
Brazil's Lula speak with India's PM Modi, amid Trump tariff
लुला दा सिल्वा यांनी गुरुवारी पंतप्रधान मोदींना फोन केला होता. या दरम्यान दोन्ही नेत्यांमध्ये गेल्या महिन्यात पंतप्रधान मोदींच्या ब्राझील दौऱ्यावर चर्चा झाली. तसेच अनेक जागतिक आणि प्रादेशिक मुद्यांवरही दोघांनी चर्चा केली.
गेल्या महिन्यात पंतप्रधान मोदींनी ८ जुलै रोजी ब्राझीलला भेट दिली होती. ब्राझीलचे राष्ट्रपती लुईझ इनासियो लुला दा सिल्वा यांच्या आंमत्रणावरुन पंतप्रधान मोदींचा दौरा झाला होता. दरम्यान गुरुवारी (०७ ऑगस्ट ) झालेल्या फोनवरील संवादादरम्यान दोन्ही नेत्यांमध्ये मोदींच्या या दौऱ्याविषयी चर्चा करण्यात आली.
दोन्ही नेत्यांनी भारत आणि ब्राझीलमध्ये परस्पर सहकार्य वाढवण्यावर चर्चा केली. व्यापारा, तंत्रज्ञान, संरक्षण उर्जा आणि शेती या मुद्द्यांवर परस्पर सहकार्य मजबूत करण्यावर भर दिला. तसेच ब्राझील आणि भारतामधील धोरणात्मक भागीदारी पुढे नेण्याच्या वचनाचे पुनरुच्चारन केले. तसेच अनेक जागतिक आणि प्रादेशिक मुद्यांवरही दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. याशिवाय अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफवरही चर्चा करण्यात आली.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी ब्राझीवर ५०% कर (Tarrif) लागू केला आहे. ट्रम्प यांनी म्हटले आहे की, ब्राझीलचे लोक त्यांना खूप आवडतात, मात्र तेथील सरकारने अनेक चुकीची कामे केली आहेत. तसेच ब्राझीवरही रशियाकडून तेल खरेदी केल्यामुळे कर लागू करण्यात आला आहे. यामुळेच त्यांनी ब्राझीलवर सर्वाधिक कर लागू केला आहे.
तसेच ब्राझीलचे माजी राष्ट्राध्यक्ष जैर बोल्सोनारो हे ट्रम्प यांच्या जवळचे मानले जातात. तज्ज्ञांच्या मते त्यांच्यावर कारवाई केल्याने देखील ट्रम्प नाराज आहेत. शिवाय २०२२ च्या निवडणुकीत जैर बोल्सोनारो यांचा पराभव झाला होता. तेव्हापासून अमेरिका आणि ब्राझीलचे संबंध बिघडले आहेत.
दरम्यान ट्रम्प यांनी अध्यक्ष लुला दा सिल्वा यांना वाटाघाटीसाठी चर्चेची ऑफरही दिली होती. परंतु लुला दा सिल्वा यांनी ट्रम्पशी संवाद साधण्यास नकार दिला. त्यांनी पंतप्रधान मोदी आणि शी जिनपिंगशी (Xi Jinping) चर्चा करण्याची इच्छा व्यक्त केली.
Gaza News : गाझा शहरावर आता इस्रायलचा ताबा? नेतन्याहूंच्या प्रस्तावाला सुरक्षा मंत्रिमंडळाची मंजुरी