canada pm candidate ruby dhalla will deport illegal immigrants
ओटावा: कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी 6 जानेवारी 2025 रोजी आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यांच्या राजीनाम्यानंतर संपूर्ण कॅनडात खळबळ उडाली होती. त्यांनी पक्षनेतेपद सोडल्यानंतर लिबरल पार्टीपुढे आणि कॅनडाकडे देशासाठी दमदार नेतृत्व नव्हते. यामुळे कॅनडाला अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. दरम्यान या कॅनडाच्या पंतप्रधान शर्तीत अनेक भारतीय वंशाची नावे समोर आली. त्यापैकी एक म्हणजे रुबी डल्ला.
कॅनडाच्या पंतप्रधानसाठी इच्छुक असलेल्या भारतीय वंशाच्या नेत्या रुबी डल्ला यांनी सध्या एक गंभीर वक्तव्य केले आहे. त्यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पावलावर पाऊल ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. लिबरल पक्षाच्या पंतप्रधानपदाच्या उमेदवार रुबी डल्ला यांनीआपल्या सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी कॅनडातील बेकायदेशीर स्थलांतरितांना पंतप्रधान झाल्यानंतर देशातून बाहेर काढण्याचे आश्वासन दिले आहे.
As Prime Minister, I will deport illegal immigrants and clamp down on human traffickers.
That’s my promise to you.
En tant que Premiére ministre, je vais expulser les immigrants illégaux et sévir contre les trafiquants d’êtres humains.
C’est ma promesse envers vous. pic.twitter.com/T69pISQlXS
— Ruby Dhalla (@DhallaRuby) January 28, 2025
रुबी डल्ला या स्वत: भारतीय वंशाच्या असून त्यांच्याकडून अशा विधानाची अपेक्षा नव्हती असे म्हटले जात आहे. डल्ला यांनी म्हटले आहे की, “हे माझे तुम्हाला वचन आहे, पंतप्रधान म्हणून मी बेकायदेशीर स्थलांतरितांना देशातून हद्दपार करेन आणि मानवी तस्कीर करणाऱ्यांवर कडक कारवाई करेन,” त्यांच्या या वक्तव्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे.
कोण आहेत रुबी डल्ला?
भारतीय वंशाच्या रुबी डल्ला या 2004 ते 2011 पर्यंत ब्रॅम्प्टन-स्प्रिंगडेल येथे खासदार होत्या. सध्या त्या अधिकृतपणे लिबरल पक्षाचे माजी नेते जस्टिन ट्रुडो यांची जागा घेत आहेत. 2025 मध्ये त्यांच्या पंतप्रधान होण्याची शक्यता असल्याचे तज्ज्ञांनी म्हटले आहे. रुबी डल्ला यांनी कोलंबिया कंझर्व्हेटिव्ह खासदार नीना ग्रेवाल यांच्यासह कॅनडाच्या हाऊस ऑफ कॉमन्समध्ये प्रवेश केला होता. कॅनडाच्या हाऊस ऑफ कॉमन्समध्ये प्रवेश करणाऱ्या त्या पहिल्या शीख महिला होत्या. पंतप्रधान म्हमून त्यांची निवड झाल्या कॅनडाच्या पहिल्या कृष्णवर्णीय महिला पंतप्रधान बनतील.
कॅनडा इतिहास घडवण्याच्या उंबरठ्यावर
सध्या कॅनडाच्या पक्षाच्या नेत्याची निवड करण्यासाठी मतदानाचा पहिला टप्पा पूर्ण झालआ आहे. यादरम्यान डल्ला यांनी सर्वांचे आभार मानले आहे. तसेच डल्ला या लिबरल पक्षाच्या प्रमुख म्हणून पहिल्या कृष्णवर्णीय महिला आणि कॅनडाच्या पुढील पंतप्रधानपदी निवड करून इतिहास घडवण्याच्या मार्गावर आहे. जर दुसऱ्या टप्प्यात डल्ला यांना पाठिंबा कायम राहिला तर लिबरल पक्षातर्फे पंतप्रधानपदासाठी पहिल्या भारतीय वंशाच्या उमेदवार म्हणून निवडणुक लढवतील. मात्र त्यांचे विधान भारतीय वंशाच्या त्यांच्या समर्थनावर परिणाम होऊ शकतो असे तज्ज्ञांचे मत आहे.