चोराच्या उल्टया बोंबा! जम्मू काश्मीरमधील हल्ल्यावर पाकिस्तानच्या परराष्ट्रीय मंत्रालयाने व्यक्त केल्या संवेदना (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
इस्लामाबाद: जम्मू आणि काश्मीरमध्ये पुन्हा एकदा दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. जम्मू-काश्मीरच्या प्रमुख पर्यंटन स्थळ पहलगाम येथे 5 ते 6 दहशतवाद्यांनी अचानक हल्ला केला. दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात 26 जणांचा मृत्यू झाला आहे. तर डझनभर लोक जखमी झाले आहेत. या हल्ल्यामुळे संपूर्ण देशात भीतीचे वातावरण पसरलेले आहे. या हल्ल्याची जबाबदारी पाकिस्तानच्या दहशतवादी गट लष्कर-ए-तोयबा (TRF) म्हणजेच ‘द रेझिस्टंट्स फ्रंट’ ने घेतली आहे. दरम्यान या हल्ल्यावर पाकिस्तानची प्रतिक्रिया समोर आली आहे.
पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने एक निवेदन जारी केले आहे. या निवेदनात परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे की, अनंतनाग जिल्ह्यातील हल्ल्यात पर्यंटकांच्या जीवीतहानीबद्दल आम्हाला चिंता आहे. आम्ही मृतांच्या कुटुंबियांबद्दल संवेदना व्यक्त करत आणि जखमींच्या लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करतो.
🔊: Statement by the Spokesperson Regarding Attack in Anantnag District of the Indian Illegally Occupied Jammu and Kashmir.
🔗⬇️https://t.co/hFst99nk3d pic.twitter.com/jesywt2XBQ
— Ministry of Foreign Affairs – Pakistan (@ForeignOfficePk) April 23, 2025
पाकिस्तानचे हे विधान अशा वेळी करण्यात आले आहे जेव्हा या हल्ल्याची जबाबदारी लष्कर-ए-तैयबा म्हणजेच द रेझिस्टन्स फ्रंट’ (TRF) या संघटनेने घेतली आहे. ही संघटना हाफिज सईच्या नेतृत्वाखाली कार्य करते. ही पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटना आहे. हाफिज सईद हा मुंबई 26/11 च्या दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमांइड आहे.
दरम्यान काही आंतरराष्ट्रीय तज्ञांच्या म्हणण्यानुसार, पाकिस्तान विधान हे दुतोंडी असल्यासारखे वाटते. यामागचे कारण पाकिस्तानमधून दहशतवाद्यांना पाठिंबा आणि प्रशिक्षण दिले जात असल्याचा आरोप गेल्या अनेक दशकांपासून होत आहे. तज्ञांच्या मते, पाकिस्तानने जारी केलेल्या निवेदनात हल्ल्यासाठी जबाबदार असलेल्यांची नावे घेतली नाही. यामुळे पाकिस्तानचे दुप्पटी धोरण उघडपणे समोर आले आहे.
असेही सांगण्यात येत आहे की, जम्मू-काश्मीरमधील पहलगाम हल्ल्याचा कट पाकिस्तानच्या रावेलकोटमध्ये रचण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हल्लेखोर घुसलेल्या ठिकाणाचा मार्ग आणि नकाशाची माहिती समोर आली आहे. दहशतवाद्यांनी पीर जंजाल टेकड्या ओलांडत राजौरीतून चतरु आणि वाधवन मार्गे पहलगाममध्ये प्रवेश केल्याचे सांगितले जात आहे.
पहलगाममधील दहशतवादी हल्ला झाल्यानंतर पाकिस्तानमदून पहिली प्रतिक्रिया ही पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांनी दिली होती. त्यांनी म्हटले होते की, या हल्ल्यामागे पाकिस्तानचा काही एक हात नाही. हा हल्ला काश्मीरमधील लोकांनीच घडवून आणला आहे आणि तेथील सरकार लोकांचे हक्क हिरावून घेत आहेत. यामुळे त्यांच्याविरोधात बंड पुकारला जात आहे.