
California to revoke 17,000 commercial drivers licences of immigrants
America News in Marathi : वॉशिंग्टन : अमेरिकेत गेल्या काही महिन्यांमध्ये भारतीय ट्रक ड्रायव्हर्सच्या अडचणी वाढल्या आहेत. ट्रम्प सरकारने आधीच ट्रक ड्रायव्हर्सला इंग्रजी शिकणे अनिवार्य केले असून आता आणखी एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे ट्रक चालकांची चिंता अधिकच वाढली आहे. यामुळे 17 हजार ट्रक चालकांचे लायसन्स होण्याची शक्यता आहे. या निर्णयामुळे विशेष करुन भारतीय ट्रक चालकांना फटका बसण्याची शक्यता आहे.
ट्रम्प प्रशासनाने आरोप केला आहे की, अनेक ट्रक चालकांकडे लायसन्स नसून त्यांना बेकायदेशीर स्थलांतर केले आहे. यामुळे कॅलिफोर्नियाच्या सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. ज्यामुळे १७ हजार प्रोफेशनल ड्रायव्हर्सचे ड्रायव्हिंग लायसन्स रद्द होण्याची शक्यता आहे. अमेरिकेने सर्व ड्रायव्हिंग लायसन्सची तपासणी सुरु केली. यामध्ये बेकायदेशीर स्थलांतरितांचे परवाने रद्द करण्यात आले.
ऑगस्ट 2025 मध्ये फ्लोरिडामध्ये एक भीषण अपघात घडला होता. एका अवैध भारतीय स्थलांतरित ट्रक ड्रायव्हरने चुकीचा युटर्न घेतला, ज्यामुळे तीन जणांचा मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीचे नाव जसनप्रीत सिंग (वय २१) होते. कॅलिफोर्नियाच्या पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जसनप्रीत मद्यधुंद अवस्थेत ट्रक चालवत होता यामुळे हा अपघात घडला असल्याचे वृत्त समोर आले होते. या भयावह घटनेनंतर अमेरिकेत सर्वत्र ट्रक चालकांच्या ड्रायव्हिंग लायसन्सची तपासणी सुरु करण्यात आली.
सध्या किती भारतीयांवर अमेरिकेच्या या निर्णयाचा परिणाम झाला याची माहिती अधिकृत करण्यात आलेली नाही. पण याचा फटका भारतीय सिख समुदायातील ट्रक चालकांना बसला असल्याचे स्पष्ट झाले आहे. लॉस एंजिल्स टाइम्सने प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार, अमेरिकेत सर्वात जास्त भारतीय सिख चालक आहेत.
सध्या अनेक ट्रक चालकांच्या लायसन्सची मुदत संपली आहे. यामुळे त्यांना कायदेशीररित्या अमेरिकेत राहण्याची परवानगी नाही. तसेच कॅलिफोर्नियात घडलेल्या अपघातानंतर तर या मुद्द्याने अधिकच वाद पेटला आहे. अमेरिकेचे परिवहन सचिव सीन पी. डफी यांनी कॅलिफोर्नियाच्या सरकारवर जबाबदारी नीट पार पाडत नसल्याचा आरोप केला आहे. ट्रम्प सरकार आणि डेमोक्रॅटिकवर विद्यमान लायसन्सचा नियमांचे उल्लंघन केल्याचे म्हटले आहे.
याशिवाय जे ट्रक ड्रायव्हर्स इंग्रजी चाचणी फेल झाले आहेत त्यांचे देखील लायसन्स रद्द केले जाणार आहे. तसेच अमेरिकेत दोन लाख परदेशी ट्रक चालकांपैकी केवळ १० हजार वैध ट्रक चालक आहेत. हे नवे नियम H-2A, H2-B, E-2 या व्हिसाधारकांसाठी आहेत. पण याचा सर्वात जास्त परिणाम भारतीय सिख ट्रक चालकांवर होत आहे. यामुळे त्यांच्या रोजगार आणि भविष्याबाबत चिंता निर्माण झाली आहे.
अंतराळातील जीवशास्त्रात चीनचा मोठा शोध? ड्रॅगनच्या Shenzhou-21 मिशनमागे दडलेलं रहस्य उघड