भारताचे डोळे आता आकाशात! हवाई दलाला मिळणार कोट्यावंधींची स्वदेशी गुप्तचर विमाने (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
नवी दिल्ली: भारताच्या हवाई ताकदीत आणखी वाढ झाली आहे. भारतीय हवाई दलाला लवकरच आय-स्टार (इंटेलिजन्स, सर्वेलन्, चार्गेट ॲक्विझिशन ॲंड रिकॉनिसन्स) नावाचे प्रगत गुप्तचर विमाने मिळणार असल्याची माहिती समोर आली आहे. ही विमाने शत्रूच्या प्रत्येक हालचालंवर नजर ठेवण्यास आणि गजर पडल्यास लक्ष्याला नष्ट करण्याची क्षमता ठेवते. चीन आणि पाकिस्तानकडून वाढता धोका पाहता हे सुरक्षात्मक हे पाभल उचलण्यात आले आहे.
गेल्या काही काळात भारत आणि पाकिस्तानमधील तणाव लक्षणीरित्या वाढला आहे. पाकिस्तानने चीनच्या लढाऊ विमानांच्या मदतीने भारतासमोर आव्हान निर्माण केले आहे. सध्याच्या घडीला पाकिस्तान इस्लामिक देशांना भारताविरोधी करण्याच्या प्रयत्नात देखील आहे.
ही परिस्थिती पाहता भारताच्या हवाऊ ताकदीत वाढ करण्याची , त्याची तपासणी करण्याची आणि गुप्तचर क्षमता मजबूत करण्याची अत्यंत गरज आहे. तसेच चीनसोबत अद्याप सीमावादही सुरुच आहे. पाकिस्तान आणि चीनची वाढती जळीक आणि लष्करी भागीदारी भारतासाठी दुहेरी धोका निर्माण करत आहे.
आय-स्टाक हे विमान उंचावरुन उड्डाण करताना शत्रूच्या जमिनीवरील हालचालींवर लक्ष ठेवण्यास सक्षम आहे. यामुळे हावई दलाला दूरवरुन अचूक हल्ले करण्यास मदत होईल. तसेच शत्रच्या योजना उधळून लावणे सोपे जाईल. यामुळे भारताचे स्टॅंड ऑफ अटॅक रणनीती मजबूत होईल.
अलीकडच्या काळाता भारताने आपली हवाई ताकद मजबूत करण्यास अनेक मोठे करारा केले आहेत. नुकतेच भारताने २६ राफेल नौदल लढाऊ विमानांसाठी ७ अब्ज डॉलर्सचा करार केला आहे. तसेच अमेरिकेसोबत ४७० दशलक्ष डॉलर्सचा MQ-9B ड्रोन करारा केली आहे. याशिवाय ४.६ अब्ज डडलर्सचा स्टेल्थ लढाऊ विमानांच्या खरेदीसाठीही करार केला आहे. भारताने आपत्कालीन संरक्षण खरेदी आणि युद्धकामांना गती दिली आहे.
भारताने राष्ट्रीय सुरक्षेसाठी गुप्तचर यंत्रणेत वाढ करण्याची योजना आखली आहे. यासाठी भारताने तीन गुप्तचर विमाने खरेदी करण्याचा विचार केला आहे. अमेरिकच्या बोईंग आणि कॅनडाच्या बॉम्बबार्डियरशी यासाठी चर्चा देखील सुरु करण्यात आली आहे. अद्याप या कराराला संरत्रण मंत्रालयाकडून मंजुरी मिळली नाही. या आय-स्टार विमानंची किंमत सुमारे १० हजार कोटी रुपये आहे.
या आय-स्टारचे सेन्सर्स भारतात बनवले जाणार आहेत. नंतर विमानांची डिलव्हिरी झाल्यावर त्यांना विमानात बसवण्यात येईल.म्हणजे स्वदेशी मेंदू आणि परदेशी शक्तींचे मिश्रण या आय-स्टारमध्ये असणार आहे. सेंटर फॉर एअरबोर्न सिस्टीम्स अंतर्गत सेन्सर्स विकसित केले जाणार आहे. या प्रणालीची क्षमतचा दूरुवरुन शत्रूचे रडार, मोबाईल एअर डिफेन्स सिस्टीम आणि कमांड शोधण्याची आहे.