रशिया आणि भारताची जवळीक वाढली; पुतिन यांच्या 'या' खास भेटीने डोनाल्ड ट्रम्प चिंतेत? (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
नवी दिल्ली: रशिया आणि भारतामधील वाढत्या मैत्रीवर डोनाल्ड ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली असून आता पुन्हा एकदा ट्रम्प यांचे टेन्शन वाढले आहे. रशियाने भारताला एक अशी मदत केली आहे की, ही मदत अमेरिकेसाठी मोठे टेन्शन असणार आहे. रशियाच्या या मदतीने भारताची समुद्री ताकद वाढली आहे. रशियाने भारताला आधुनिक स्टेल्थ मिसाईल फ्रिगेट, INS तुशील भेट केले आहे. भारत आणि रशियाच्या दृढ मैत्रीचे प्रतिक म्हणून पुतिन यांनी ही भेट दिली आहे.
भेट रशियातून भारतात येण्यासाठी रवाना
मिळालेल्या माहितीनुसार, भारत आणि रशियाच्या दृढ मैत्रीचे प्रतिक म्हणून पुतिन यांनी भारतीय नौदलाला नवीनतम मल्टी-रोल स्टेल्थ-गाइडेड क्षेपणास्त्र फ्रिगेट, INS तुशील भेट म्हणून दिले आहे. ही भेट गेल्या महिन्यात रशियातून भारतात येण्यासाठी रवाना झाले आहे. या युद्धनौकांचे बांधकाम रशियामध्ये करण्यात आले आहे. या युद्धनैकेचे भारतीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत 9 डिसेंबर 2024 ला याचे औपचारिक समारंभपूर्वक समावेशन करण्यात आले होते.
INS तुशीलचा प्रवास
या INS तुशीलमुळे भारताची समुद्री ताकद अधिक बळकट होणार आहे. हे INS तुशील भारतात बाल्टिक समुद्र, उत्तर समुद्र, अटलांटिक महासागर आणि शेवटी हिंद महासागर मार्गे येणार आहे. या दरम्यान अनेक मैत्रीपूर्ण देशांच्या बंदरांना भेटी दिल्या जातील. या प्रवासादरम्यान भारतीय नौदलाच्या राजनैतिक, लष्करी आणि सुरक्षेसंबंधी कार्यांचा मोठा भाग पार पडेल.
17 डिसेंबर 2024 रोजी INS तुशील रशियातून रवाना झाले असून, मार्गात संयुक्त गस्त आणि सागरी भागीदारीचे युद्धसराव विविध नौदलांसोबत करण्यासाठी थांबणार आहे. विशेष करुन समुद्री दरोडेखोरीच्या धोक्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी महत्त्वपूर्ण मोहिमा राबवण्यात येणार आहेत.
INS तुशीलची वैशिष्ट्ये आणि क्षमता
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हे INS तुसील क्रिव्हाक तिसऱ्या वर्गातील प्रकल्प 1135.6 चे आधुनिक युद्धनौकेचे अपग्रेडेड मॉडेल आहे. अशा सहा युद्धनौका भारतीय नौदलाच्या सेवेत आहेत. यामध्ये तीन Talwar-class आणि तीन Teg-class युद्धनौका आहेत. तसेच INS तुशील ही या मालिकेतील सातवी युद्धनौका आहे. ही ऑक्टोबर 2016 मध्ये भारतीय नौदल आणि भारत सरकार यांच्यात झालेल्या करारानुसार तयार करण्यात आली आहे.
या युद्ध नौकेसाठी भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड, ब्रह्मोस एरोस्पेस आणि नोव्हा इंटिग्रेटेड सिस्टम्स यासह 33 कंपन्यांनी योगदान दिले आहे. ही 125 मीटर लांब आणि 3, 900 टन वजनाची युद्धनौका भारतीय आणि रशियन अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे मिश्रण आहे. यामध्ये स्टेल्श वैशिष्ट्ये आणि अधिक स्थिरता प्रदान करणारी सुधारित रचाना आहे. INS तुशील केवळ एक युद्धनौका नसून, भारताच्या वाढत्या सागरी सामर्थ्याचे आणि रशियासोबतच्या मजबूत संरक्षण भागीदारीचे प्रतिक आहे.