
बांग्लादेशमध्ये पुन्हा एकदा हिंदू व्यक्तीची हत्या
45 वर्षीय व्यक्तीची गोळी मारून हत्या
आतापर्यंत एकूण 5 हिंदूंची व्यक्ती
Bangladesh Hindu People Murder: बांग्लादेशमध्ये हिंदू आणि अल्पसंख्याकांना लक्ष्य करण्याची आणखी एक घटना घडली आहे. हिंदू समाजाविरुद्ध पुन्हा एक हिंसचाराची घटना घडली आहे. बांग्लादेशमध्ये आणखी एका हिंदू व्यक्तीची हत्या करण्यात अलाई आहे. ही घटना मणीरामपुर भागात घडली आहे. आतापर्यंत बांग्लादेशमध्ये 5 हिंदू व्यक्तींची हत्या करण्यात आली आहे.
मणीरामपुर भागातील बाजारपेठेत 45 वर्षीय हिंदू व्यक्तीची गोळी मारून हत्या करण्यात आली आहे. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. हत्या करण्यात आलेला व्यक्ती हा केशवपूरमधील अरुआ गावातील रहिवासी होता. कोपलिया बाजार परिसरात संध्याकाळी 6 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. गेल्या 20 दिवसांमध्ये आतापर्यंत 5 हिंदूंची हत्या करण्यात आली आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, हा व्यक्ती या बाजारपेठेत उपस्थित होते. याच दरम्यान दोन अज्ञात हल्लेखोर आले आणि या व्यक्तीवर गोळीबार केला. अचानक झालेल्या घटनांमुळे बाजारपेठेत एकच खळबळ उडाली. नागरिक आपला जीव वाचवण्यासाठी इकडे तिकडे धावत असल्याचे पाहायला मिळाले. त्यानंतर पोलिस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी या भागात सुरक्षा वाढवली आहे.
हिंदूंच्या सुरक्षेबाबत प्रश्न गंभीर
गेल्या 20 दिवसांमध्ये बांग्लादेशमध्ये 5 हिंदू व्यक्तींची हत्या करण्यात आली आहे. त्यामुळे बांग्लादेशमधील हिंदूंच्या सुरक्षेबाबत मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. आशा घटना घडत असल्याने या ठिकाणी भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. हिंदू समाजाचा रोष आणि भीती त्या ठिकाणी वाढताना दिसून येत आहे. यामुळे तेथील सरकार ने महत्वाची पावले उचलण्याची गरज असल्याचे म्हटले जात आहे.
बांगलादेशातील अत्याचाराची मालिका थांबेना
बांगलादेशातील मैमनसिंग येथून पुन्हा एकदा धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका कापड कारखान्यात झालेल्या हिंसक संघर्षात ४२ वर्षीय बजेंद्र बिस्वास यांची सार्वजनिक ठिकाणी हत्या करण्यात आली. वृत्तानुसार, कारखान्याच्या परिसरात गर्दीसमोर एक भयंकर हाणामारी झाली, त्यादरम्यान नोमान मियाँ नावाच्या २२ वर्षीय तरुणाने बजेंद्र बिस्वास यांच्यावर बंदूक रोखली आणि गोळीबार केला. बजेंद्र जागीच मरण पावला. पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपी नोमान मियाँ याला अटक केली. माध्यमांच्या वृत्तानुसार, मृत बजेंद्र बिस्वास हा गावाचे रक्षण करणाऱ्या निमलष्करी गटाचा (ग्रामरक्षक दल) भाग होता. त्याच्या सार्वजनिक हत्येमुळे परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.