9/11 हल्ल्याशी संबंधित अमेरिकाचा मोठा निर्णय; जाणून घ्या काय आहे संपूर्ण प्रकरण(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
वॉश्गिंटन: अमेरिकेतील 9/11 हल्ल्याचा मुख्य सूत्रधार खालिद शेख मोहम्मद याच्याशी संबंधित न्यायालयीन प्रक्रियेत काही महत्त्वाच्या घडामोडी घडल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, अमेरिकेच्या न्याय विभागाने कोलंबिया जिल्ह्यातील संघीय अपीलीय न्यायालयात एक प्रतिज्ञापत्र सादर केले असून यामध्ये मोहम्मद आणि त्याच्या दोन सह-आरोपींच्या दोष स्वीकारण्याच्या याचिकेवर स्थगिती देण्याची विनंती केली आहे. या याचिकेच्या स्वीकारामुळे त्यांना मृत्युदंडाच्या शिक्षेतून सुटका मिळू शकली असती असे म्हटले जात आहे.
न्याय विभागाच्या या प्रतिज्ञापत्रानुसार, जर हे दोष स्वीकारले गेले असते, तर सरकारला सार्वजनिक सुनावणी आणि या गंभीर गुन्ह्यांसाठी मृत्युदंडाची मागणी करण्याची संधी मिळाली नसती. बचाव पक्षाने या याचिकेवर चर्चा केली होती, परंतु नंतर ती नाकारण्यात आली. आरोपींच्या वकिलांनी दावा केला आहे की, ही चर्चा कायदेशीर होती आणि ती मान्य केली पाहिजे.
आरोपींना मृत्यूदंडाची शिक्षा व्हावी
या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर, 9/11 हल्ल्यात मृत्यू पावलेल्या सुमारे 3,000 लोकांच्या काही कुटुंबीयांनी क्यूबातील ग्वांतानामो बे येथील अमेरिकी नौदल तळावर मोहम्मदच्या दोष स्वीकारण्याच्या याचिकेवर सुनावणीसाठी उपस्थिती लावली. या समझोत्याबाबत कुटुंबीयांमध्ये मतभेद आहेत. तर काहींनी या दीर्घकाळ चाललेल्या न्यायप्रक्रियेसाठी हे सर्वोत्तम समाधान असल्याचे म्हटले आहे, तर काहींनी आरोपींना मृत्युदंडाची शिक्षा देण्यासाठी खटला चालवण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
हल्ल्यात 3,000 लोकांचा मृत्यू
खालिद शेख मोहम्मद हा 9/11 हल्ल्याचा मुख्य सूत्रधार मानला जातो. 2003 साली पाकिस्तानमध्ये त्याला अटक करण्यात आली होती. त्यानंतर सीआयएच्या गोपनीय ठिकाणी त्याची चौकशी करण्यात आली. मीडिया रिपोर्टनुसार, या हल्ल्यामध्ये न्यूयॉर्कमधील वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या जुळ्या इमारती उद्ध्वस्त झाल्या आणि सुमारे 3,000 लोकांचा मृत्यू झाला होता.
2024 मध्ये मृत्यूदंडाची शिक्षा माफ
2024 मध्ये, अमेरिकी संरक्षण सचिव लॉयड ऑस्टिन यांनी मोहम्मद आणि त्याच्या दोन सहआरोपींशी झालेल्या याचिकेला रद्द केले, यामुळे त्यांच्या मृत्युदंडाची शिक्षा पुन्हा बहाल झाली. या निर्णयामुळे हल्ल्यातील पीडितांच्या कुटुंबीयांच्या भावना दुखवल्या गेल्या. सध्याच्या घडामोडींमध्ये, बायडेन प्रशासनाने संघीय अपीलीय न्यायालयाला विनंती केली आहे की, मोहम्मद आणि त्याच्या सहआरोपींच्या दोष स्वीकारण्याच्या प्रक्रियेवर स्थगिती द्यावी, यामुळे मृत्युदंडाची शिक्षा कायम राहील. या प्रकरणातील न्यायप्रक्रिया आणि संबंधित घडामोडी भविष्यातही चर्चेचा विषय राहतील.