २० दिवसात तब्बल ५ ….

विधवेवर केला बलात्कार, झाडाला बांधले अन्….; नराधमांचे संतापजनक कृत्य, बांगलादेशात हिंदूंवरील अत्याचार सुरूच
2

विधवेवर केला बलात्कार, झाडाला बांधले अन्….; नराधमांचे संतापजनक कृत्य, बांगलादेशात हिंदूंवरील अत्याचार सुरूच

Mustafizur Rahman: मुस्तफिजुरच्या ‘रिलीज’वरून भारत-बांगलादेश क्रिकेटमध्ये ठिणगी; बांगलादेश सरकार कडक पाऊल उचलण्याच्या तयारीत
3

Mustafizur Rahman: मुस्तफिजुरच्या ‘रिलीज’वरून भारत-बांगलादेश क्रिकेटमध्ये ठिणगी; बांगलादेश सरकार कडक पाऊल उचलण्याच्या तयारीत

‘मी लाचार आहे…’ टीममधून बाहेर काढल्यानंतर मुस्तफिजुरची पहिली प्रतिक्रिया, BCCI च्या निर्णयाने झाला उद्ध्वस्त
4

‘मी लाचार आहे…’ टीममधून बाहेर काढल्यानंतर मुस्तफिजुरची पहिली प्रतिक्रिया, BCCI च्या निर्णयाने झाला उद्ध्वस्त

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.