'We are watching you'; British Defense Minister's warning to Russia, what is the real reason
लंडन: ब्रिटनच्या समुद्धी हद्दीत आलेल्या रशियाच्या गुप्तचर जहाजाला ब्रिटिश रॉयल नेव्हीने रोखले असून आपली ताकद दाखवत रशियाला परत जाण्यास भाग पाडले आहे. सोमवारी (२० जानेवारी) ब्रिटिश संरक्षण मंत्री जॉन हीली यांनी या घटनेची माहिती देत रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना इशारा दिला की, “आम्ही तुमच्यावर लक्ष ठेवत आहोत. तुम्ही काय करत आहात, हे आम्हाला माहीत आहे.”
ब्रिटनची कारवाई
रशियाचे हे गुप्तचर जहाज यांतर नावाने ओळखले जाते. यापूर्वी देखील रशियाने ब्रिटनच्या राजधानीत घुसण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी जहाज ब्रिटनच्या समुद्री क्षेत्राच्या खाली महत्त्वाच्या पाणबुडी केबल्स असलेल्या भागात होते. मागील काही महिन्यांत अशा केबल्सच्या कापल्या जाण्याच्या घटनामध्ये वाढ झाली असून ब्रिटनची चिंता वाढवली आहे. या घटनांमुळे रशिया युरोपात अव्यवस्था निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे. यामुळे ब्रिटन नाटोमधील आपल्या सहकाऱ्यांसोबत अशा कोणत्याही धोऱ्याचा मुकाबला करण्यासाठी सतर्क आहे.
“We see you, we know what you’re doing and we will not shy away from robust action to protect this country”. @RoyalNavy vessels have been tracking a Russian spy ship in the English Channel just weeks after it was caught loitering over critical undersea infrastructure. pic.twitter.com/rqF4xuB4Yj
— Ministry of Defence 🇬🇧 (@DefenceHQ) January 22, 2025
ब्रिटीश संसंदेत चर्चा
संरक्षण मंत्री जॉन हॅली यांनी ब्रिटीश संसंदेत या घटनेविषयी माहिती दिली आहे. हॅली यांच्या म्हणण्यानुसार, रशियाचे जहाज ब्रिटनच्या समुद्री हद्दीत गुप्त माहिती गोळा करण्यासाठी आले होते. परंतु ब्रिटिश रॉयल नेव्हीच्या एका एस्ट्यूट क्लास हंटर किलर पाणबुडीने त्यांच्यावर बारकाईने नजर ठेवली असल्याचे त्यांनी म्हटले आहे. ही पाणबुडी अत्याधुनिक शस्त्रास्त्रांनी सज्ज असून यामध्ये स्पीयरफिश टॉरपीडो आणि टॉमहॉक क्रूझ मिसाईल्सचा समावेश आहे.
रशियन जहाजाचे ब्रिटिश हद्द सोडून भूमध्यसागरात प्रस्थान
ब्रिटिश पाणबुडीने रशियाच्या जहाजाशी संपर्क साधला आणि जासूसी करताना पकडल्याचे सांगितले आहे. या घटनेनंतर रशियाच्या “यांतर” जहाजाला ब्रिटिश हद्द सोडून भूमध्यसागराच्या दिशेने प्रस्थान करावे लागले. रॉयल नेव्हीने नोव्हेंबर 2024 मध्येही यांतर जहाजाला अशाच प्रकारे चेतावणी दिली होती.
युरोपात संभाव्य धोका
रशियाच्या समुद्राच्या खोलीत असलेल्या रशियाच्या केबल्सच्या केलेल्या नुकसानीमुळे युरोपातील महत्त्वाचे दळवळण आणि इंटरनेट सेवा विस्कळीत होण्याची शक्यता संरक्षण मंत्र्यांनी व्यक्त केली आहे. यामुळे ब्रिटनने रशियाच्या या हालचालींवर नजर ठेवण्यास सुरुवात केली असून देशाच्या समुद्री भागात संरक्षणाच्या उपाययोजना वाढवल्या आहेत. जॉन हीली यांनी स्पष्ट केले की, ब्रिटन कोणत्याही प्रकारच्या शत्रुत्वाचा सामना करण्यासाठी सज्ज आहे.