Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 23 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Strait of Hormuz: भारतासाठी मोठी बातमी! होर्मुजच्या सामुद्रधुनीतून भारतीय जहाजांना ‘ग्रीन सिग्नल’; युद्धातही इराणने जपली मैत्री

श्चिम आशियातील तणावादरम्यान इराणने भारतीय जहाजांना 'स्ट्रेट ऑफ होर्मुज'मधून सुरक्षित प्रवासाचे आश्वासन दिले आहे. इराणने भारताला आपला महत्त्वाचा मित्र राष्ट्र म्हटले आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Mar 13, 2026 | 08:47 PM
भारतासाठी मोठी बातमी! होर्मुजच्या सामुद्रधुनीतून भारतीय जहाजांना 'ग्रीन सिग्नल' (Photo Credit- X)

भारतासाठी मोठी बातमी! होर्मुजच्या सामुद्रधुनीतून भारतीय जहाजांना 'ग्रीन सिग्नल' (Photo Credit- X)

Follow Us
Follow Us:
  • भारतासाठी मोठी बातमी!
  • होर्मुजच्या सामुद्रधुनीतून भारतीय जहाजांना ‘ग्रीन सिग्नल’
  • युद्धातही इराणने जपली मैत्री
Strait of Hormuz: पश्चिम आशियातील वाढता तणाव आणि पर्शियन गल्फमधील युद्धाच्या सावटाखाली भारतासाठी अत्यंत दिलासादायक बातमी समोर आली आहे. जगातील सर्वात महत्त्वाच्या सागरी मार्गांपैकी एक असलेल्या ‘स्ट्रेट ऑफ होर्मुज’ (Strait of Hormuz) मधून भारतीय जहाजांना सुरक्षित प्रवासाची परवानगी मिळण्याचे संकेत इराणने दिले आहेत. इराणचे भारतातील राजदूत मोहम्मद फतहाली यांनी यासंदर्भात महत्त्वपूर्ण विधान केले असून, “भारत हा इराणचा जुना आणि विश्वासू मित्र आहे,” असे म्हटले आहे.

‘भारत आमचा मित्र’; इराणची सकारात्मक भूमिका

पत्रकारांशी संवाद साधताना राजदूत फतहाली यांनी स्पष्ट केले की, भारत आणि इराणचे संबंध केवळ राजनैतिक नसून ते ऐतिहासिक मैत्रीवर आधारित आहेत. सध्याच्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर जेव्हा त्यांना भारतीय जहाजांच्या सुरक्षेबाबत विचारण्यात आले, तेव्हा त्यांनी सकारात्मक संकेत दिले. “पुढील काही तासांत यावर अधिक स्पष्टता येईल, परंतु भारताला या मार्गावरून प्रवास करताना कोणतीही अडचण येणार नाही, यासाठी इराण सकारात्मक आहे,” असे त्यांनी नमूद केले.

#WATCH | Delhi: On giving safe passage to India, Iran’s Ambassador to India, Mohammad Fathali, says, “… Yes, because India is our friend. You will see it within two or three hours. We believe that Iran and India share common interests in the region…” pic.twitter.com/twTsE1Bjhv — ANI (@ANI) March 13, 2026

प्रादेशिक हित आणि समान विचारसरणी

इराणच्या राजदूतांनी दोन्ही देशांमधील धोरणात्मक भागीदारीवर भर दिला. ते म्हणाले की, भारत आणि इराण यांचे प्रादेशिक हितसंबंध सामायिक आहेत. अनेक आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर दोन्ही देशांची विचारसरणी समान राहिली आहे. कठीण काळातही दोन्ही देशांनी एकमेकांवर असलेला विश्वास ढळू दिला नाही, हेच या मैत्रीचे सर्वात मोठे यश असल्याचे त्यांनी सांगितले.

Strait of Hormuz Tension : आखातात 23000 भारतीय खलाशी, होमुर्जच्या सामुद्रधुनीत 24 जहाजे, केंद्राने परिस्थितीचा दिला आढावा

संकट काळात भारताने दिलेली साथ

मोहम्मद फतहाली यांनी आपल्या भाषणात भारताने वेळोवेळी केलेल्या मदतीचा कृतज्ञतेने उल्लेख केला. “भारताने अनेक कठीण प्रसंगांत इराणला सहकार्य केले आहे. विशेषतः युद्धोत्तर परिस्थितीमध्ये भारताकडून मिळालेली मदत इराण कधीही विसरणार नाही,” असे ते म्हणाले. या जुन्या ऋणांुळेच आजच्या जागतिक अस्थिरतेच्या वातावरणातही इराण भारताच्या बाजूने उभा असल्याचे दिसून येत आहे.

‘स्ट्रेट ऑफ होर्मुज’चे सामरिक महत्त्व

जगातील एकूण कच्च्या तेलाच्या पुरवठ्यापैकी मोठा हिस्सा या सागरी मार्गातून जातो. भारतासाठी हा मार्ग जीवनवाहिनीसारखा आहे, कारण भारताच्या तेल आयातीचा मोठा वाटा याच सामुद्रधुनीतून येतो. या मार्गावर झालेली थोडीही अडचण भारताच्या इंधन दरांवर थेट परिणाम करू शकते. केवळ तेलच नव्हे, तर नैसर्गिक वायू आणि इतर व्यापारी मालाची वाहतूकही याच मार्गावरून होते.

जागतिक बाजारपेठेवर होणारा परिणाम

पश्चिम आशियातील संघर्षामुळे अनेक जागतिक शिपिंग कंपन्यांनी या मार्गावरून जाण्यास धास्ती घेतली आहे. अशा परिस्थितीत इराणने भारताला दिलेला ‘ग्रीन सिग्नल’ हा केवळ मैत्रीचा पुरावा नसून, भारताच्या वाढत्या जागतिक प्रभावाचा आणि यशस्वी परराष्ट्र धोरणाचा विजय मानला जात आहे. यामुळे भारताचा ऊर्जा पुरवठा सुरळीत राहण्यास मोठी मदत होणार आहे.

Middle East War: ‘खामेनेई परत आले?’ इराणच्या ‘त्या’ AI व्हिडिओने अमेरिकेचे धाबे दणाणले; सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल!

Web Title: Big news for india indian ships get green signal to pass through strait of hormuz

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 13, 2026 | 08:47 PM

Topics:  

  • india
  • iran
  • Iran US Israel
  • Iran-Israel War

संबंधित बातम्या

Itel A300C Launch: वारंवार चार्जिंगची कटकट संपणार? 12GB पर्यंत RAM, Android 16 Go अन्…; 6000mAh बॅटरीसह itel A300C बाजारात
1

Itel A300C Launch: वारंवार चार्जिंगची कटकट संपणार? 12GB पर्यंत RAM, Android 16 Go अन्…; 6000mAh बॅटरीसह itel A300C बाजारात

Iran Economic Crisis : युद्धाच्या आगीत उध्वस्त झाला इराण; GDP 10 टक्क्यांनी घसरला, महागाई भारतापेक्षा 15 पट जास्त
2

Iran Economic Crisis : युद्धाच्या आगीत उध्वस्त झाला इराण; GDP 10 टक्क्यांनी घसरला, महागाई भारतापेक्षा 15 पट जास्त

UNGA 2026 : युद्धाच्या छायेत मोठी राजनैतिक घडामोड; UN महासभेत ट्रम्प-इराण राष्ट्राध्यक्षांची होणार भेट? जगाचे लक्ष न्यूयॉर्ककडे
3

UNGA 2026 : युद्धाच्या छायेत मोठी राजनैतिक घडामोड; UN महासभेत ट्रम्प-इराण राष्ट्राध्यक्षांची होणार भेट? जगाचे लक्ष न्यूयॉर्ककडे

UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! नव्या MDR रचनेमुळे पेमेंट सिस्टीममध्ये काय बदलणार?
4

UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! नव्या MDR रचनेमुळे पेमेंट सिस्टीममध्ये काय बदलणार?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.