चोक्सीविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी
नवी दिल्ली: भारताची 15 हजार कोटींची फसवणूक करुन फरारा झालेल्या हिरे व्यापरी मेहुल चोक्सीला बेल्जियम पोलिसांनी अटक केली आहे. सध्या त्याच्या भारतात प्रत्यार्पणाची तयारी सुरु आहे. दरम्यान मेहुल चोक्सीने आजाराचे कारण देत बेल्जियमच्या न्यायालयात धाव घेतली होती. चोक्सीने बेल्जियम न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला होता. मात्र बेल्जियम न्यालयाने त्याला मोठा धक्का दिला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बेल्जियम न्यायालयाने चोक्सीचा जामीन अर्ज फेटाळला आहे.
मेहुल चोक्सीचे विकल चौरसिया यांनी न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला होता. मात्र, सुनावणी दरम्यान न्यायाधीशांच्या खंडपीठाने जामीन देण्यास नकार दिला आहे. चोक्सीने न्यायालयात बाजू मांडता, प्रकृती ठीक नसल्याचा हवाला दिला होता. त्यांने म्हटले होते की, मला माझ्या कुटुंबासोबत राहायचे आहे. यामुळे मला जामीन मिळावा. त्याने म्हटले की, तो न्यायालयाची कोणतीही अट मान्य करण्यास तयार असल्याचे चोक्सीने म्हटले आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, मेहुल चोक्सीला 12 एप्रिल 2025 रोजी बेल्जियममध्ये अटक करण्यात आली. भारताने चोक्सीतच्या प्रत्यापर्पणाची तयारी सुरु केली आहे. यासाठी भारताने बेल्जियमला औपचारिक विनंती पत्र देखील पाठवण्यात आले आहे. चोक्सीला अटक करण्यात आली त्यावेळी तो उपचाराच्या बहाण्याने बेल्जियममधून पळून जाण्याच्या तयारीत होता. याच वेळी भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वासल यांनी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, भारत सरकारच्या विनंतीवरुन चोक्सीला बेल्जियममध्ये अटक करण्यात आली.
सध्या भारत सरकार बेल्जियम सरकारच्या संपर्कात आहे, ज्यामुळे चोक्सीवर भारतात खटला चालवता येईल. परंतु चोक्सी त्याच्या भारतात प्रत्यार्पणाला सतत विरोध करत आहे. यामुळे त्याला देशात परत आणणे भारत सरकारसाठी कठीण होत आहे. यामुळे तपास यंत्रणा चोक्सी कोठडीत राहावा आणि त्याच्या प्रत्यार्पणाची प्रक्रिया लवकरच सुरू व्हावी यासाठी कायदेशीर रणनीती अवलंबवत आहेत.
मेहुल चोक्सीने आपला पुतण्या नीरव मोदी याच्यासोबत मिळून पंजाब नॅशनल बँक मध्ये मोठा घोटाळा केला. दोघांवर बँकेची 13 कोटी रुपयांपेक्षा जास्त फसवणूक केल्याचा आरोप आहे. भारत सरकारने दोघांना फरार घोषित केले होते.
चोक्सीला 2017 मध्ये अँटिग्वाचे नागरिकत्व मिळाले आणि नंतर त्याने 2018 मध्ये झालेल्या घोटाळ्यानंतर भारतातून पळ काढला. नंतर PNB ने चोक्सीविरोधात 15 हजारो कोटींच्या घोटाळ्याची चौकशी सुरु केली. 2018 मध्ये इटरपोलने चोक्सीविरोधात रेड कॉर्नर म्हणून नोटी जारी केली होती. 2021 मध्ये अँटिग्वातून मेहूल चोक्सी फरार झाला आणि डेमिनिकामध्ये स्थायिक झाला. नंतर 2025 मध्ये तो बेल्जियममध्ये असल्याचे माहिती मिळाली.