Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

World War 3: युद्धाचा नवा टप्पा! ‘मोठे Surprise मिळणार …’ नेतन्याहू यांचा VIDEO संदेशाद्वारे इराणला धडकी भरवणारा इशारा

US-Israel Attack Iran: इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी एका व्हिडिओ संदेशात गाझा, लेबनॉन, सीरिया आणि इराणविरुद्धच्या कारवाईचा उल्लेख करून त्यांच्या नागरिकांच्या धाडसाचे कौतुक केले.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Mar 08, 2026 | 08:13 AM
benjamin netanyahu video message iran israel war big surprise threat

benjamin netanyahu video message iran israel war big surprise threat

Follow Us
Close
Follow Us:
  • नेतन्याहूंचा इशारा
  • नवा लष्करी टप्पा
  • राष्ट्रीय एकतेचे आवाहन

Benjamin Netanyahu video message Iran war : मध्यपूर्वेतील युद्धाची (US-Israel Attack Iran) आग आता विझण्याऐवजी अधिकच भडकताना दिसत आहे. शनिवारी ७ मार्च रोजी रात्री उशिरा एका विशेष पत्रकार परिषदेत आणि व्हिडिओ संदेशाद्वारे इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू (Benjamin Netanyahu) यांनी इराणसह त्यांच्या सर्व शत्रूंना एक कडक आणि भीतीदायक इशारा दिला आहे. “आम्ही अद्याप थांबलेलो नाही, लष्करी कारवाईचा पुढचा टप्पा शत्रूंना मोठे ‘सरप्राईज’ देणारा असेल,” असे विधान नेतन्याहू यांनी केल्यामुळे संपूर्ण जगात खळबळ उडाली आहे.

चार आघाड्यांवर इस्रायलचा प्रहार

पंतप्रधान नेतन्याहू यांनी आपल्या भाषणात स्पष्ट केले की, इस्रायल सध्या एकाच वेळी गाझा, लेबनॉन, सीरिया आणि इराण या चार आघाड्यांवर आपल्या शत्रूंविरुद्ध निकराचा लढा देत आहे. गेल्या आठवडाभरात या भागात करण्यात आलेल्या लष्करी कारवायांमध्ये इस्रायलला मोठे यश मिळाल्याचा दावा त्यांनी केला. विशेषतः इराणशी संबंधित लष्करी लक्ष्यांवर करण्यात आलेल्या हल्ल्यांमुळे तेहरानचे मोठे नुकसान झाले असून, यामुळे मध्यपूर्वेतील लष्करी हालचाली कमालीच्या वाढल्या आहेत.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Strait of Hormuz: ‘मृत्यूच्या मुखात’ Pushpakआणि Parimalची एन्ट्री; इराणकडून भारतीय जहाजांना सुरक्षा कवच; झाला गुप्त करार?

नागरी अशांतता आणि लष्करी आव्हान

नेतन्याहू यांनी मान्य केले की, गेल्या काही दिवसांत देशाला अंतर्गत नागरी अशांतता आणि बाह्य लष्करी आव्हाने अशा दोन्ही संकटांचा सामना करावा लागला आहे. मात्र, अशा कठीण प्रसंगी इस्रायली नागरिक डगमगले नाहीत. “लोक मजबूत राहिले आहेत आणि त्यांनी सुरक्षा दलांना पूर्ण पाठिंबा दिला आहे,” असे म्हणत त्यांनी नागरिकांच्या धाडसाचे आणि एकतेचे तोंडभरून कौतुक केले. देशाची सुरक्षा ही सध्या सर्वोच्च प्राथमिकता असल्याचे त्यांनी पुन्हा एकदा अधोरेखित केले.

VIDEO | Jerusalem: Benjamin Netanyahu addresses a press conference. (Source: Third Party)#Jerusalem pic.twitter.com/LSAyKJMsMr — Press Trust of India (@PTI_News) March 7, 2026

credit – social media and Twitter

संघर्ष अद्याप संपलेला नाही!

नेतन्याहू यांचा संदेश केवळ इराणसाठी नसून तो जागतिक समुदायासाठीही एक इशारा आहे. त्यांनी स्पष्ट संकेत दिले आहेत की संघर्ष अद्याप संपलेला नाही. “लष्करी कारवाईचा पुढील टप्पा नजीकच्या भविष्यात सुरू होऊ शकतो,” असे सांगून त्यांनी एका मोठ्या लष्करी मोहिमेची पूर्वकल्पना दिली आहे. हे ‘सरप्राईज’ नेमके काय असेल? इस्रायल थेट इराणच्या उरल्यासुरल्या अणुप्रकल्पांना लक्ष्य करणार की सायबर युद्ध पुकारणार? याकडे आता संरक्षण तज्ज्ञांचे लक्ष लागले आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : World War 3: ‘तेहरानमध्ये आग आणि विनाश!’ इस्रायलच्या 80 फायटर जेट्सचा इराणवर महाविध्वंसक प्रहार

मध्यपूर्वेतील परिस्थिती संवेदनशील

सध्या इराण आणि इस्रायलमध्ये सुरू असलेले हे युद्ध जागतिक अर्थव्यवस्थेवरही परिणाम करत आहे. कच्च्या तेलाच्या किमती आणि पुरवठा साखळी विस्कळीत होण्याची भीती असतानाच नेतन्याहू यांचे हे आक्रमक विधान आगीत तेल ओतण्याचे काम करत आहे. जगातील प्रमुख देश या संघर्षावर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. येत्या २४ ते ४८ तासांत इस्रायलकडून एखादी मोठी कारवाई होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: नेतन्याहू यांनी इराणला कोणते 'सरप्राईज' देणार असल्याचे म्हटले आहे?

    Ans: नेतन्याहू यांनी लष्करी कारवाईच्या पुढील टप्प्याबाबत बोलताना हे विधान केले. याचे स्वरूप गुप्त असले तरी, ते इराणच्या महत्त्वाच्या लष्करी किंवा अणुप्रकल्पांवरील मोठा हल्ला असू शकतो.

  • Que: इस्रायल सध्या कोणकोणत्या आघाड्यांवर युद्ध लढत आहे?

    Ans: पंतप्रधानांच्या म्हणण्यानुसार, इस्रायल सध्या गाझा, लेबनॉन, सीरिया आणि इराण या चार आघाड्यांवर आपल्या शत्रूंचा मुकाबला करत आहे.

  • Que: नेतन्याहू यांनी इस्रायली नागरिकांना काय आवाहन केले आहे?

    Ans: त्यांनी नागरिकांना अंतर्गत मतभेद बाजूला सारून एकजूट राहण्याचे आणि देशाच्या सुरक्षा दलांना पूर्ण पाठिंबा देण्याचे आवाहन केले आहे.

Web Title: Benjamin netanyahu video message iran israel war big surprise threat

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 08, 2026 | 08:13 AM

Topics:  

  • benjamin netanyahu
  • Israel Attack
  • US-Israel Iran War
  • World War 3

संबंधित बातम्या

US Iran War : हिंद महासागरात इराणची नाकाबंदी? IRIS Dena बुडाल्यानंतर दोन युद्धनौका थेट भारतात…
1

US Iran War : हिंद महासागरात इराणची नाकाबंदी? IRIS Dena बुडाल्यानंतर दोन युद्धनौका थेट भारतात…

The AI War: बापरे! खामेनींचा पत्ता एआयने शोधला? अमेरिकन सैन्याच्या ‘Claude AI’ने ‘असा’ मोडला इराणचा लष्करी कणा मोडला
2

The AI War: बापरे! खामेनींचा पत्ता एआयने शोधला? अमेरिकन सैन्याच्या ‘Claude AI’ने ‘असा’ मोडला इराणचा लष्करी कणा मोडला

World War 3: ‘तेहरानमध्ये आग आणि विनाश!’ इस्रायलच्या 80 फायटर जेट्सचा इराणवर महाविध्वंसक प्रहार
3

World War 3: ‘तेहरानमध्ये आग आणि विनाश!’ इस्रायलच्या 80 फायटर जेट्सचा इराणवर महाविध्वंसक प्रहार

Strait of Hormuz: ‘मृत्यूच्या मुखात’ Pushpakआणि Parimalची एन्ट्री; इराणकडून भारतीय जहाजांना सुरक्षा कवच; झाला गुप्त करार?
4

Strait of Hormuz: ‘मृत्यूच्या मुखात’ Pushpakआणि Parimalची एन्ट्री; इराणकडून भारतीय जहाजांना सुरक्षा कवच; झाला गुप्त करार?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.