Pahalgam Terror Attack: 'नेपाळ भारतासोबत खंबीरपणे उभा आहे' ; पंतप्रधान ओली शर्मा यांनी पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शोक व्यक्त केला (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
काठमांडू: मंगळवारी (22 एप्रिल) जम्मू-काश्मीरचे प्रमुख पर्यटन स्थळ पहलगाम येथे दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यात 26 जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक जणजखमी झाले आहेत. या हल्ल्याने केवळ भारत नव्हे तर संपूर्ण जग हादरले आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर या हल्ल्याचा निषेध केला जात आहे. आपला शेजारी देश नेपाळने देखील या भ्याड हल्ल्याबद्दल दु:ख व्यक्त केले आहे. नेपाळचे पंतप्रधान ओली शर्मा यांनी हल्ल्याबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर म्हटले आहे की, “पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यात बळी गेलेल्यांबद्दल तीव्र संवेदना आहेत. नेपला भारताच्या बाजूने ठामपणे उभा आहे. नेपाळ कोणत्याही दहशतवादी कृत्याचा तीव्र निषेध करता. तसेच पीडितांमध्ये एका नेपाळी नागरिकाचा समावेश आहे. आम्ही आवश्यक ती मतद करण्या तयार आहोत.”
Deepest condolences to the victims of the terrorist attack in Pahalgam.Nepal stands firmly with India & strongly condemn any & all acts of terrorism.Close coordination is established to verify reports of a Nepali national among the victims & will provide all necessary assistance.
— K P Sharma Oli (@kpsharmaoli) April 23, 2025
पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये दोन परदेशी नागरिकांचा देखील समावेश आहे. यामध्ये एक नागरिक संयुक्त अरब अमिराती (UAE) आणि एक नागरिक शेजारी देश नेपाळचा आहे. मंगळवारी (22 एप्रिल) दुपारी हा हल्ला झाला. 5 ते 6 हल्लेखोरांनी अचानक पर्यटकांवर गोळ्या झाडण्यास सुरुवात केली. त्यांनी लोकांना त्यांचा धर्म विचारला आणि त्यांच्यावर गोळी झाडली. या हल्ल्याची जबाबदारी पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटना लष्कर-ए-तैयबा (TRF) म्हणजेच ‘द रेझिस्टंट्स फ्रंट’ ने घेतली आहे.
या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर गुप्तचर यंत्रणांनी भारत-नेपाळ सोनौली सीमेवर सुरक्षा यंत्राणेत वाढ केली आहे. कडक सुरक्षा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या भागात दहशतवाद्यांची घुसखोरी रोखण्यासाठी सुरक्षा रक्षकांना सीमा ओलांडण्यापूर्वी ओळख तपासण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
महाराजंगचे पोलिस अधिक्षकांनी माध्यमांना सांगितले आहे की, भारत-नेपाळ सीमेवर सुरक्षा मजबूत करण्यात आली आहे. दहशतवाद्यांची घसखोरी रोखण्यासाठी SSB ने नेपाळला जाणाऱ्या मार्गावर CCTV कॅमेरे आणि ड्रोन तैनात केला आहेत. सध्या या हल्ल्यामुळे भारतात भीतीचे वातावरण पसरले आहे.