Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘या’ इटालियन जर्नलिस्टची इराणी तुरुंगातून सुटका; जॉर्जिया मेलोनी यांच्या प्रयत्नांमुळे लवकरच परतणार मायदेशी

इराणच्या इविन तुरुंगांतून सुटका झाल्यानंतर आता इटालियनपत्रकार सेसिलिया साला आता मायदेशी परतत आहेत. त्यांच्या सुटका इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Jan 08, 2025 | 07:20 PM
'या' इटालियन जर्नलिस्टची इराणी तुरुंगातून सुटका; जॉर्जिया मेलोनी यांच्या प्रयत्नांमुळे लवकरच परतणार मायदेशी

'या' इटालियन जर्नलिस्टची इराणी तुरुंगातून सुटका; जॉर्जिया मेलोनी यांच्या प्रयत्नांमुळे लवकरच परतणार मायदेशी

Follow Us
Close
Follow Us:

रोम: इराणच्या इविन तुरुंगांतून सुटका झाल्यानंतर आता इटालियनपत्रकार सेसिलिया साला आता मायदेशी परतत आहेत. त्यांच्या सुटका इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. 29 वर्षीय सेसिलिया साला 19 डिसेंबर रोजी तेहरानमध्ये पत्रकार म्हणून अधिकृत व्हिसासह काम करत असताना अटक झाली होती. त्यांना सुमारे दोन आठवडे एकांतवासात ठेवण्यात आले होते. त्यानंतर इटलीच्या पंतप्रधानांनी त्यांच्या सुटकेसाठी इराणच्या न्यायालयात याचिका दाखल केली होती.

माल्पेंसा यांना अटक

सेसिलिया साला यांना अटक होण्याच्या तीन दिवस आधी इराणी व्यापारी मोहम्मद अबेदिनी यांना इटलीतील मिलानच्या माल्पेंसा विमानतळावर अटक करण्यात आली होती. अमेरिकेच्या आदेशानुसार झालेल्या या अटकेचा अबेदिनी यांच्यावर आरोप आहे की, त्यांनी 2024 मध्ये जॉर्डनमध्ये झालेल्या ड्रोन हल्ल्यासाठी सुटे भाग पुरवले होते. या हल्ल्यात तीन अमेरिकी सैनिकांचा मृत्यू झाला होता. साला यांच्या अटकेचा अबेदिनी प्रकरणाशी थेट संबंध असल्याचे अद्याप सिद्ध झालेले नाही.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- 9/11 हल्ल्याशी संबंधित अमेरिकाचा मोठा निर्णय; जाणून घ्या काय आहे संपूर्ण प्रकरण

मेलोनी यांची सोशल मीडिया पोस्ट

पंतप्रधान मेलोनी यांनी साला यांच्या सुटकेची माहिती बुधवारी(दि. 8 जानेवारी) जाहीर केली. त्यांनी सांगितले की, इटलीच्या कूटनीतिक आणि गुप्तचर विभागांनी यासाठी अथक प्रयत्न केले आहेत. मेलोनी यांनी एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर यासंबंधित पोस्ट लिहिलताना म्हटले की, “सेसिलिया साला मायदेशी परत येत आहेत. त्यांची सुटका झाल्याचे त्यांच्या पालकांना कळवण्यात मला खूप आनंद झाला.”

È in volo l’aereo che riporta a casa Cecilia Sala da Teheran.
Grazie a un intenso lavoro sui canali diplomatici e di intelligence, la nostra connazionale è stata rilasciata dalle autorità iraniane e sta rientrando in Italia. Ho informato personalmente i genitori della giornalista…
— Giorgia Meloni (@GiorgiaMeloni) January 8, 2025

पत्रकारांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह

इराणच्या ईविन तुरुंगात साला यांच्या अटकेमुळे पत्रकारांच्या सुरक्षिततेविषयी चिंता व्यक्त करण्यात आली होती. हा तुरुंग राजकीय कैद्यांसाठी आणि विदेशी नागरिकांसाठी प्रसिद्ध असून, येथे अनेकांना जाचक परिस्थितीत ठेवले जाते. अलीकडच्या काळात इराणमध्ये परदेशी नागरिक आणि द्वैतराष्ट्रीय व्यक्तींना अटक करण्याच्या घटना वाढल्या आहेत. मानवाधिकार गटांचे म्हणणे आहे की, इराण अशा अटकांचा वापर राजकीय तोडपाणी साधण्यासाठी करतो. मात्र, इराणने हे आरोप फेटाळले आहेत.

इटलीसाठी आनंदाचा क्षण

सेसिलिया साला यांच्या सुटकेने पंतप्रधान मेलोनी यांच्या नेतृत्वाखाली इटलीच्या कूटनीतीचे यश अधोरेखित केले आहे. परंतु, यासोबतच अशा असुरक्षित ठिकाणी काम करणाऱ्या पत्रकारांच्या सुरक्षिततेचा मुद्दाही चर्चेत आला आहे. सेसिलिया साला यांची सुखरूप परतफेड हा इटलीसाठी आनंदाचा क्षण आहे. त्याच वेळी, त्यांनी पत्रकारांना होणाऱ्या धोक्यांची आणि त्यांच्यासाठी अधिक सुरक्षिततेची गरज अधोरेखित केली आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- Bangladesh Politics: बांगलादेशचा शेख हसीनाविरोधात डाव फसला; भारत सरकारने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

Web Title: Big win for meloni italian journalist cecilia sala released from iranian prison nrss

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 08, 2025 | 07:20 PM

Topics:  

  • iran
  • Italy
  • World news

संबंधित बातम्या

२ लाख घ्या अन् अमेरिका सोडा…; कोणाला दिली ट्रम्प प्रशासनाने ही ऑफर? काय आहे प्रकरण? 
1

२ लाख घ्या अन् अमेरिका सोडा…; कोणाला दिली ट्रम्प प्रशासनाने ही ऑफर? काय आहे प्रकरण? 

Syria News : सीरियाच्या माजी राष्ट्राध्यक्षांची हत्या करण्याचा प्रयत्न; रशियामध्ये विषप्रयोग झाल्याची चर्चा
2

Syria News : सीरियाच्या माजी राष्ट्राध्यक्षांची हत्या करण्याचा प्रयत्न; रशियामध्ये विषप्रयोग झाल्याची चर्चा

ब्रिटनचे पंतप्रधान भारत दौऱ्यावर येणार; दोन्ही देशांच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान संबंधांना मिळणार नवी दिशा
3

ब्रिटनचे पंतप्रधान भारत दौऱ्यावर येणार; दोन्ही देशांच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान संबंधांना मिळणार नवी दिशा

नेपाळमध्ये मुसळधार पावसाचा इशारा जारी; भूस्खलनाच्या भीतीने काठमांडूत वाहतूकीवर बंदी
4

नेपाळमध्ये मुसळधार पावसाचा इशारा जारी; भूस्खलनाच्या भीतीने काठमांडूत वाहतूकीवर बंदी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.