Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 6 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Cape Verde Accident : केप वर्देच्या फोगो बेटावर भीषण बस अपघात; २५ जणांचा मृत्यू, अनेक मुले-बालकांचा समावेश

Cape Verde Accident : केप वर्देच्या फोगो बेटावर बस दरीत कोसळून झालेल्या भीषण अपघातात किमान २५ जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये मुले आणि किशोरवयीन विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. सुमारे ३० मीटर खोल दरीत बस कोसळल्याने बचावकार्यही आव्हानात्मक ठरले. अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी तपास सुरू आहे.

  • By Chaitanya Pisal
Updated On: Sep 06, 2026 | 04:42 PM
फोटो सौजन्य सोशल मीडिया

फोटो सौजन्य सोशल मीडिया

Follow Us
Follow Us:
  • ३० मीटर खोल दरीत कोसळली बस
  • विद्यार्थी आणि किशोरवयीन मुलांचा जास्त समावेश
  • मृतांचा आकडा वाढण्याची भीती ;तपास सुरु
Cape Verde Accident : केप वर्देच्या फोगो बेटावर शनिवारी झालेल्या भीषण बस अपघाताने संपूर्ण देश हादरला आहे . प्रवाशांना घेऊन जाणारी बस रस्त्यावरून घसरून सुमारे ३० मीटर खोल दरीत कोसळली . या दुर्घटनेत किमान २५ जणांचा मृत्यू झाला असून . मृतांमध्ये मोठ्या संख्येने मुले आणि किशोर वयीन विद्यार्थ्यांचा समावेश आहे . स्थानिक प्रशासन आणि वृत्तसंस्थांनी मृतांचा आकडा २५ पर्यंत पोहोचल्याची माहिती दिली आहे .

३० मीटर खोल दरीत कोसळली बस

हा अपघात फोगो बेटावरील Cha das Caldeiras आणि Campanas de Cima यांना जोडणाऱ्या डोंगराळ मार्गावर झाला . बस अचानक रस्त्यावरून घसरली आणि सुमारे ३० मीटर खोल दरीत कोसळली . अपघाताची जागा खडकाळ आणि दुर्गम असल्याने बचावकार्याला मोठ्या अडचणींना सामना करावा लागला . घटनास्थळी पोहोचण्यासाठी बचाव पथकांना मोठ्या प्रयत्नांची गरज भासली आहे .

26 लाख फॉलोअर्स, कॉस्मेटिक क्लिनिक अन् 750 किलो ड्रग्ज; ‘मिशन इम्पॉसिबल’ शोची प्रसिद्ध टीव्ही अँकर Sarah Khalifaला फाशीची शिक्षा

विद्यार्थी आणि किशोरवयीन मुलांचा जास्त समावेश

या बसमध्ये प्रामुख्याने तरुण आणि माध्यमिक शाळेतील विद्यार्थी प्रवास करत होते . स्थानिक माहितीनुसार १९ मुले आणि किशोरवयीन जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल झाले होते . त्यापैकी काहींची प्रकृती गंभीर असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले . या प्रवासाचे आयोजन शाळांनी केले न्हवते . चालकाकडून दरवर्षी आयोजित करण्यात येणाऱ्या सहलीचा हा भाग असल्याची माहिती समोर आली आहे .

Russia-Ukraine War: कीव, मॉस्कोचे हल्ले थांबले! पुतिन यांनी घेतली ट्रम्पच्या दूतांची भेट; वॉशिंग्टनला दिला ‘हा’ महत्त्वाचा संदेश

मृतांचा आकडा वाढण्याची भीती ;तपास सुरु

अपघातानंतर जखमींना São Francisco de Assis Regional Hospital येथे दाखल करण्यात आले . काही जखमींची प्रकृती गंभीर असल्याने मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे . अपघात नेमका कोणत्या कारणामुळे झाला , याचा तपास प्रशासनाकडून सुरु आहे .

केप वर्देच्या अधिकाऱ्यांनी या दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त केले असून , बेटावर शोककळा पसरली आहे . एक महत्वाची बाब म्हणजे ही सहल संबंधित शाळांनी आयोजित केली न्हवती . उपलब्ध माहिती नुसार , बसचालक विद्यार्थ्यांसाठी दरवर्षी अशी खाजगी सहल आयोजित करत होता . त्यामुळे अपघातानंतर या प्रवासाच्या व्यवस्थेवरही प्रश्न उपस्थित झाले आहेत .

 

 

Web Title: Cape verde accident horrific bus accident on cape verdes fogo island 25 people killed including many children

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 06, 2026 | 04:42 PM

Topics:  

  • Africa Continent
  • Bus Accident
  • Road Accident

संबंधित बातम्या

Africa Continent: 500 वर्षांनंतर जगाचा नवा नकाशा! आफ्रिका खंड युरोप अन् अमेरिकेपेक्षा मोठा; 164 देशांचा UN मध्ये पाठिंबा
1

Africa Continent: 500 वर्षांनंतर जगाचा नवा नकाशा! आफ्रिका खंड युरोप अन् अमेरिकेपेक्षा मोठा; 164 देशांचा UN मध्ये पाठिंबा

Africa Map Update : आफ्रिकेचा नकाशा बदलणार; UNचा मोठा निर्णय, ‘Equal Earth’ नकाशाला १६४ देशांचा पाठिंबा
2

Africa Map Update : आफ्रिकेचा नकाशा बदलणार; UNचा मोठा निर्णय, ‘Equal Earth’ नकाशाला १६४ देशांचा पाठिंबा

Egypt News : इजिप्तमधील दक्षिण सिनाईमध्ये भीषण रस्ता अपघात; दहाब-नुवैबा रस्त्यावर बस उलटून 16 जणांचा मृत्यू, 28 जखमी
3

Egypt News : इजिप्तमधील दक्षिण सिनाईमध्ये भीषण रस्ता अपघात; दहाब-नुवैबा रस्त्यावर बस उलटून 16 जणांचा मृत्यू, 28 जखमी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.