सोनं ज्याचं नाव काढताच सर्वांचे डोळे मोठे होतात, हा फक्त दागिन्यांचाच एक भाग नाही तर देशाच्या आर्थिक ताकदीचाही एक आधारस्तंभ आहे. भारतात सोन्याचे भाव झपाट्याने वाढत असतानाच तुम्हाला माहिती आहे , जगभरात सर्वात जास्त सोनं कोणत्या देशात आहे? अमेरीका, जर्मनी हे या यादित आघाडिवर असतानाच भारताचाही या यादित समावेश झाला आहे. वर्ल्ड गोल्ड कौन्सिलच्या मते, २०२५ च्या दुसऱ्या तिमाहीपर्यंत, जगातील आठ सर्वात मोठ्या सोन्याच्या साठ्यांमध्ये काही प्रमुख देशांचा समावेश असेल.
जगात सर्वात जास्त सोनं कोणत्या देशात आहे? भारताचा कितवा क्रमांक?
२०२५ दुसऱ्या तिमाहित, अमेरिकेकडे सोन्याचा सर्वात जास्त साठा आहे, याची आकडेवारी आहे ८,१३३.४६ टन सोनं. जर्मनीकडे सध्या ३,३५०.२५ टन सोन्याचा साठा आहे.
या यादित तिसऱ्या क्रमांकावर इटली हा देश आहे ज्याची आकडेवारी आहे २,४५१.८४ टन सोनं तर भारताचा जवळचा मित्र फ्रांन्सकडे २,४३७ टन सोनं आहे
येत्या काळात रशियाच्या सोन्याच्या साठात चांगलीच वाढ झाली. २००० मध्ये, रशियाकडे फक्त ३४३ टन सोने होते, जे आता २,३३५ टनांवर पोहोचले आहे.
भारताचा शेजारील देश चीनकडे २,२७९ टन सोन्याचा साठा आहे तर स्वित्झर्लंडमे १,०४० टन सोनं साठवून ठेवलं आहे
भारताविषयी बोलणं केलं तर भारताकडे सध्या ८८० टन सोनं आहे, जे आतापर्यंतचे सर्वाधिक आहे. या आकडेवारीमुळेच भारत इतका मोठा सोने साठा असलेला जगातील आठवा सर्वात मोठा देश बनला आहे.