
Iran US Conflict
बाघेर गालिबाफ यांनी म्हटले आहे की, इराण अणु चर्चेसाठी तयार आहे. परंतु अमेरिकेच्या कोणत्याही अटी स्वीकारल्या जाणार नाहीत. त्यांनी स्पष्ट केले की, अमेरिकेने इराणवर अटी लादण्याचा प्रयत्न केल्यास चर्चेत सहभागी होणार आहे. तेहरानमध्ये CNN ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे विधान केले आहे.
गालिबाफ यांचे हे विधान अशा वेळी आले आहे, जेव्हा अमेरिकेने मध्यपूर्वेत आपली लष्करी तैनाती सुरु केली आहे. तसेच ट्रम्प सतत इराणला लष्करी कारवाईचा इशारा देत आहे. यामुळे मध्यपूर्वेत अस्थिरतेचे वातावरण निर्माण झाले आहे. गालिबाफ यांनी इराण हिंसक निदर्शनांमुळे अस्थिरता निर्माण झाली आहे. या निदर्शनांमध्ये बळी गेलेल्या ३०० सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या रक्ताचा बदला अमेरिकी सैन्याला संपवून घेतला जाईल असे त्यांनी म्हटले आहे.
सध्या इराणमध्ये प्रचंड आर्थिक संकट निर्माण झाले आहे. इराणचे चलन रियालची घसरण झाली असून १ अमेरिकी डॉलरसाठी १५ लाख रियाल मोजावे लागत आहेत. यामुळे देशांतर्गत महागाई वाढली आहे, दैनंदिन जीवनातील वस्तूही महाग झाल्या आहेत. यासाठी इराणने अमेरिकेच्या कठोर निर्बंधांना जबाबदार धरले आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला अण्वस्त्र कार्यक्रमावर वाटाघाटी चर्चा करण्याचे आदेश अनेक वेळा दिले आहेत. तसेच चर्चा न झाल्यास विनाशकारी हल्ला इराणवर केला जाईल असेही म्हटले आहे. यामुळे इराणच्या सरकारमध्ये संताप वाढत असून इराणने अमेरिकी हल्ला झाल्यास चोख प्रत्युत्तर दिले जाईल असे म्हटले आहे. या सर्व परिस्थितीमुळे मध्यपूर्वेत प्रचंड अस्थिरता पसरू लागली आहे.