Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 15 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Afghanistan च्या कंधारमध्ये बस व ट्रकचा भीषण अपघात, पाच ठार, 15 जखमी

Afghanistan : अफगाणिस्तानात मागील काही महिन्यांपासून रस्ते अपघाताच्या संख्येत वाढ झाली असून मृतांचा आकडाही वाढत आहे. नुकताच येथे झालेल्या बस व ट्रकच्या अपघातात 5 जणांना आपले प्राण गमवावे लागले.

  • By Rakesh Khedekar
Updated On: Oct 15, 2026 | 04:50 PM
Afghanistan च्या कंधारमध्ये बस व ट्रकचा भीषण अपघात, पाच ठार, 15 जखमी

Afghanistan च्या कंधारमध्ये बस व ट्रकचा भीषण अपघात, पाच ठार, 15 जखमी

Follow Us
Follow Us:
  • अफगाणिस्तानातील रस्ते सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह
  • मागील महिन्यात असंख्य रस्ते अपघातात
  • अपघातातील मृतांची संख्याही वाढली
 

Afghanistan च्या दक्षिण प्रांत कंधारमध्ये गुरुवारी एक दुर्दैवी रस्ते अपघातात अनेकांना मृत्यूने गाठले. प्रांतीय ट्रॅफीक पोलीस संचालक मोहम्मद ताहिर यांच्या मते, हा अपघात गुरुवारी सकाळी दमन जिल्ह्यात घडला. एक ट्रक समोरून येणाऱ्या बसवर आदळला.

वाहनांच्या समोरा-समोरील टक्करीमुळे 5 जणांचा जागीच मृत्यू झाला, तर 15 जण जखमी झालेत. जखमींपैकी काहींची प्रकृती चिंताजनक आहे.

23 सप्टेंबरलाही झाला होता भीषण अपघात

याअगोदर 23 सप्टेंबरला अफगाणिस्तानच्या उत्तर तखार प्रांतात एका रस्ते अपघातात 8 प्रवाशांना आपला जीव गमवावा लागलेला, तर याच 4 जण जखमी झाले होते. तखार पोलीस प्रवक्ता नकीबुल्लाह मसूर यांनी सांगितले की, कलाफगान जिल्ह्यातील गजेस्तान क्षेत्रात एक वाहन रस्त्यावर घसरून पलटला. यात आठ जणांचा जागीच मृत्यू झाला, तर चौघे जखमी झाले होते.
जखमींना तखार प्रांतातील रुग्णालयात दाखल करण्यात आले. अधिकाऱ्यांनी सांगितले की, या अपघाताच्या कारणांची मिमांशा करण्यात येत आहे.

China Pakistan: ‘पाकिस्तानी मुलींपासून दूर राहा’, चीन सरकारने आपल्या नागरिकांना का दिला इशारा? ‘हे’ आहे मुख्य कारण

20 व 22 सप्टेंबरलाही अपघातांची नोंद

22 सप्टेंबरला पूर्व अफगाणिस्तानच्या लगमान प्रांतातही असाच एक अपघात झाला होता. येथे एक मिनी बस खोल दरीत कोसळल्याने एका प्रवासाचा मृत्यू झाला होता, तर 9 जण जखमी झालेले. येथील पोलीस प्रवक्ता मोहम्मद युनूस युसूफझई म्हणाले की, हा अपघात पदपाख जिल्ह्यात मंगळवारी सकाळा घडला होता. अपघातानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी जखमींना तातडीने प्रांतीय राजधानी मेहतरलामच्या रुग्णालयात दाखल केले.

तसेच 20 सप्टेंबरला पूर्व अफगाणिस्तानच्या नंगरहात प्रांतातील एका अपघातात एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू झालेला. पोलीस प्रवक्ते सैयद तैयब हमद यांच्या माहितीनुसार, बाटी कोट जिल्ह्यात वेगात असलेल्या एका गाडी चालकाने बेजबाबदारपणे गाडी चालवत ती रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर जाऊन आदळली. त्यात गाडीतील इतर चौघांचा जागीच मृत्यू झाला, तर चालक जखमी झाला आहे.

सलग होणाऱ्या या रस्ते अपघातामुळे अफगाणिस्तानातील रस्ते सुरक्षा, वेग मर्यादा आणि बेजबाबदारपणे वाहन चालवण्यासारख्या समस्यां पुन्हा एकदा समोर आल्या आहेत.

Elon Musk: कसा ठेवायचा इलॉन मस्कवर विश्वास? पोलंडपासून युक्रेनपर्यंत युद्धात स्टारलिंकचे इंटरनेट झाले ठप्प; विश्वासार्हतेवर प्रश्न

💡

Frequently Asked Questions

  • Que: अफगाणिस्तानातील कंधार येथे झालेल्या अपघातात किती जणांचा मृत्यू झाला?

    Ans: अफगाणिस्तानच्या कंधार प्रांतातील दमन जिल्ह्यात बस आणि ट्रक यांच्यात झालेल्या समोरासमोरील धडकेत पाच जणांचा मृत्यू झाला, तर १५ जण जखमी झाले.

  • Que: अफगाणिस्तानमध्ये यापूर्वीही रस्ते अपघात झाले होते का?

    Ans: होय. वृत्तानुसार, सप्टेंबरमध्ये तखार, लगमान आणि नंगरहार प्रांतांतही रस्ते अपघात झाले होते. या दुर्घटनांमध्ये अनेकांचा मृत्यू झाला, तर काही जण जखमी झाले.

  • Que: अफगाणिस्तानातील अपघातांमुळे कोणते प्रश्न समोर आले आहेत?

    Ans: सलग घडणाऱ्या अपघातांमुळे रस्ते सुरक्षा, वाहनांचा अतिवेग आणि निष्काळजीपणे वाहन चालवण्याच्या समस्यांकडे लक्ष वेधले गेले आहे.

Web Title: Afghanistan kandahar bus truck accident five dead 15 injured rk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 15, 2026 | 04:50 PM

Topics:  

  • Afghanistan
  • Road Accident
  • Road Safety

संबंधित बातम्या

Masur-Banwadi Phata Road : मसूर-बनवडीफाटा रस्त्याची खड्ड्यांमुळे चाळण; आठ दिवसांत दुरुस्ती करा, शिवसेनेचा इशारा
1

Masur-Banwadi Phata Road : मसूर-बनवडीफाटा रस्त्याची खड्ड्यांमुळे चाळण; आठ दिवसांत दुरुस्ती करा, शिवसेनेचा इशारा

Nagpur News : हेल्मेट डोक्यावर, कानात इअरफोन! ‘म्युझिकल ड्रायव्हिंग’मुळे अपघातांचा धोका वाढला
2

Nagpur News : हेल्मेट डोक्यावर, कानात इअरफोन! ‘म्युझिकल ड्रायव्हिंग’मुळे अपघातांचा धोका वाढला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.