Cattle Smuggler Killed In Retaliatory Firing By BSF in India-Bangladesh border
नवी दिल्ली: एक मोठी बातमी समोर आली आहे. भारत-बांगलादेश सीमेवर बीएसएफचे जवान आणि गायींच्या तस्करांमध्ये गोळीबार झाल्याची घटना समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गायांच्या तस्करीच्या टोळीने गायी चोरण्याच्या उद्देशाने सीमा ओलांडण्याचा प्रयत्न केला. यादरम्यान बीएसएफ चे जवान आणि तस्करांच्यात चकामक झाली. या चकामकी दरम्यान टोळीतील एकाचा मृत्यू झाला असून एक जवान जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.
सीमेवर कडक बंदोबस्त
बीएसएफच्या जवानांनी दिलेल्या माहितीनुसार, जलपाईगुडीतील राजगंज येथील कुकुर्जान खालपारा बीओपीला लागून असलेल्या सीमवेर तारांचे कुंपन तोडून गायींच्या तस्करी करणारा भारताच्या सीमेत घुसण्याचा प्रयत्न करत होता. सीमेवर तैनात असलेल्या बीएसएफ जवानांनी याची चाहूल लागताच त्यांनी त्याला थांबवले. मात्र तस्करांनी अचानक हल्ला करण्यास सुरुवात केली. यावेळी प्रत्युत्तरात्मक बीएसएफच्या जवानांनी त्यांच्यावर हल्ला केली. या गोळीबारात एका बीएसएफचा जवान जखमी झाला असून एका बांगलादेशी गायी तस्कराचा मृत्यू झाला आहे. बाकीचे पळून जाण्यात यशस्वी झाल्याचे म्हटले आहे. या घटनेनंतर बीएसएफ जवानांनी सीमेवर सुरक्षेचा कडक बंदोबस्त केला आहे. तस्कीर करणाऱ्यांकडे धारदार शस्त्रे, दोन तलावारी, एक चाकू आणि एक बनवटी बंदूक होती. गुप्त सुत्रांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे बीएसएफ तस्करांची भारतात घुसखोरी रोखण्यास यशस्वी झाले.
घटनांमध्ये वाढ
भारत-बांगलादेश सीमेवर लष्कर आणि गायींच्या तस्करांमध्ये चकमक होण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही अशा अनेक घटना समोर आल्या आहेत. बांगलादेशी सीमा ओलांडून भारतात येतात आणि गायी चोरण्याचा प्रयत्न करतात. गायींच्या वाढत्या तस्करीमुळे सध्या वातावरण तणावपूर्ण झाले आहे. पोलिस कर्मचाऱ्यांपासून ते सामान्यांपर्यंत अनेकांनीू गायींच्या तस्करीविरुद्ध आवाज उठवले आहेत. मात्र या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. काही दिवसांपूर्वीच पोलिसांनी सीमेवरुन गायी तस्करांना ताब्यात घेतले होते.
भारतातील प्राण्यांच्या तस्करीचे वाढते प्रमाण
मीडिया रिपोर्टनुसार, दरवर्षी 20 लाखाहूंन अधिक प्राण्यांची तस्करी भारतातून होत आहे. भारतातून नदीमार्गे बांगलेशला प्राण्यांना पाठवले जात आहे. वर्षभर बांगलादेशात प्राण्यांची मागणी असते, मात्र इद आणि बकरी इदच्या दरम्यान या मागणीत वाढ होते. मिळालेल्या माहितीनुसार, डिसेंबर 2015 ते एप्रिल 2017 दरम्यान बीएसएफने मुशिदाबादच्या सीमेजवळ जवळपास 20 हजार गायी जप्त केल्या होत्या.