Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

इलॉन मस्कला मोठा झटका; ब्रिटिश वृत्तपत्र ‘द गार्डियन’ चा ‘X’वर बहिष्कार म्हणाले…

सध्या टेस्ला आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स चे मालक इलॉन मस्क चर्चेत आहेत. मस्क यांना मोठा झटका बसला आहे. ब्रिटिश वृत्तपत्र द गार्डियनने इलॉन मस्क यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर बहिष्कार घातला आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Nov 14, 2024 | 01:15 PM
इलॉन मस्कला मोठा झटका; ब्रिटिश वृत्तपत्र 'द गार्डियन' चा 'X'वर बहिष्कार म्हणाले...

इलॉन मस्कला मोठा झटका; ब्रिटिश वृत्तपत्र 'द गार्डियन' चा 'X'वर बहिष्कार म्हणाले...

Follow Us
Close
Follow Us:

लंडन: सध्या टेस्ला आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स चे मालक इलॉन मस्क चर्चेत आहेत. एकीकडे अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत ट्रम्प यांच्या विजयानंतर त्यांच्या मंत्रिमंडळात स्थान दिले आहे. तर दुसरीकडे मस्क यांना मोठा झटका बसला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ब्रिटिश वृत्तपत्र द गार्डियनने इलॉन मस्क यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर बहिष्कार घातला आहे. त्यांनी एक्स न वापरण्याचा निर्ण घेतला आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांच्या निवडणूकीच्या प्रचारादरम्यान इलॉन मस्क यांनी त्यांना समर्थन दर्शवले होते. त्यानंतर ट्रम्प यांच्या विजयानंतर इलॉन मस्क यांना त्यांच्या मंत्रिमंडळात स्थान मिळाले. यानंतर इलॉन मस्क यांच्या एक्सवर एकतर्फी आरोप होऊ लागले आहेत. द गार्डियन ने आरोप केला आहे की, एक्सवर आता सर्व गोष्टी नकारात्मक होऊ लागल्या आहे.

द गार्डियनने एक्सवर केला हा आरोप

द गार्डियनचे एक्सवर 27 दशलक्षहू अधिक फॉलोवर्स आहेत. मात्र द गार्डियन आता कोणतीही पोस्ट करणार नाही. यामुळे द गार्डियन चा एक मोठा भाग वाचकांपर्यंत पोहोचणार नाही.  द गार्डियनच्या या निर्णयामुळे एक्सला एक महत्त्वपूर्ण वापरकर्ता गमवावा लागेल. द गार्डियनने याबाबत एक निवेदन जारी केले आहे. या निवेदनामध्ये वृत्तपत्राने म्हटले आहे की, एक्सवर असलेल्या आक्षेपार्ह आणि नकारात्मक गोष्टींच्या आधारे हा निर्णय घेण्यात आला आहे.

हे देकील वाचा- व्हाईट हाऊसमध्ये ट्रम्प आणि जो बायडेन यांची भेट; दोन्ही नेत्यांमध्ये शांततेत सत्ता हस्तांतरणाचे आश्वासन

एक्स अतिउजव्या विचारसरणीचे बनत चालले आहे

निवेदनात म्हटले आहे की, एक्स अतिउजव्या विचारसरणीचे बनत चालले आहे. अमेरिकेतील अध्यक्षीय निवडणुकांबद्दल एक्सवर होणाऱ्या एकतर्फी कव्हरेजमुळे द गार्डियन च्या नेतृत्वाला असे वाटले की, त्यांना आता या प्लॅटफॉर्मपासून दूर राहणे योग्य ठरेल. द गार्डियन ने स्पष्ट केले की, त्यांच्या पत्रकारांना एक्स वापरण्यावर कोणतेही बंधन नाही. पत्रकार वृत्तसंकलनासाठी एक्स वापरू शकतील. याशिवाय इतर युजर्सही द गार्डियन चे लेख शेअर करू शकतात. मात्र, द गार्डियन च्या अधिकृत अकाउंटवरून आता कोणत्याही प्रकारचे लेख किंवा पोस्ट टाकले जाणार नाहीत.

एक्सवर गंभीर परिणाम होऊ शकतो

हा निर्णय अगदी काळजीपूर्वक विचार करून घेण्यात आला आहे. त्यांचे मत आहे की, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर नकारात्मकता पसरवणाऱ्यांचा विरोध करण्यासाठी काही पावले उचलणे गरजेचे आहे. या अशा निर्णयामुळे एक्सची प्रतिमा आणि युजर्सचा विश्वास कमी होऊ शकतो. इलॉन मस्क यांच्यासाठी हा निर्णय निश्चितच धक्कादायक ठरू शकतो. हा निर्णय इलॉन मस्क यांच्या प्लॅटफॉर्मला गंभीर परिणाम होऊ शकतो. विशेषत: अशा वेळी जेव्हा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर विश्वास टिकवून ठेवणे अत्यंत महत्त्वाचे ठरते.

हे देखील वाचा- ब्राझीलच्या सर्वोच्च न्यायालयाबाहेर आत्मघाती हल्ला; स्फोटकांसह अज्ञात व्यक्तीचा न्यायालयात घुसण्याचा प्रयत्न

Web Title: British newspaper the gardian boycotts elon musks social media platform x nrss

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 14, 2024 | 01:13 PM

Topics:  

  • elon musk
  • world

संबंधित बातम्या

Elon Musk च्या पोस्टनंतर युजर्स का रद्द करत आहेत Netflix चं सब्सक्रिप्शन? काय आहे कारण? जाणून घ्या सविस्तर
1

Elon Musk च्या पोस्टनंतर युजर्स का रद्द करत आहेत Netflix चं सब्सक्रिप्शन? काय आहे कारण? जाणून घ्या सविस्तर

एलोन मस्क 44 लाख कोटींच्या निव्वळ संपत्तीसह ठरले जगातील पहिले उद्योगपती, 10 वर्षांत निव्वळ संपत्तीत 34 पट वाढ
2

एलोन मस्क 44 लाख कोटींच्या निव्वळ संपत्तीसह ठरले जगातील पहिले उद्योगपती, 10 वर्षांत निव्वळ संपत्तीत 34 पट वाढ

Wikipedia ला टक्कर द्यायला Elon Musk आता मैदानात! घेऊन येणार Grokipedia; कोणत्या गोष्टींचा समावेश
3

Wikipedia ला टक्कर द्यायला Elon Musk आता मैदानात! घेऊन येणार Grokipedia; कोणत्या गोष्टींचा समावेश

Charlie Kirk funeral: राजकारण-उद्योगाची अनोखी जोडी Trump-Musk पुन्हा दिसले एकत्र; सोशल मीडियावर फोटो VIRAL
4

Charlie Kirk funeral: राजकारण-उद्योगाची अनोखी जोडी Trump-Musk पुन्हा दिसले एकत्र; सोशल मीडियावर फोटो VIRAL

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.