भारताचा संयम संपणार! डोनाल्ड ट्र्म्प यांचे युद्धापासून व्यापारापर्यंत बिनबुडाचे आरोप, दिले चोख प्रत्युत्तर (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
India America Relations : नवी दिल्ली : नुकतेच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी भारतावर रशियाशी व्यापार केल्यामुळे २५% टक्के कर लागू केला होता. यामुळे संपूर्ण जगाला धक्का बसला होता. दरम्यान आता पुन्हा एकदा ट्रम्प यांनी भारतावर हल्ला बोल केला आहे. ट्रम्प यांनी भारतावर आरोप केला आहे की, रशियाच्या हल्ल्यामुळे युक्रेनमध्ये लोक मरत आहेत आणि याचा भारताला कोणताही फरक पडत नाही. यामुळे आता भारताला २५% टॅरिफ द्यावेच लागणार आहे. दरम्यान ट्रम्प यांच्या या धमकी भारताने देखील चोख प्रत्युत्त र दिले आहे.
ट्रम्प यांनी त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्रुथवर केलेल्या पोस्टमध्ये, भारत केवळ मोठ्या प्रमाणात रशियाकडून तेल खरेदी करत नाही, तर जागतिक बाजारपेठांमध्ये मोठ्या नफ्यासह ते विकत देखील आहे. तसेच भारताला युक्रेनमध्ये किती लोक मरत आहे याचाही कसला फरक पडत नाही. ट्रम्प यांच्या मते भारताची हीच रणनीति रशियाच्या युक्रेनमधील सैन्य कारवायांना समर्थन देत आहे. डोनाल्ड ट्रम्प यांचे सहकारी स्टीफन मिलर यांनी देखील भारतावर अप्रत्यक्षपणे युद्धाला पाठिंबा दिल्याचा आरोप केला होता.
पाकिस्तान-इराण आले एकत्र; नव्या रेल्वे मार्गेने जोडले जाणार दोन देश, भारताचं टेन्शन वाढणार?
दरम्यान भारताने रशियाकडून तेल खरेदी करण्याबद्दल केलेल्या अमेरिका (America) आणि युरोपियन युनियनच्या (European Union) या आरोपांना तीव्र विरोध केला आहे. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने सर्व आरोप निराधार आणि अयोग्य असल्याचे म्हटले आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी, भारताला लक्ष्य केले जात आहे, हे केवळ चुकीचेच नसून दोन्ही देशांच्या शब्द आणि कृतीमध्येही तितकाच फरक आहे. जयस्वाल यांनी भारताचे रशियाशी (Russia) व्यापार संबंध केवळ स्वतंत्र आणि राष्ट्रीय हिताचे असल्याचे स्पष्ट केले आहे.
जयस्वाल यांनी सांगितले की, युक्रेन युद्धानंतर पारंपारिक पुरवठा दारांना युरोपला तेला पुरवठा वाढवला आहे, यामुळे भारताने रशियाकडून तेल खरेदी करण्यास सुरुवात केली. शिवाय खुद्द अमेरिकेने जागतिक बाजारपेठ स्थिर ठेवण्यासाठी भारताला आवाहन केले होते.
याच वेळी भारताने रशिया आणि युरोपमधील व्यापाराची आकडेवारी देखील स्पष्ट केली. २०२४ मध्ये युरोपियन यूनियन आणि रशियामध्ये ६७.७ अब्ज युरोपर्यंत व्यापार झाला आहे. यापूर्वी २०२३ मध्ये दोघांमध्ये सेवांचा व्यापार १७.२ अब्ज युरो होता. शिवाय EU ने १६.५ दशलक्ष टन द्रवीभूत नैसर्गिक वायू (LNG) आयात केले.भारताने सांगितले की, युरोपियन देश आणि रशियामध्ये व्यापार केवळ उर्जेपुरता मर्यादित नाही. यामध्ये खते, खनिजे, रसायने, पोलाद, यंत्रसामग्री आणि वाहतूक उपकरणांचा देखील समावेश आहे.
अमेरिकेने देखील रशियाकडून युरेनियम, पॅलेडियम आणि खते आयात करत आहे. जर अमेरिका आणि युरोपि संघ रशियाशी व्यापार करु शकतात, तर त्यांची भारतावरील टीका ही अयोग्य आहे. भारताची अर्थव्यवस्था प्रमुख आणि उभरती आहे, यामुळे आपले राष्ट्रीय हित आणि आर्थिक सुरक्षितता जपण्यासाठी स्वतंत्र पावले उचलले हेही भारताने स्पष्ट केले आहे.
पाकिस्तानची दुतोंडी रणनीति! एकीकडे अमेरिकेचे गुणगाण, दुसरीकडे इराणच्या अणु प्रकल्पाला पाठिंबा