अंगकोर वाट मंदिर बनले जगातील 8 वे आश्चर्य, जाणून घ्या त्याचा इतिहास!

कंबोडियामध्ये असलेले अंगकोर वाट हे पर्यटन स्थळ आता जगातील आठवं आश्चर्य म्हणून ओळखलं जाणार आहे.

  भारतात प्रत्येक ठिकाणी मंदिरं पाहायला मिळतात. अनेक राज्यात मोठी मोठी मंदिर आहेत. परंतु जगातील सर्वात मोठे हिंदू मंदिर भारतात नसून कंबोडियामध्ये (Cambodia) आहे. कंबोडियातील अंगकोर वाट मंदिर हे जगातील सर्वात मोठे हिंदू मंदिर आहे. त्याचा इतिहास 800 वर्षांहून अधिक जुना आहे. नुकतेच कंबोडियातील अंगकोर वाट मंदिराला जगातील 8 वे आश्चर्य घोषित करण्यात आलं आहे. इटलीच्या पॉम्पेईला मागे टाकत अंगकोर वाट या मंदिराने जगातील आठवे आश्चर्य (Eighth Wonder Of The World) होण्याचा मान मिळवला आहे.

  जगातील आश्चर्याची (Wonder Of The World) ही पदवी उत्कृष्ट इमारती किंवा प्रकल्पांना दिली जातं. आतापर्यंत आपल्याला जगातली सात आश्चर्याबद्दल माहित होतं. आता यामध्ये आठव्या आश्चर्याची भर पडली आहे. कंबोडियातील अंगकोर वाट या हिंदू मंदरिला जगातचं आठवं आश्चर्य म्हणून मान्यता मिळाली आहे.  भगवान विष्णूला समर्पित हे मंदिर कंबोडियातील अकोरोम येथे आहे, ज्याला प्राचीन काळी यशोधरपूर म्हटले जायचे.

  जगातील सात आश्चर्य!

  ताजमहाल (आग्रा, भारत)
  ग्रेट वॉल ऑफ चायना (चीन).
  क्राइस्ट द रिडीमर स्टॅच्यू (रिओ डी जानेरो)
  माचू पिचू (पेरू)
  चिचेन इत्झा (युकाटन प्रायद्वीप, मेक्सिको),
  रोमन कोलोसियम (रोम)
  पेट्रा (जॉर्डन)