भयानक अपघात! अमेरिकेत अवैधरित्या राहणाऱ्या भारतीय ट्रक चालकाने अनेक गाड्यांना दिली धडक ; घटनेचा VIDEO VIRAL (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
California Truck Crash : वॉशिंग्टन : अमेरिकेत (America) एक भयानक अपघात घडला आहे. अमेरिकेच्या दक्षिण कॅलिफोर्नियात मोठा रस्ता अपघात झाला आहे. एका भारतीयाने अनेकांना ट्रकने (Truck Accident) उडवले आहे. या घटनेचा भयावह व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या अपघातात ३ जणांचा मृत्यू झाला आहे. आरोपीला अटक करण्यात आली आहे.
व्हेनेझुएलात भीषण दुर्घटनात! टेक ऑफनंतर काही क्षणातच विमान कोसळले आणि घडला स्फोट, VIDEO
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीचे नाव जसनप्रीत सिंग (वय २१) आहे. कॅलिफोर्नियाच्या पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जसनप्रीत मद्यधुंद अवस्थेत ट्रक चालवत होता यामुळे हा अपघात घडला असल्याचे सांगितले आहे. जसनप्रीतला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याची चौकशी सुरु आहे. या घटनेने संपूर्ण कॅलिफोर्निया हादरला आहे. या अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला असून अनेकजण गंभीर जखमी आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, जसनप्रीतच्या ट्रकने एका एसयूव्हीला जोरदार धडक दिली आहे. या घटनेचा व्हिडिओ ट्रकच्या डॅसकॅममध्ये रेकॉर्ड झाला आहे. पोलिसांना तपास आढळून आले की जसनप्रीत ड्रग्जच्या नशेत गाडी चालवत होता. तसेच ब्रेकही लावत नव्हता. सध्या जसनप्रीत पोलिसांच्या ताब्यात असून त्याला रुग्णालयात नेण्यात आले आहे. त्याची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर तो मद्यधुंद अवस्थेत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
BREAKING: 3 kiIIed in California by an illegal alien truck driver, Jashanpreet Singh. Singh entered in 2022, was released by Biden. pic.twitter.com/csrKmjTRsD — End Wokeness (@EndWokeness) October 23, 2025
याच वेळी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. जसनप्रीत बेकायदेशीरपणे अमेरिकेत राहत होता. अमेरिकेच्या गृह सुरक्षा विभागाने (DHS) याची पुष्टी केली आहे. DHS ने दिलेल्या माहितीनुसार, जसनप्रीत २०२२ मध्ये अमेरिकेत बेकायदेशीरपणे दक्षिणेकजडील सीमा ओलांडून आला होता.
अशी घटना घडण्याची ही पहिलीच वेळ नाही. ऑगस्ट २०२४ मध्ये हरजिंदर सिंग नावाच्या भारतीय स्थलांतरिताने फ्लोरिडात फोर्ट पियर्स येथे ट्रक अपघात घडवला होता. यामध्ये तीन लोकांचा मृत्यू झाला होता. तो देखील बेकयादेशीरपमे अमेरिकेत २०१८ मध्ये घुसला होता.
FAQs(संबंधित प्रश्न)
प्रश्न १. अमेरिकेत कुठे घडला रस्ता अपघात?
अमेरिकेच्या दक्षिण कॅलिफोर्निया शहरात भीषण रस्ता अपघात घडला आहे.
प्रश्न २. अमेरिकेच्या रस्ता अपघातातील (Road Accident) आरोपीचे नाव काय आहे?
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीचे नाव जसनप्रीत सिंग (वय २१) आहे. जसनप्रीत एक भारतीय ट्रक चालक आहे.
प्रश्न ३. कॅलिफोर्निया रस्ते अपघातात किती जीवितहानी झाली?
अमेरिकेच्या दक्षिण कॅलिफोर्निया अपघातात तीन जणांचा मृत्यू, अनेक जखमी झाले आहेत.
Kafala System: भारतीय कामगारांसाठी दिलासादायक बातमी! सौदी अरेबियाने ‘कफाला’ सिस्टम केली रद्द