Donald Trump : ट्रम्प धोक्यात? निषिद्ध क्षेत्रात घुसले विमान; अमेरिकन लष्कर हाय अलर्टवर (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
परंतु या सुरक्षेत एक मोठी चूक झाली आहे. फॉक्स न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार, ट्रम्प यांच्या गोल्फ क्लबवर एक विमान उडताना दिसले आहे. हे अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांच्या सुरक्षेसाठी अत्यंत धोकादायक मानले जात आहे. या विमानाने प्रतिबंधित हवाई क्षेत्राचे उल्लंघन केले आहे. रविवारी (०३ ऑगस्ट) न्यू जर्सीतील ट्रम्प यांच्या गोल्फ क्लबजवळ हे विमान उडताना दिसले.
Russia Ukraine War : युक्रेनचे रशियावर हल्ले सुरुच; मॉस्कोच्या तेल कारख्यांना ड्रोनने केले लक्ष्य
यानंतर अमेरिकेच्या लढाऊ विमानांनी या विमानाला प्रतिबंधित क्षेत्रातून बाहेर घालवण्याचा, थांबवण्याचा प्रयत्न केला. नॉर्थ अमेरिकन एरोस्पेस डिफेन्स कमांड (NORAD) ने ही माहिती दिली. स्थानिक वेळेनुसार, रविवारी ३ ऑगस्ट रोजी दुपारी १२.५० वाजता ही घटना घडली. एक विमान अचानक गोल्फ क्लबवर उड्डाण करताना दिसले. यावेळी ट्रम्प क्लबमध्ये उपस्थि होते. यामुळे अमेरिकेच्या लढाऊ विमानांनी विमानाचा पाठलाग केला. विमानवर गोळीबार करण्यात आला, मात्र तरीही हे नागरी पुन्हा प्रतिबंधित हवाई हद्दीत घुसण्याचा प्रयत्न करत होते.
NORAD ने दिलेल्या माहितीनुसार, ट्रम्प यांच्या राहत्या घराच्या आणि गोल्फ क्लबच्या आसपासचे हवाई क्षेत्र हे प्रतिबंधित क्षेत्र आहे. या ठिकाणी ३ नॉटिकल मैलांपर्यंत निर्बंध लागू करण्यात आले आहे. याचे उल्लंघन केल्यास NORAD संरक्षण प्रणालीकडून कडक कारवाई केली जाते.
यापूर्वीही घडली आहे अशी घटना
यापूर्वी देखील गेल्या महिन्यामध्ये ट्रम्प यांच्या गोल्फ क्लबमध्ये एका नागरी विमानाची घुसखोरी झाली होती.ट्रम्प यांनी दुसऱ्यांदा पदाभार संभाळल्यानंतर आतापर्यंत अनेक वेळा हवाई क्षेत्राचे उल्लंघन करण्यात आले आहे. यापूर्वी जुलैमध्ये, जानेवारी मध्ये अशा घटना घडल्या आहे. NORAD ने आतापर्यंत पाच विमानांना रोखले आहे. मार्चमध्ये ट्रम्प यांच्या फ्लोरिडातील लक्झरी रिसॉर्ट क्लब आणि निवासस्थान मार-ए-लागोच्या प्रतिबंधित क्षेत्राचे देखील उल्लंघन करण्यात आले होते.
या घटनांममुळे डोनाल्ड ट्रम्प यांच्या जीवाला धोका असल्याचे म्हटले जात आहे. शिवाय यामुळे NORAD च्या संरक्षण प्रणालीवर प्रश्न उपस्थित केले जात आहे. यामुळे हवाई क्षेत्राच राष्ट्रीय सुरक्षेसाठी कडक निर्बंध लागू करण्यावर भर दिला जात आहे.






