Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 11 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

DGMA : Black Sea मध्ये भारतीय खलाशांवर रशियन हल्ले; युक्रेनच्या परराष्ट्र मंत्र्यांचे एस. जयशंकर यांना विशेष पत्र अन् गंभीर इशारा

युक्रेनचे परराष्ट्र मंत्री अँड्री त्सिबिहा यांनी काळ्या समुद्रात भारतीय खलाशांवर झालेल्या हल्ल्यांसंदर्भात परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांना पत्र लिहिले आहे. आपल्या पत्रात त्यांनी काळ्या समुद्रात शहीद झालेल्या भारतीय खलाशांबद्दल शोक व्यक्त केला आहे.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Jul 27, 2026 | 06:00 PM
black sea attack indian seafarers ukraine foreign minister letter s jaishankar marathi news

black sea attack indian seafarers ukraine foreign minister letter s jaishankar marathi news

Follow Us
Follow Us:
  • युक्रेनच्या परराष्ट्र मंत्र्यांचे एस. जयशंकर यांना पत्र
  • नागरी जहाजांवरील हल्ल्यांसाठी रशिया जबाबदार
  • भारताचे डीजीएमए (DGMA) परिपत्रक आणि सुरक्षा इशारा

रशिया आणि युक्रेन (Russia and Ukraine war) दरम्यान सुरू असलेल्या भीषण युद्धाची झळ आता आंतरराष्ट्रीय सागरी मार्गांवर काम करणाऱ्या निष्पाप भारतीय खलाशांना बसू लागली आहे. काळ्या समुद्रात (Black Sea) व्यापारी जहाजांवर आणि सागरी पायाभूत सुविधांवर झालेल्या हल्ल्यांमध्ये भारतीय खलाशांचा जीव गेल्याच्या पार्श्वभूमीवर युक्रेनने अत्यंत महत्त्वाची भूमिका घेतली आहे. युक्रेनचे परराष्ट्र मंत्री अँड्री त्सिबिहा (Andrii Sybiha) यांनी भारताचे परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांना एक औपचारिक पत्र लिहून शहीद झालेल्या भारतीय खलाशांबद्दल तीव्र शोक व्यक्त केला आहे. या पत्रात युक्रेनने काळ्या समुद्रातील या भीषण परिस्थितीसाठी आणि नागरी जहाजांवरील हल्ल्यांसाठी थेट रशियाला जबाबदार धरले आहे.

युक्रेनच्या परराष्ट्र मंत्रालयाने आणि भारतातील युक्रेनियन दूतावासाने जारी केलेल्या अधिकृत निवेदनानुसार, रशियन आक्रमणामुळे काळ्या समुद्रातील सुरक्षा परिस्थिती अत्यंत चिंताजनक झाली आहे. २०२५ आणि २०२६ या कालावधीत काळ्या समुद्रातील रशियन लष्करी कारवाईमुळे अनेक नागरी खलाशी, नौदल कर्मचारी आणि व्यापारी जहाजांवरील कामगारांना आपला जीव गमवावा लागला आहे. युक्रेनच्या सागरी निर्यात मार्गाचा वापर करणाऱ्या परदेशी जहाजांना आणि बंदरांना रशियाकडून सातत्याने लक्ष्य केले जात असल्याचे युक्रेनने स्पष्ट केले आहे.

भारतासह आंतरराष्ट्रीय भागीदारांना सुरक्षेचा इशारा

युक्रेनच्या दूतावासाने नमूद केले आहे की, त्यांनी या संपूर्ण संघर्षाच्या काळात भारतासह आपल्या सर्व आंतरराष्ट्रीय भागीदारांना रशियन आक्रमकतेमुळे निर्माण होणाऱ्या धोक्यांबद्दल सातत्याने पूर्वकल्पना दिली होती. काळ्या समुद्रासह अझोवच्या समुद्रात (Sea of Azov) व्यावसायिक आणि नागरी जहाजांची वाहतूक धोक्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय सागरी संघटना (IMO) कडे देखील युक्रेनने १२ जून आणि २६ जून २०२६ रोजी जारी केलेल्या परिपत्रकांद्वारे ही बाब अधिकृतपणे मांडली आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Terrorism News: पाकिस्तानात ‘इत्तिहाद-उल-मुजाहिदीन’चा थेट TTPला शह; हायटेक ड्रोन अन् आयईडी हल्ल्यांनी पाकिस्तान लष्कर हादरले

याशिवाय, युक्रेनने रशियाच्या लष्करी पुरवठा साखळीवर आणि लॉजिस्टिक नेटवर्कवर निर्बंध आणण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर काय पावले उचलली जात आहेत, याची माहिती भारताला दिली आहे. रशियाला मिळणारा लष्करी पुरवठा रोखणे आणि काळ्या समुद्रात आंतरराष्ट्रीय नियमांचे पालन सुनिश्चित करणे हेच जागतिक सागरी सुरक्षेसाठी अत्यंत आवश्यक असल्याचे युक्रेनचे म्हणणे आहे.

भारताच्या डीजीएमए (DGMA) परिपत्रकाची युक्रेनकडून दखल

या गंभीर परिस्थितीची दखल घेत भारत सरकारच्या सागरी प्रशासन महासंचालनालयाने (DGMA) २३ जुलै २०२६ रोजी ‘परिपत्रक ४१’ (Circular 41 of 2026) जारी केले होते. यामध्ये काळ्या समुद्रातून प्रवास करणाऱ्या किंवा तेथे कार्यरत असणाऱ्या भारतीय जहाजांसाठी तसेच भारतीय खलाशी असलेल्या परदेशी जहाजांसाठी कडक सागरी सुरक्षा सूचना जारी करण्यात आल्या आहेत. युक्रेनने भारताच्या या तातडीच्या निर्णयाचे स्वागत केले असून, खलाशांच्या प्राणांचे रक्षण करण्यासाठी अशा प्रतिबंधात्मक सूचना वेळेत जारी करणे अत्यंत गरजेचे असल्याचे म्हटले आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : NISAR: इस्रो-नासाच्या ‘निसार’ उपग्रहाचा मोठा खुलासा; व्हेनेझुएला भूकंपात जमीन 2 फूट सरकली, विनाशाचा भयानक चेहरा समोर

युक्रेनच्या परराष्ट्र मंत्र्यांनी आपल्या पत्रात डॉ. एस. जयशंकर यांच्याशी लवकरात लवकर थेट संवाद साधण्याची इच्छा व्यक्त केली आहे. या प्रस्तावित बैठकीमध्ये काळ्या समुद्रातील सध्याच्या सुरक्षा परिस्थितीवर सविस्तर चर्चा केली जाईल. युक्रेनच्या मते, काळ्या समुद्रातील सागरी वाहतूक पुन्हा सुरक्षित करण्याचा एकमेव शाश्वत मार्ग म्हणजे नागरी जहाजांवरील हल्ले रोखण्यासाठी रशियावर सर्व आंतरराष्ट्रीय देशांनी एकत्र येऊन कडक दबाव आणणे हाच आहे.

Web Title: Black sea attack indian seafarers ukraine foreign minister letter s jaishankar marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 27, 2026 | 06:00 PM

Topics:  

  • Russia and Ukraine war
  • S.Jaishankar News
  • World news

संबंधित बातम्या

Sumatran Tiger Cubs: अत्यंत दुर्मिळ सुमात्रन वाघिणीने तीन बछड्यांना दिला जन्म; नामशेष होणाऱ्या प्रजातीसाठी ग्रीसमध्ये आशेचा किरण
1

Sumatran Tiger Cubs: अत्यंत दुर्मिळ सुमात्रन वाघिणीने तीन बछड्यांना दिला जन्म; नामशेष होणाऱ्या प्रजातीसाठी ग्रीसमध्ये आशेचा किरण

BRICS 2026: 7 वर्षांनंतर चिनी राष्ट्राध्यक्ष येणार भारतात; पंतप्रधान मोदींसोबत होणार ऐतिहासिक भेट, महासत्तांची दिल्लीत महापरिषद
2

BRICS 2026: 7 वर्षांनंतर चिनी राष्ट्राध्यक्ष येणार भारतात; पंतप्रधान मोदींसोबत होणार ऐतिहासिक भेट, महासत्तांची दिल्लीत महापरिषद

China : चीनमध्ये मोठी दुर्घटना! दुरुस्तीसाठी उभ्या असलेल्या परदेशी जहाजाला लागली आग; 30 हून अधिक जीवितहानीची भीती
3

China : चीनमध्ये मोठी दुर्घटना! दुरुस्तीसाठी उभ्या असलेल्या परदेशी जहाजाला लागली आग; 30 हून अधिक जीवितहानीची भीती

China Tick Virus : चीनमध्ये सापडला नवा धोकादायक ‘टिक नोरोव्हायरस’; तीव्र ताप आणि डोकेदुखीने नागरिक त्रस्त
4

China Tick Virus : चीनमध्ये सापडला नवा धोकादायक ‘टिक नोरोव्हायरस’; तीव्र ताप आणि डोकेदुखीने नागरिक त्रस्त

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.