Breaking Latest World News International News Headlines Live updates News in marathi
International breaking Live News Marathi : US सिनेटमधील 50 सिनेटर्स (रिपब्लिकन आणि डेमोक्रॅट) यांनी रशियाविरूद्ध नवीन कठोर आर्थिक मंजुरीचा प्रस्ताव ठेवला आहे. रशियाच्या ऊर्जा विक्रीवर मोठा प्रभाव पाडणे हा त्याचा मुख्य उद्देश आहे. ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, मसुदा विधेयकात म्हटले आहे की जर रशियाने युक्रेनशी शांतता चर्चा नाकारली किंवा कोणताही करार मोडला तर त्याच्या तेल, वायू आणि युरेनियमवर 500% शुल्क लागू केले जाईल. रशियाला आर्थिकदृष्ट्या कमकुवत करण्यासाठी अमेरिका नव्या निर्बंधांची योजना आखत आहे. दिवसभरातील सर्व अपडेट्स खाली वाचा…
02 Apr 2025 06:21 PM (IST)
Benjamin Netanyahu Arrest Warrant: एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या संभाव्य अटकेबद्दल आंतरराष्ट्रीय पातळीवर चर्चा सुरु आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एमनेस्ट इंटरनेशनलने हंगेरी सरकराला नेतन्यांहून हंगेरीत आल्यास अटक करण्याची मागमी केली आहे. एमनेस्टी इंटरनॅशलने हंगेरी सरकारला नेतन्याहूंना अटक करुन इंटरनॅशनल क्रिमिनल कोर्ट (ICC) कडे सोपवण्यास सांगितले आहे.
02 Apr 2025 05:37 PM (IST)
अमेरिकेच्या नामांकित विद्यापीठ हार्वर्ड युनिनव्हर्सिटीवर ट्रम्प प्रशासनाने यहूदीविरोधी विचारांना पाठिंबा दिल्याचा मोठा आरोप केला आहे. यापूर्वी ट्रम्प प्रशासनाने कोलंबिया युनिव्हर्सिटीवर आरोप केला होता आणि विद्यापीठाला मिळणाऱ्या सरकारकी निधीत कपात केली होती. यामुळे आता हार्वर्ड युनिव्हर्सिटीला मिळाणाऱ्या सरकारी निधीतही कपात होण्याची शक्यता आहे. यामुळे विद्यापीठाच्या प्रतिष्ठेला देखील धक्का बसू शकतो.
02 Apr 2025 04:41 PM (IST)
डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफच्या निर्णयामुळे जागतिक अर्थव्यवस्थेला मोठा फटॉका बसण्याची शक्यता युरोपियन सेंट्रल बॅंकच्या प्रमुखांनी म्हटले आहे. युरोपियन सेंट्रल बँकेच्या प्रमुख क्रिस्टीन लगार्ड म्हटले आहे की, डोनाल्ड ट्रम्प यांच्या परस्पर कर लादण्याचा जागतिक अर्थव्यवस्थेवर नकारात्मक परिणाम होण्याची शक्यता आहे.
02 Apr 2025 04:16 PM (IST)
भारतीय वंशाच्या अमेरिकन अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि त्यांचे सहकारी बुच विल्मोर 9 महिन्यानंतर सुखरुप पृथ्वीवर परतले. सुनीता विल्यम्स आपल्या घरी परतल्या. यावेळी त्यांना पाहून त्यांच्या पाळीव श्वानांनी त्यांच्या कुटुंबीयांनी प्रेमाचा वर्षाव केला. सुनीता विल्यम्स यांनी या भावुक क्षणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, सुनीता विल्यम्स घराच्या दरवाज्यात पोहतात यावेळी त्यांचे पाळीव श्वान लॅबरॉडॉर गनर आणि गोर्बी त्यांच्याकडे धावत येतात. सुनीता विल्यम्सला पाहून त्यांना अत्यंत आनंद होतो. आनंदात दोन्ही श्वान सुनीता विल्यम्सच्या आवतीभोवती उड्या मारु लागतात, त्यांना प्रेमाने चाटू लागातात. दरम्यान या भावूक क्षणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. सुनीता विल्यम्स देखील दोन्ही श्वानांवर प्रेम करत आहेत.
Best homecoming ever! pic.twitter.com/h1ogPh5WMR
— Sunita Williams (@Astro_Suni) April 1, 2025
02 Apr 2025 03:18 PM (IST)
अमेरिकेचे राष्ट्राध्य डोनाल्ड ट्रम्प आजापासून (02 एप्रिल) टॅरिफचे नव्या धोरणांची अंमलबजावणी करणार आहे. हा दिवस अमेरिकेचा लिबरेशन डे म्हणून साजरा करण्याची घोषणा डोनाल्ड ट्रम्प यांनी केली आहे. अमेरिकेच्या या नव्या टॅरिफ धोरणाचा फटका अनेक देशांना बसण्याची शक्यता आहे. ट्रम्प यांच्या रडावर 15 देशांची नावे असून या देशांना त्यांनी डर्टी- 15 म्हणून संबोधले आहे. याबाबत अमेरिकेने अद्याप कोणतीही अधिकृत यादी जाहीर केलेली नाही.
02 Apr 2025 12:57 PM (IST)
बांग्लादेश आणि भारत संबंध सध्या मोठ्या तणावात आहे. बांगलादेशच्या सतत भारताविरोधीच्या खेळीमुळे दोन्ही देशांत वाद निर्माण होत आहे. दरम्यान बांगलादेशचे मुख्य सल्लागार मोहम्मद युनूस यांनी चीनला बांगलादेशात आर्थिक गुंतवणुक करण्याचे आवाहन केले आहे. या संदर्भात युनूस यांनी भारताच्या ईशान्येकडील राज्यांचे भूपरिवेष्टित स्वरुप व्यापार विस्तार करण्यासाठी एक संधी ठरु शकते असे म्हटले आहे. अलीकडेच मोहम्मद युनूस चार दिवसांच्या चीन दौऱ्यावर गेले होते. या दौऱ्यादरम्यान युनूस यांनी हे वादग्रस्त विधान केले.
02 Apr 2025 12:24 PM (IST)
पृथ्वीवरून नैसर्गिक आपत्तींची तीव्रता समजून घेणे कठीण असते, परंतु जेव्हा या आपत्तीचे चित्र आकाशातून टिपले जाते, तेव्हा त्यांचे वास्तव अधिक स्पष्ट होते. भारतीय अवकाश संशोधन संस्था (ISRO) ने अलीकडेच म्यानमारमध्ये झालेल्या 7.7 तीव्रतेच्या भूकंपाच्या उपग्रह प्रतिमा प्रसिद्ध केल्या, ज्या पाहून संपूर्ण जग स्तब्ध झाले आहे. या प्रतिमांमध्ये शहरे उद्ध्वस्त झालेली, ऐतिहासिक वारसा स्थळे जमीनदोस्त झालेली आणि भूकंपामुळे झालेल्या प्रचंड विध्वंसाचे जिवंत चित्रण दिसून येते.
ISRO's Cartosat-3 images show damage caused by the Earthquake in Myanmar on 28 Mar 2025.https://t.co/px63Hqxmus pic.twitter.com/SEWP4THUNK
— Anshuman (TitaniumSV5) (@TitaniumSV5) March 31, 2025
credit : social media
02 Apr 2025 11:50 AM (IST)
आशियाई भूभागात तणाव आणखी वाढताना दिसत आहे. चीनने तैवानभोवती ‘स्ट्रेट थंडर-2025A’ (Strait Thunder-2025A) नावाने एक मोठा लष्करी सराव सुरू केला आहे. या सरावाचा उद्देश तैवानच्या नाकेबंदीची क्षमता सुधारण्यासोबत अचूक हल्ले करण्याचा सराव करणे आहे, असे चीनच्या लष्कराने जाहीर केले आहे. चीनच्या या आक्रमक पावलामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर खळबळ उडाली आहे.
#StraitThunder2025AExercise: On April 2, #GroundForce of Chinese #PLA #EasternTheaterCommand conducted long-range live-fire shooting drills in waters of #EastChinaSea. It involved precision strikes on such simulated targets as key ports, energy facilities.https://t.co/oDmjJbujTT pic.twitter.com/CiIOOK68ys
— China Bugle 中国军号 (@ChinaBugle) April 2, 2025
credit : social media
02 Apr 2025 11:26 AM (IST)
रविवारी 30 मार्च रोजी जपान, दक्षिण कोरिया आणि चीन मध्ये पाच वर्षांनंतर झालेल्या चर्चेमुळे करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार या तीन्ही देशांच्या या भेटीदरम्यान व्यापर संबंध सुलभ करण्यावर भर देण्यात आला. मिडिया रिपोर्टनुसार, जपान आणि दक्षिण कोरिया चीनकडून सेमीकंडक्टरच्या कच्चा मालाचे आयात करणार आहे, तर चीननेही जपान व दक्षिण कोरियाकडून चिप उत्पादन घेण्यास आपली इच्छा दर्शवली आहे, तीनीही देशांनी सप्लाय चेनमध्ये एकमेकांना सहकार्य करण्यावर भर दिला आहे.
02 Apr 2025 10:59 AM (IST)
डोनाल्ड ट्रम्प 2 एप्रिल रोजी दुपारी 4 वाजता ET (स्थानिक वेळेनुसार) टॅरिफबाबत घोषणा जाहीर करतील. व्हाईट हाऊसच्या रोज गार्डनमध्ये 'मेक अमेरिका वेल्थी अगेन' कार्यक्रमादरम्यान ही घोषणा केली जाईल. प्रेस सेक्रेटरी कॅरोलिन लेविट यांच्या म्हणण्यानुसार, दर ताबडतोब लागू होतील आणि गुरुवारपासून संकलन सुरू होईल.
💥BREAKING:
TRUMP TO ANNOUNCE TARIFFS AT 4PM EST TODAY
EMBRACE FOR MASSIVE BITCOIN VOLATILITY!! pic.twitter.com/vTDhTYmjSr
— Crypto Rover (@rovercrc) April 2, 2025
credit : social media
02 Apr 2025 10:40 AM (IST)
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आज म्हणजेच २ एप्रिल रोजी व्हाईट हाऊसच्या रोज गार्डनमध्ये परस्पर शुल्काची घोषणा करणार आहेत. त्यांच्या या घोषणेमुळे अनेक देशांमध्ये तणावाचे वातावरण आहे. ट्रम्प यांच्या घोषणेने अनेक वस्तूंच्या किमती वाढतील असे मानले जात आहे.
USA imposes global tariff today
- Mexican President Sheinbaum says: 'U.S tariffs not targeting Mexico'
- Mexico seeks to avoid trade conflict@Anchoramitaw shares more details. pic.twitter.com/4T34fTgEys
— TIMES NOW (@TimesNow) April 2, 2025
credit : social media