BRICS countries including China condemn Pahalgam attack
नवी दिल्ली: शुक्रवारी (६ जून) ब्राझीलायामध्ये ब्रिक्स परिषदत पार पडली. या परिषेदत ब्रिक्सच्या समुदायाने जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम हल्लाचा निषेध केला. तसेच दहशतवादाविरुद्ध एकत्र कारवाईचा संकल्प देखील केला. याच पाकिस्तानला एक मोठा झटका बसला. चीनसह अनेक मुस्लिम देशांनी देखील पहलगाम हल्ल्याची निंदा केली.
ब्रिक्स संसदीय पॅनलमध्ये, भारत, ब्राझील, चीन, दक्षिण आफ्रिका या देशांचा समावेश आहे. तसेच इराण, संयुक्त अरब अमिराती (UAE) इजिप्त, इथिओपिया आणि इंडोनेशियाचे प्रतिनिधी देखील या परिषदेसाठी उपस्थित होते. या बैठकीचे नेतृत्त्व भारताच्या लोकसभेचे खासदार ओम बिर्ला यांनी केले.
दरम्यान या ब्रिक्स परिषदेत ओम बिर्ला यांनी दहशतवाद जागतिक संकट बनत चालला असल्याचे सांगतिले. त्यांनी म्हटले की, दहशतवादविरोधी कारवाईसाठी जागतिक देशांनी एकत्र येण्याची गरज आहे, तरच दहशतवादाचा सामान करता येईल असे बिर्ला यांनी म्हटले.
यासाठी त्यांनी चार प्रमुख पावले उचलण्याचे आवाहन ब्रिक्स देशांना केले. यात दहशतवादी संघटनाना निधी देणे थांबवणे, गुप्तचर माहितीची देवाण-घेवाण वाढवणे, तंत्रज्ञानाचा गैरवापर रोखणे आणि तपास व न्यायालयीन कार्यवाहीत एकमेकांना सहकार्य करणे या मुद्द्यांचा उल्लेख बिर्ला यांनी केला. सर्व देशांनी देखील त्यांच्या या मुद्द्यांवर सहमती दर्शवली.
भारत आणि पाकिस्तानमधील तणावाच्या सुरुवातीपासूनच चीनने पाकिस्तानला पाठिंबा दर्शवला होता. चीनने पाकिस्तानला शस्त्रे देखील पुरवली होती. पण ब्रिक्स परिषदेदरम्यान चीनने पहलगाम हल्ल्याची निंदा केली आहे. यामुळे हा पाकिस्तानसाठी मोठा धक्का मानला जात आहे.
भारताच्या जम्मू आणि काश्मीरच्या पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी दहशतवादी हल्ला झाला होता. यामध्ये २८ निरापराध लोकांचा बळी गेला. या हल्ल्यानंतर भारताने संताप व्यक्त केला. भारताने ऑपरेशन सिंदूर राबवत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांची ठिकाणे उद्ध्व्सत केली. तसेच या हल्ल्यात पाकिस्तानचा सहभाग असल्याचेही म्हटले जात होते.
यामुळे भारताने पाकिस्तानविरोधातही कडक कारवाई केली. दरम्यान भारताच्या कारवाईने पाकिस्तान तिथर बिथर झाला होता. यापार्श्वभूमीवर पाकिस्तानने भारतावर हल्ले करण्यास सुरुवात केली. पण भारताने प्रत्येक हल्ल्याचे प्रत्युत्तर दिले. चार दिवस दोन्ही देशांत सुरु असलेला संघर्ष १० मे रोजी युद्धबंदी लागू करत थांबवण्यात आला.
तसेच ऑपरेशन सिंदूर नंतर भारताने जागतिक स्तरावर विविध देशांमध्ये आपले शिष्टमंडळ पाठवले. या शिष्टमंडळाने जागतिक स्तरावर पाकिस्तानच्या दहशतवादाला पाठिंब्याचा पर्दाफाश करण्याचा प्रयत्न केला. तसेच भारताने केलेल्या ऑपरेशन सिंदूर कारवाईची माहिती दिली. सध्या पाकिस्तानचा आंतरराष्ट्री स्तरावर खोटारडेपणाचा पर्दाफाश झाला आहे.