Brazil Supreme Court orders house arrest of former President Bolsonaro
Brazil News Marathi : ब्राझिलीया : ब्राझीलमधून (Brazil) एक मोठा खळबळजनक बातमी समोर येत आहे. ब्राझीलचे माजी राष्ट्राध्यक्ष बोल्सोनारो यांना नजरकैदेत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहे. यामुळे संपूर्ण देशात मोठी खळबळ उडाली आहे. ब्राझीलच्या सर्वोच्च न्यायालयाने हा आदेश दिला आहे. त्यांच्यावर सत्तापालटचा कट रचल्याचा आरोप करण्यात आला आहे. परंतु बोल्सोनारो यांनी त्यांच्यावरील आरोपांना नाकारले आहे.
बोल्सोनारो यांचा २०२२ च्या राष्ट्रापती निवडणुकीत पराभव झाला होता. परंतु बोल्सोनारो यांनी सत्तेत टिकून राहण्यासाठी सत्तापालटाची योजना आखली होती, असा गंभीर आरोप न्यायालयाने केला आहे. शिवाय न्यायालयाने असेही सांगितले की, यापूर्वी त्यांच्यावर लावण्यात आलेल्या निर्बंधांचे देखील उल्लंघन त्यांनी केले असल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे.
Donald Trump : ट्रम्प धोक्यात? निषिद्ध क्षेत्रात घुसले विमान; अमेरिकन लष्कर हाय अलर्टवर
सध्या न्यायमूर्ती अलेक्झांड्रे डी मोरायस या प्रकरणाची तपासणी करत आहे. त्यांनी सांगितले की बोल्सोनारो यांनी तीन खासदारांमार्फत जनतेपर्यंत एक संदेश पाठवला आहे. यामध्ये न्यायालयाचे आदेश फेटाळून लागण्यात आले आहे. रविवारी (०३ ऑगस्ट) रिओ डी जेनेरियोमध्ये बोल्सोनारो समर्थकांनी रॅलीचे आयोजन केले होते.
या रॅलीदरम्यान देखील बोल्सोनारो यांनी त्यांच्या मुलाच्या फोनवरुन लोकांना संबोधित केले. बोल्सोनारो यांनी रॅलीला संबोधित करताना म्हटले की, “गुड आफ्टरूनून कोपाकबाना, गुड आफ्टरनून माय ब्राझील, ही आमच्या स्वातंत्र्याची लढाई आहे.”
दरम्यान न्यायालयाने बोल्सोनारो यांच्या कृतीला नियमांचे थेट उल्लंघन म्हटले आहे. सर्वोच्च न्यायालयाने त्यांना घरात नजबंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. तसेच त्यांच्यावर एलेक्ट्रॉनिक अँकल मॉनिटर घालण्यात आले आहे आणि घरातील सर्व मोबाईलही जप्त करण्यात आले आहे.
ब्राझीलच्या सरकारी वकिलांनी बोल्सोनारो यांच्यावर सुप्रीम कोर्टावर हल्ला करण्याची योजना आखल्याचा आरोप केला आहे. तसेच विद्यमान राष्ट्रपती लुला डी सिल्वा व न्यायमूर्ती मोरायस यांच्याही हत्येची योजना त्यांनी आखली होती, असे सरकारी वकिलांनी म्हटले आहे.
याशिवाय बोल्सोनारो यांनी लष्कराच्या मदतीने निवडणुकीच्या निकालात हस्तक्षेपण केल्याचा आरोपही त्यांच्यावर केला आहे. हे सर्व सत्तेत टिकून राहण्यासाठी करण्यात आले असल्याचे सरकारी वकिलांनी म्हटले आहे.
दरम्यान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बोल्सोनारो यांचे मित्र डोनाल्ड ट्रम्प यांनी न्यायालयाच्या या निर्णयाला तीव्र विरोध केला आहे. ट्रम्प यांनी न्यायालयाच्या निर्णयाला राजकीय सूड म्हटले आहे.