Gaza News :गाझा शहरावर आता इस्रायलचा ताबा? नेतन्याहूंच्या प्रस्तावाला सुरक्षा मंत्रिमंडळाची मंजुरी (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
Israel Control On Gaza : तेल अवीव : एक खळबळजनक माहिती समोर आली आहे. इस्रायल (Israel) आता संपूर्ण गाझावर ताबा राहणार आहे. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू (Benjamin Netnyahu) यांच्या प्रस्तावाला मंत्रीमंडळामध्ये मंजुरी मिळाली आहे. इस्रायलने याची घोषणा केली असून गाझा(Gaza) शहर ताब्यात घेण्याच्या त्यांच्या योजनेला सुरक्षा मंत्रिमंडळाकडून मान्यता मिळाली आहे. यामुळे संपूर्ण गाझामध्ये गोंधळ उडाला आहे. इस्रायलने आपली सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी हा निर्णय घेतला आहे.
यावरुन इस्रायलचे लष्करी प्रमुख अयाल झमीर आणि नेतन्याहूंमध्ये वाद झाला होता. इस्रायलच्या लष्करी प्रमुखांनी नेतन्याहूंच्या या योजनेला विरोध केला होता. परंतु नेतन्याहूंच्या या अखेर सुरक्षा मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. शुक्रवारी (०८ ऑगस्ट) सुरक्षा मंत्रिमंडळासोबत इस्रायलची बैठक पार पडली. या बैठकीत नेतन्याहूंनी सांगितले की, हमासने केलेल्या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. हमासने ७ ऑक्टोबर २०२३ मध्ये इस्रायलवर हल्ला केला होता.
NSA अजित डोवालने मॉस्कोमध्ये घेतली पुतीनची भेट, रशियन राष्ट्रपतीशी ‘या’ मुद्द्यांवर चर्चा
यानंतर इस्रायल आणि हमासमध्ये (Israel Hamas War) युद्धाला सुरुवात झाली होती. गेल्या २२ महिन्यांपासून हे युद्ध सुरु आहे. इस्रायलने एक निवेदन जारी केले आहे. यामध्ये सांगण्यात आले आहे की, हमासला नष्ट करण्यासाठी पंतप्रधान नेतन्याहूंच्या प्रस्तावाला सुरक्षा मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे.
इस्रायल आणि हमास युद्धामुळे हजारो पॅलेस्टिनींचा मृत्यू झाला आहे. शिवाय गाझामध्ये प्रचंड विनाश झाला आहे. आतापर्यंत सुमारे २० लाख पॅलेस्टिनी लोकांवर दुष्काळाच्या ढग पसरले आहे. शिवाय गाझामध्ये लोकांवर उपासमारीची वेळ आहे. यामुळे अनेकांचा बळी गेला आहे, विशेषत: लहान मुलांचा यामध्ये समावेश आहे.
यापूर्वी नेतन्याहूंनी, इस्रायल संपूर्ण परिसराचा ताबा घेण्याची आणि अरब सैन्याला देण्याची योजना नेतन्याहूंनी आखली होती. परंतु आता इस्रायलने यावर ताबा मिळवण्याचा ठाणले आहे. हमासवर दबाव वाढवण्यासाठी हळूहळू संपूर्ण गाझावर ताबा मिळवण्यात येणार आहे. दरम्यान इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांना बैठकीपूर्वी प्रश्न विचारण्यात आले होते. त्यांना इस्रायल संपूर्ण गाझावर ताबा मिळवणार का असे पत्रकारांनी विचारले होते.
यावेळी नेतन्याहूंनी सांगितले की, इस्रायलची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी, हमासला तेथून हटवण्यात येणार आहे. हमासपासून गाझा मुक्त होईल. आम्हाला त्यावर ताबा मिळवायचा नाही केवळ एक सुरक्षा वर्तुळ तयार करायचे आहे. यानंतर आम्ही गाझाला अरब सैन्याच्या हाती देणार आहोत. इस्रायला कोणताही धोका नाही हे सुनिश्चित केल्यावर, यामुळे गाझातील लोकांना जीवन मिळेल.