घाबरलेला पाकिस्तान दडला चीनच्या पंखाखाली; लष्करात वाढ करण्यासाठी ड्रॅगनकडून केली शस्त्र खरेदी (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
इस्लामाबाद: भारताच्या ऑपरेशन सिंदूरनंर पाकिस्तान चांगलाच बिथरलेला दिसत आहे. पाकिस्तानने आपली लष्करी ताकद वाढवण्यास सुरुवात केली आहे. यासाठी पाकिस्तानने चीनकडे धाव घेतली आहे. पाकिस्तानने चीनकडून हवाई संरक्षण प्रणाली आणि लढाऊ विमांनाची खरेदी करण्यास सुरुवात केली असल्याचे म्हटले आहे. पाकिस्तानने चीनचे पाचव्या पिढीतील स्टेल्थ फायटर जेट j-35A खरेदी केले आहे. पाकिस्तान गेल्या काही दिवसांपासून आपली ताकद वाढवण्याचा प्रयत्न करत आहे. चीनमधून या फायटर जेटचा पुरवठा लवकरच केला जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पाकिस्तान हवाई दलाचे वैमानित देखील या लढाऊ विमानासाठी प्रशिक्षण घेत आहेत.
J-35A विमानासोबत पाकिस्तानला चीनकडून हवेतून अचूक मारा करणारे PL-17 हे क्षेपणास्त्रे देखील पुरवले जाणार आहे. हे क्षेपणास्त्रे लढाऊ विमानत तैनात केले जाणार आहे. PL-17 ची मारा करण्याची क्षमता सुमारे ४०० किलोमीटर पर्यंत आहे. ऑपरेशन सिंदूर नंतर भारताने केलेल्या कारवाईत पाकिस्तानचे मोठे नुकसान झाले होते. यामध्ये विशेषत: चीनी बनावटीची शस्त्रे उद्ध्वस्त झाली होती. यामुळे पाकिस्तानचा प्रचंड अपमान सहन करावा लागला होता. सध्या पाकिस्तान पुन्हा आपली लष्करी ताकद वाढवत आहेत.
पाकिस्तान आणि चीननमध्ये ४० लढाऊ विमानांचा करार करण्यात आला आहे. चीनला डिसेंबर २०२४ मध्ये या J-35 लढाऊ विमानांची ऑर्डर मिळाली होती. या ऑर्डरची डिलिव्हरी २०२५ ऑगस्ट ते जानेवारी २०२६ पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. अद्याप यावर कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
J-35A ला शेनयांगा नावानेही ओळखले जाते. हे शेनयांग एअरक्राफ्ट कॉर्पोरेशन ने विकसित केले आहे. या लढाऊ विमानाच्या स्टेल्थ तंत्रज्ञानामुळे रडार क्रॉस सेक्शन कमी होते. यामुळे रडारपासून बचाव करण्यास मदत मिळते. हे लढाऊ विमान मॅक २.० च्या वेगाने उडते.
याशिवाय पाकिस्तान चीनची नवीन हवाई संरक्षण प्रणाली देखील खरेदी करण्याचा विचार करत आहे. पाकिस्तान HQ-19 ही क्षेपणास्त्र खरेदी करणार असल्याची माहिती समोर आली आहे. भारतासोबतच्या तणावादरम्यान चीनकडून मिळालेली HQ-9 ही संरक्षण प्रणाली भारताच्या प्रत्युत्तरात्मक कारवाईत पूर्णत: नष्ट झाली होती. यामुळे पाकिस्तानने आता नवी प्रणाली खरेदी करण्याचा विचार करत आहे. शिवाय पाकिस्तानने आपल्या संरक्षण खर्चात देखील १८% ने वाढ केली आहे.