अमेरिकेच्या धमकीनंतरही इराणने नाकारली डोनाल्ड ट्रम्प यांची 'ही' ऑफर; म्हणाला... (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
तेहरान: इराणने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची मोठी ऑफर नाकारली आहे. यामुळे जागतिक स्तरावर खळबळ उडाली आहे. इराणने म्हटले आहे की, जोपर्यंत अमेरिका डोनाल्ड ट्रम्प यांच्या नेतृत्वाखालील इराणवरील दबाव आणि धोरणे हटवणार नाही तोपर्यंत आम्ही कोणतीही चर्चा करण्यास तयार होणार नाही. मिळालेल्या माहितीनुसार, डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला पत्र पाठवले होते. या पत्रात त्यांनी इराणच्या अणु प्रकल्पांवर वाटाघाटी करण्यास चर्चा करावी, त्यानंतर अमेरिका इराणवरील लष्करी हल्ले थांबवले असे त्यांनी म्हटले होते. मात्र इराणने या ऑफरला नकार देत आम्हाला कोणतीही चर्चा करायची नाही असे म्हटले आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांचे पत्र
डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे की, “मी इराणला पत्र पाठवले आहे, मला आशा आहे की इराण वाटाघाटी करण्यास तयार होईल नाहीतर आम्हाला लष्करी कारवाई करावी लागेल आणि हे इराणला खूप महागात पडेल. ट्रम्प यांनी हे विधान वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत केले आहे.
इराणची प्रतिक्रिया
दरम्यान ट्रम्प यांच्या या वक्तव्यावर इकाणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी म्हटले की, सध्या त्यांचा देशा व्यापर कृती आराखडाच्या इतर सदस्यांशी चर्चा करत आहे. मात्र, डोनाल्ड ट्रम्प यांचा दबाव राहिल्यास इराण अइमेरिकेशी थेट कोणतीही चर्चा करणार नाही. काही दिवसांपूर्वी अमेरिकेने इराणच्या कच्चा तेलाच्या उत्पादनांवर निर्बंध लागू केले होते, इराणच्या कठोर धोरणांविरुद्ध आणि अणु प्रकल्पांवर आळा घालण्यासाठी ट्रम्प यांनी हा निर्णय घेतला होता. मात्र परत एकदा इराणने अमेरिकेची ऑफर नाकारल्याने डोनाल्ड ट्रम्प भडकण्याची शक्यता आहे.
JCPOA आणि युरोपीय देशांशी इराणची चर्चा सुरु
इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी, “आम्ही थेट अमेरिकेशी चर्चा करणार नाही, मात्र रशिया आणि चीन या युरोपीय देशांशी संपर्क ठेवू. मला विश्वास आहे की, या मार्गाने आम्ही एका निर्णयावर पोहोचू शकतो.” सध्या अमेरिकन सरकार इराणवर दबाव आणक आहे, मात्र आम्ही यापुढे झुकणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
इस्त्रायलच्या धमक्यांना प्रत्युत्तर
अमेरिकेशिवाय इस्त्रायलने देखील इराणला नष्ट करण्याची धमकी दिली होती. यावर प्रत्युत्तर देत अब्बास यांनी इस्त्रायल काहीही करु शकणार नाही. इराणच्या अणु प्रकल्पांना सहज नष्ट करता येणार नाही असे अब्बास यांनी म्हटले आहे. तसेच इस्त्रायलला इराणच्या लष्करी ताकदीची जाणीव आहेच.
इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी इस्त्रायलच्या योजनांबाबत इशारा दिला आहे की, त्यांनी इराणवर हल्ला केल्यास संपूर्ण प्रदेशात युद्ध भडकू शकते. इस्त्रायलची योजना अमेरिकाला या युद्धात ओढण्याची आहे आणि असे झाल्यास अमेरिकेची स्थिती अत्यंत कमकुवत होईल.