कोण होता एली कोहेन? ज्याचा इस्त्रायलने सीरियाकडून 60 वर्षांनंतर परत मागितला मृतदेह, नेमकं कारण काय? (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
जेरुसेलम: मध्य पूर्वेतील राजकीय उलथापलथी दरम्यान इस्त्रायलने सीरियावरील त्यांचा प्रभाव वाढवण्यासाठी अनेक कारवाया सुरु केल्या आहे. दरम्यान एक धक्कादायक बाब समोर आली आहे. मोसाद या गुप्तहेर संघटनेचा उपयोग त्यांनी या कारवायंदरम्यान केला आहे. मोसादचा एक प्रसिद्ध जासूस, एली कोहेन याला 1965 साली सीरियात फाशीची शिक्षा देण्यात आली होती. ही फाशीची शिक्षा त्यांना सार्वजनिक फाशी देण्यात आली.
कोण होता एली कोहेन?
कोहेन यांनी 1967 च्या सहा दिवसांच्या युद्धात इस्त्रायलच्या विजयात मोलाची भूमिका बजावली होती. यामुळे इस्त्रायलने त्यांच्या मृत्यूनंतर शव मिळवण्याचा प्रयत्न केला. एली कोहेन यांचा जन्म 1924 साली मिसरमधील एका यहूदी कुटुंबात झाला. 1948 मध्ये इस्त्रायलची स्थापना झाल्यानंतर त्यांचे कुटुंब तिथे स्थलांतरित झाले. कोहेन यांनी 1957 मध्ये इस्त्रायल डिफेन्स फोर्समध्ये प्रवेश केला. त्यांच्या फ्रेंच, स्पॅनिश आणि अरबी भाषांवरील उत्कृष्ट पकडीमुळे 1960 मध्ये त्यांना मोसादमध्ये समाविष्ट करण्यात आले. 1962 मध्ये, “कामेल अमील थामेट” या नावाने त्यांनी सीरियामध्ये एका व्यापाऱ्याचे रूप घेतले. तेथील राजकीय आणि लष्करी व्यक्तींशी मैत्री करून त्यांनी महत्त्वाची गुप्त माहिती मिळवली. त्यांच्या गुप्त कामामुळेच इस्त्रायलला गोलान हाइट्समधील सीरियाच्या हालचालींचा ठाव लागला.
गुप्तहेर कारवाईचा शेवट आणि सार्वजनिक फाशी
मिळालेल्या माहितीनुसार, 1965 साली कोहेन यांच्या जासूसीचा पर्दाफाश झाला. सीरियाच्या गुप्तहेर विभागाने सोव्हिएत संघाच्या मदतीने त्यांच्या गुप्त रेडिओ संदेशांचा माग काढला. 4 जानेवारी 1965 रोजी त्यांना अटक करण्यात आली. सीरियात त्यांच्यावर खटला चालवून त्यांना जासूसीसाठी दोषी ठरवले गेले. आंतरराष्ट्रीय पातळीवर दयायाचना करूनही, 18 मे 1965 रोजी त्यांना दमास्कस येथे सार्वजनिक फाशी देण्यात आली.
शव परत मिळवण्यासाठी इस्त्रायलचे प्रयत्न
एली कोहेन यांच्या मृत्यूनंतर त्यांचे शव कुठे आहे, याबाबत अनेक वाद उद्भवले. इस्त्रायलने वारंवार त्यांचे शव परत मागितले, पण सीरियाने तो प्रस्ताव नाकारला. 2018 साली, मोसादला सीरियातून कोहेन यांची घड्याळ मिळाली, ज्यामुळे त्यांच्या शवाचा माग घेण्याच्या प्रयत्नांना नवे बळ मिळाले.
सत्तापालटानंतर नवे संवाद सुरू
सध्या सीरियात बशर अल असद सरकारच्या सत्तापालटानंतर, इस्त्रायल आणि सीरियामध्ये संवादासाठी नवे पर्याय उघडले आहेत. मोसादचे प्रमुख डेव्हिड बार्निया यांच्यासह इस्त्रायली अधिकारी असद सरकारच्या माजी सदस्यांशी चर्चा करत आहेत. इस्त्रायलला एली कोहेन यांचे शव परत मिळवून त्यांच्या बलिदानाचा सन्मान करायचा आहे. एली कोहेन यांच्या कार्यामुळे त्यांचे नाव इतिहासात अजरामर राहिले आहे, आणि त्यांचे शव परत मिळवण्याची इस्त्रायलची धडपड अजूनही सुरू आहे.