Canada has been extradited Pakistani citizen Mohammad Shahzeb Khan to US
वॉशिंग्टन: एक मोठी बातमी समोर येत आहे. दहशतवादाच्या कारवायांमध्ये सहभागी असलेल्या एका पाकिस्तानी नागरिकाचे कॅनडातून अमेरिकेत प्रत्यार्पण करण्यात आले आहे. दहशवादविरोधी अमेरकेचे हे मोठे यश मानले जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी (११ जून) कॅनजात राहणारा पाकिस्तानी नागरिक मोहम्मद शाहजेब खान यांचे कॅनडातून प्रर्त्यापर्ण करण्यात आले. त्याच्यावर ISIS ला मदत करणे आणि दहशतवादी कृत्यांच्या आरोप होता.
त्याला अमेरिकेन सुरक्षा अधिकाऱ्यांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. या घटनेने मोठी खळबळ उडाली असून पुन्हा एकदा दहशतवादाला पाठिंबा देणाऱ्या पाकिस्तानचा पर्दाफाश झाला आहे. मोहम्मद शाहजेब खान याने गेल्या वर्षी कॅनडातून न्यूयॉर्कला बेकायदेशीरपणे प्रवास करण्याच आणि ब्रुकलिनमधील एका ज्यू केंद्रात ISIS च्या समर्थनार्थ सामूहिक गोळीबाराची योजना आखली होती.
एफबीआयने दिलेल्या माहितीनुसार, मोहम्मद खान याने गेल्या वर्षी इस्रायलवर हल्ल्याची योजना आखली होती. ही योजना ७ ऑक्टोबर २०२४ रोजी हमासच्या एक वर्षपूर्ण झाल्याच्या निमिमत्ताने आखण्यात आली होती. परंतु एफबीआयला हल्ल्याची पूर्वीच माहिती मिळाली. यामुळे एफबीआय आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या सतर्कने हल्ला रोखण्यात यश आले. खानला ४ सप्टेंबर २०२४ मध्ये कॅनडाच्या अधिकाऱ्यांनी अटक केली होती. त्यानंतर बुधवारी (९ जून) त्याचे अमेरिकेत प्रत्यार्पण करण्यात आले. आता त्याला अमेरिकन न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. लवकरच त्याच्यावर पुढील कारवाई सुरु होईल.
एफबीआय अधिकाऱ्याने सांगतिले की, या प्रकरणामुळे दहशतवाद जगाच्या कानाकोपऱ्यात पसरला असल्यचे लक्षात येते. तसेच अधिकाऱ्यांनी ज्यू समुदायाविरोधात वाढत्या धोक्यांसबंधीही चिंता व्यक्त केली आहे.
Pakistani National Extradited to Face Charges in Connection with Plot to Carry Out ISIS-Inspired Mass Shooting at Jewish Center in New York City https://t.co/63fBHmFVEU @NewYorkFBI pic.twitter.com/ggxV9bK5He
— FBI (@FBI) June 10, 2025
ॲटर्नी जनरल पामेला बोंडी यांनी , ISIS अमेरिकेसाठी मोठा धोका म्हटले आहे. ISIS ही मोठी विदेशी दहशतवादी संघटना आहे. ही संघटना विशेष करुन ज्यू नागरिकांना लक्ष्य करत आहे. यामुळे मोहम्मद खान याचे प्रत्यार्पण अमेरिकेसाठी मोठे यश मानले जात आहे. पामेला यांनी न्याय विभागाला हे प्रत्यार्पण सुरक्षिथ करण्यात मदत केल्याचा अभिमान असल्याचे म्हटसले आहे. तसेच दहशतवादविरोधी काद्याद्याच्या पूर्ण मर्यादेपर्यंत खटला चालवण्याचेही म्हटले आहे.