ब्राझीलमधील लिमेरा येथे अत्यंत धक्कादायक अपघातात 21 वर्षीय तरुणीचा मृत्यू झाला. ती ‘बंजी जंप’ या साहसी खेळात सहभागी झाली होती. प्राथमिक चौकशीनुसार, आयोजकांनी तिला उंच पुलावरून खाली सोडण्यापूर्वी सुरक्षा दोरी जोडण्यास विसरल्याचा आरोप आहे.
घटना शनिवारी “Ponte do Esqueleto” (Skeleton Bridge) परिसरात घडली. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये प्रशिक्षक तरुणीला हवेत धरून पुलावरून सोडताना दिसतात. ती खाली पडताच उपस्थित लोक घाबरून ओरडू लागतात आणि “दोरी!” असा आवाज ऐकू येतो. व्हिडिओनुसार सुरक्षा दोरी जमिनीवरच पडलेली दिसत होती.
धक्कादायक! “हत्येसाठी कोणते शस्त्र चांगले, हातोडा की चाकू?” 18 वर्षीय मुलाने AI ला विचारले अन् मग…
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, तरुणी सुमारे 40 मीटर (सुमारे 131 फूट) उंचीवरून खाली पडली. घटनास्थळी उपस्थितांनी CPR देण्याचा प्रयत्न केला, तसेच आपत्कालीन वैद्यकीय सेवा घटनास्थळी पोहोचली. मात्र, अनेक गंभीर दुखापतींमुळे तिचा मृत्यू जागीच झाल्याचे घोषित करण्यात आले.
मृत्यूपूर्वी काही तासांपूर्वी तिने सोशल मीडियावर उत्साहाने या साहसी उडीबाबत पोस्ट केली होती. “मला पुलावरून उडी मारायला कोणत्या वेड्याने परवानगी दिली?” असे तिने विनोदी स्वरूपात लिहिले होते.
जगात सर्वात जास्त सोनं कोणत्या देशात आहे? भारताचा कितवा क्रमांक?
या प्रकरणानंतर पोलिसांनी संबंधित कर्मचाऱ्यांची चौकशी सुरू केली आहे. काही कर्मचाऱ्यांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आल्याचे स्थानिक माध्यमांनी सांगितले आहे. सुरक्षा प्रक्रियेत एवढा गंभीर निष्काळजीपणा का झाला, याचा तपास सुरू आहे.
सोशल मीडियावर या घटनेबद्दल प्रचंड संताप व्यक्त होत असून, साहसी खेळांमधील सुरक्षा नियम आणि देखरेखीबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.






