Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

कोहिनूर हिरा भारताला परत मिळणार? ब्रिटनच्या ‘या’ महत्त्वपूर्ण निर्णयानंतर चर्चेला उधान

ब्रिटनने दुसऱ्या महायुद्धादरम्यान नाझींनी लुटलेली ऐतिहासिक चित्रकला त्याच्या मूळ ज्यू वारसांना परत करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयानंतर भारतातून कोहिनूर हिऱ्याच्या पुनर्प्राप्तीबाबतच्या चर्चांना उधान आले आहे.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Mar 29, 2025 | 08:30 PM
britain to return nazi looted painting to jewish heirs sparking kohinoor diamond speculation

britain to return nazi looted painting to jewish heirs sparking kohinoor diamond speculation

Follow Us
Close
Follow Us:

लंडन : ब्रिटनने दुसऱ्या महायुद्धादरम्यान नाझींनी लुटलेली ऐतिहासिक चित्रकला त्याच्या मूळ ज्यू वारसांना परत करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयानंतर भारतातून कोहिनूर हिऱ्याच्या पुनर्प्राप्तीबाबतच्या मागण्यांना पुन्हा एकदा चालना मिळाली आहे. अनेक दशकांपासून भारत हा हिरा परत मिळावा म्हणून ब्रिटनवर दबाव टाकत आहे, मात्र अद्याप यावर कोणताही ठोस निर्णय झालेला नाही.

ब्रिटिश सरकारने घोषित केले आहे की 1654 मध्ये चित्रकार ऐलसॅंड्रो टॅस्सी यांनी तयार केलेले ‘एनियास अँड हिज फॅमिली फ्लींग बर्निंग ट्रॉय’ हे ऐतिहासिक चित्र मूळ वारसांना परत करण्यात येणार आहे. बेल्जियन ज्यू कला संग्राहक सॅम्युअल हार्टवेल्ड यांच्या संग्रहातील हे चित्र 1940 मध्ये नाझी सैन्याने हिसकावले होते. टेट ब्रिटन संग्रहालयात तीन दशके प्रदर्शित केल्यानंतर आता ब्रिटिश प्रशासनाने ते योग्य वारसांना परत करण्याचा निर्णय घेतला आहे.

नाझी राजवटीत लुटलेला वारसा परत, मग वसाहतींचा वारसा का नाही?

या निर्णयामुळे भारतासह अनेक वसाहतकालीन शोषण भोगलेल्या देशांमध्ये प्रश्न उपस्थित केला जात आहे – जर नाझींनी लुटलेली संपत्ती परत केली जात असेल, तर ब्रिटिश वसाहतींमधून हिसकावलेला ऐतिहासिक वारसा परत का मिळू शकत नाही? भारत कोहिनूर हिऱ्याच्या पुनर्प्राप्तीसाठी अनेक वर्षांपासून प्रयत्न करत आहे, मात्र ब्रिटनने नेहमीच वेगवेगळी कारणे देऊन हा हिरा परत देण्यास नकार दिला आहे. कोहिनूर सध्या ब्रिटीश राजघराण्यातील मुकुटात जडवलेला आहे आणि तो ऐतिहासिक दृष्टीने भारत, पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांसाठी महत्त्वाचा आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : कोण आहे ‘हा’ मुलगा? ज्याने 3 आठवडे आधीच केली होती म्यानमारच्या भूकंपाची भविष्यवाणी

ब्रिटनच्या स्पोलिएशन ॲडव्हायझरी पॅनेलची मान्यता

ब्रिटिश सरकारच्या या नव्या निर्णयाला स्पोलिएशन ॲडव्हायझरी पॅनेलने मान्यता दिली. हा पॅनेल नाझी राजवटीत गमावलेल्या सांस्कृतिक मालमत्तेच्या दाव्यांची चौकशी करण्यासाठी 2000 साली स्थापन करण्यात आला होता. या पॅनेलने स्पष्ट केले की या चित्रकलेची जबरदस्तीने लूट झाली होती आणि ती परत केली जाणे आवश्यक आहे.

2009 साली ब्रिटनमध्ये ‘होलोकॉस्ट (लुटलेली कला) कायदा’ पारित करण्यात आला, जो नाझी राजवटीत लुटलेल्या कलाकृती मूळ वारसांना परत करण्याची परवानगी देतो. पण, हा कायदा केवळ नाझी लुटलेल्या वस्तूंवर लागू होतो, ब्रिटनच्या वसाहतींनी हिसकावलेल्या ऐतिहासिक वारशावर नाही.

कोहिनूर परत करण्यात काय अडचणी?

ब्रिटनमधील अनेक संग्रहालये ब्रिटिश वसाहतींनी लुटलेल्या ऐतिहासिक वस्तू परत कराव्यात अशी मागणी अनेक दशकांपासून केली जात आहे. मात्र, ब्रिटनमध्ये अद्याप असे काही कायदे अस्तित्वात आहेत, जे ऐतिहासिक वस्तू इतर देशांना परत करण्यास प्रतिबंध करतात. ब्रिटिश प्रशासनाच्या म्हणण्यानुसार, कोहिनूर हा 19व्या शतकात अधिकृतरित्या ब्रिटीश राजवटीकडे आला होता आणि त्यामुळे त्यावर कोणत्याही देशाचा हक्क नाही. मात्र, भारतीय इतिहासकार याला विरोध करताना म्हणतात की हा हिरा जबरदस्तीने हिसकावण्यात आला होता आणि त्यामुळे तो भारताला परत मिळायला हवा.

इतिहासकार आणि भारतीय तज्ज्ञांचा प्रश्न, ब्रिटन द्वंद्वात्मक धोरण अवलंबत आहे का?

ब्रिटनच्या या निर्णयावर भारतीय इतिहासकार आणि संशोधकांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. नाझींनी लुटलेल्या संपत्तीबाबत न्याय दिला जात असेल, तर ब्रिटिश वसाहतींनी लुटलेल्या संपत्तीबाबत तोच न्याय का लागू होत नाही? ब्रिटिश संग्रहालयात आणि इतर संस्थांमध्ये भारतातील अनेक मौल्यवान वस्तू साठवलेल्या आहेत, ज्या वसाहती काळात जबरदस्तीने हस्तगत करण्यात आल्या होत्या. भारतासोबतच इजिप्त, ग्रीस, आफ्रिकन देश आणि चीन यांनीही ब्रिटनकडे त्यांचे ऐतिहासिक वारसे परत करण्याची मागणी केली आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : इराणचे शेवटचे काही क्षण शिल्लक! ट्रम्पच्या आदेशानंतर B-2 अणुबॉम्बर या देशाचा नकाशाच बदलणार

ब्रिटन कोहिनूर परत करू शकेल का?

ब्रिटनच्या नव्या निर्णयामुळे आता जागतिक स्तरावर वसाहतकालीन लुटीच्या वस्तू परत करण्याची मागणी आणखी वाढू शकते. भारत सरकार आणि इतिहासकार यावर बारकाईने लक्ष ठेवून आहेत, कारण ब्रिटनने कोहिनूर हिरा परत करण्याचा निर्णय घेतल्यास, वसाहतींमधून हिसकावलेली इतर मौल्यवान संपत्तीही परत मिळू शकते.

पण ब्रिटन कोहिनूर परत करेल का? हा प्रश्न अद्याप अनुत्तरित आहे. भारतीय सरकारने यावर अधिकृत मागणी केली असली, तरी ब्रिटनने यावर कोणतेही स्पष्ट संकेत दिलेले नाहीत. तथापि, ब्रिटन जर नाझी काळातील संपत्ती मूळ वारसांना परत करत असेल, तर वसाहती काळात लुटलेली संपत्तीही परत करण्याची नैतिक जबाबदारी ब्रिटनवर आहे, असे तज्ज्ञांचे मत आहे. आता या प्रकरणावर ब्रिटनची भूमिका काय राहील आणि कोहिनूर भारतात परत येईल का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Web Title: Britain to return nazi looted painting to jewish heirs sparking kohinoor diamond speculation nrhp

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 29, 2025 | 08:30 PM

Topics:  

  • britain
  • Great Britain
  • india
  • international news

संबंधित बातम्या

इराणच्या Nuclear Programme ला मोठा धक्का; ब्रिटनने संबंधित संस्था अन् व्यक्तींवर घातली बंदी
1

इराणच्या Nuclear Programme ला मोठा धक्का; ब्रिटनने संबंधित संस्था अन् व्यक्तींवर घातली बंदी

Pakistan IMF Loan: कंगाल पाकिस्तानला मिळणार ‘लाइफलाईन’; IMF कडून ७ अब्ज डॉलरचे कर्ज मिळण्याची शक्यता
2

Pakistan IMF Loan: कंगाल पाकिस्तानला मिळणार ‘लाइफलाईन’; IMF कडून ७ अब्ज डॉलरचे कर्ज मिळण्याची शक्यता

Afghanistan Internet Ban: अफगाणिस्तानचा जगाशी संपर्क तुटला! तालिबानने देशभरात इंटरनेट केले बंद; नागरिकांचे हाल
3

Afghanistan Internet Ban: अफगाणिस्तानचा जगाशी संपर्क तुटला! तालिबानने देशभरात इंटरनेट केले बंद; नागरिकांचे हाल

India-BhutanTrain: भारत-भूतान रेल्वे धावणार! दोन्ही देशांना जोडणारे ४,०३३ कोटींचे दोन प्रकल्प मंजूर; वाचा सविस्तर
4

India-BhutanTrain: भारत-भूतान रेल्वे धावणार! दोन्ही देशांना जोडणारे ४,०३३ कोटींचे दोन प्रकल्प मंजूर; वाचा सविस्तर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.