Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 21 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

दिलासादायक ! इस्त्रायल-लेबनॉन यांच्यातही अखेर युद्धविराम; दोन्ही देशांत 10 दिवसांच्या शस्त्रसंधीवर सहमती

इस्रायल आणि लेबनॉन यांच्यात शस्त्रसंधीवर सहमती झाली आहे, ज्याचे शांततेच्या दिशेने एक मोठे पाऊल म्हणून स्वागत केले जात आहे. मात्र, या करारामध्ये संपूर्ण लेबनॉनचा समावेश असावा, असा हिजबुल्लाहने आग्रह धरला आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Apr 17, 2026 | 07:11 AM
दिलासादायक ! इस्त्रायल-लेबनॉन यांच्यातही अखेर युद्धविराम; दोन्ही देशांत 10 दिवसांच्या शस्त्रसंधीवर सहमती

दिलासादायक ! इस्त्रायल-लेबनॉन यांच्यातही अखेर युद्धविराम; दोन्ही देशांत 10 दिवसांच्या शस्त्रसंधीवर सहमती

Follow Us
Follow Us:

यरूशलेम : गेल्या अनेक दिवसांपासून जागतिक स्तरावर अनेक महत्त्वाच्या घडामोडी घडत आहेत. अमेरिका आणि इस्त्रायल या दोन्ही देशांकडून इराणवर हल्ला केला जात आहे. तर दुसरीकडे इस्त्रायल आणि लेबनॉन या दोन्ही देशांतही युद्ध सुरु होते. असे असताना आता दिलासादायक बातमी समोर आली आहे. इस्त्रायल-लेबनॉन यांच्यातही अखेर युद्धविराम झाला असून, दोन्ही देशांत 10 दिवसांच्या शस्त्रसंधीवर सहमती झाला असल्याची माहिती दिली जात आहे.

इस्रायल आणि लेबनॉन यांच्यात शस्त्रसंधीवर सहमती झाली आहे, ज्याचे शांततेच्या दिशेने एक मोठे पाऊल म्हणून स्वागत केले जात आहे. मात्र, या करारामध्ये संपूर्ण लेबनॉनचा समावेश असावा, असा हिजबुल्लाहने आग्रह धरला आहे. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी गुरुवारी सांगितले की, त्यांनी लेबनॉनमध्ये १० दिवसांच्या शस्त्रसंधीला सहमती दर्शवली आहे. लेबनॉनसोबत शांततेच्या प्रयत्नांना चालना देण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. या आठवड्यात, शांतता कराराचा मसुदा तयार करण्याच्या उद्देशाने इस्रायल आणि लेबनॉनने वॉशिंग्टनमध्ये थेट चर्चा केली.

दरम्यान, गेल्या सहा आठवड्यांपासून इस्रायलसोबत युद्ध करणाऱ्या हिजबुल्लाहने या चर्चेला विरोध केला आहे. असे असले तरीही नेतन्याहू यांनी लेबनॉनसोबत एक ऐतिहासिक शांतता करार करण्याची संधी मिळाली आहे, असे म्हटले आहे.

हिजबुल्लाहकडून निवदेनही जारी

हिजबुल्लाहने एका निवेदनात म्हटले आहे की, कोणतीही शस्त्रसंधी संपूर्ण लेबनॉनला लागू झाली पाहिजे. इस्रायली शत्रूंना हालचाल करण्याचे कोणतेही स्वातंत्र्य दिले जाऊ नये. संघटनेने पुढे म्हटले आहे की, इस्रायलने आमच्या भूमीवर केलेल्या ताब्यामुळे लेबनॉन आणि तेथील लोकांना त्याचा प्रतिकार करण्याचा हक्क मिळतो. हा मुद्दा भविष्यातील घटनांवर आधारित ठरवला जाईल. या भूमिकेमुळे शस्त्रसंधीमध्ये गुंतागुंत निर्माण होऊ शकते. त्यामुळे निर्णय योग्य पद्धतीने घेतला जावा, ही आमची भूमिका आहे.

इस्त्रायलने सैन्य आता मागे घ्यावे 

इस्रायलने दक्षिण लेबनॉनमध्ये जमिनीवरील आक्रमण सुरू केले आहे, जिथे सीमावर्ती भागात त्यांच्या सैन्यात आणि हिजबुल्लाहच्या सैन्यात भीषण लढाई सुरू आहे. दरम्यान, युद्धविरामाचा भाग म्हणून इस्रायल आपले काही किंवा सर्व सैन्य मागे घेईल की नाही, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

हेदेखील वाचा : अमेरिका-इराणमधील चर्चा ठरल्या निष्फळ, तणाव वाढला; होर्मुझ नाकेबंदीचा सर्वांना बसणार फटका

Web Title: Ceasefire finally done between israel and lebanon

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 17, 2026 | 07:00 AM

Topics:  

  • benjamin netanyahu
  • international news
  • Israel and Lebanon War

संबंधित बातम्या

Israel Election: ‘लक्ष अमेरिकेवर, इस्रायलवर नाही’ उपराष्ट्रपती JD Vance यांचा नेतान्याहूंना पाठिंबा देणास नकार; ट्रम्प सोबत मतभेद
1

Israel Election: ‘लक्ष अमेरिकेवर, इस्रायलवर नाही’ उपराष्ट्रपती JD Vance यांचा नेतान्याहूंना पाठिंबा देणास नकार; ट्रम्प सोबत मतभेद

World Politics: ट्रम्प यांचा जागतिक राजकारणात नवा खेळ; चारपैकी 3 देशांत केला सत्तापालट, आता इस्त्रायलमध्ये काय होणार?
2

World Politics: ट्रम्प यांचा जागतिक राजकारणात नवा खेळ; चारपैकी 3 देशांत केला सत्तापालट, आता इस्त्रायलमध्ये काय होणार?

US-Israel : ‘अमेरिकेवर आंधळा विश्वास नको’; इस्रायलमधील निवडणुकांपूर्वी नेतान्याहूंचे मोठे विधान, म्हटले, ‘भारतासोबतची मैत्री…’
3

US-Israel : ‘अमेरिकेवर आंधळा विश्वास नको’; इस्रायलमधील निवडणुकांपूर्वी नेतान्याहूंचे मोठे विधान, म्हटले, ‘भारतासोबतची मैत्री…’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.