Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 14 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Israel-Palestine News : वसाहतींचा विस्तार, घरांवर बुलडोझर; तरीही पॅलेस्टिनींचा निवडणुकीत आवाज नाही!

Israel-Palestine News : इस्रायलमध्ये २७ ऑक्टोबरला होणाऱ्या निवडणुकीत वेस्ट बँकमधील बहुतांश पॅलेस्टिनी नागरिकांना मतदानाचा अधिकार नाही. मात्र, इस्रायलचे निर्णय त्यांच्या जीवनावर थेट परिणाम करत आहेत. वसाहतींचा विस्तार, घरांची पाडकामे आणि हालचालींवरील निर्बंधांमुळे पॅलेस्टिनी नागरिकांमध्ये नाराजी वाढत आहे.

  • By Chaitanya Pisal
Updated On: Oct 14, 2026 | 04:17 PM
फोटो सौजन्य सोशल मीडिया

फोटो सौजन्य सोशल मीडिया

Follow Us
Follow Us:
  • वेस्ट बँकमधील लोकांचे म्हणणे काय
  • वसाहतींच्या विस्तारामध्ये विस्थापनाचा धोका
  • सरकार बदलले तरी परिस्थिती बदलणार का
Israel-Palestine News : इस्रायल हमास संघर्षामुळे वेस्ट बँकमधील सामान्य नागरिकांचे जगणे मुश्किल होऊन बसले आहे . इस्रायली सैनिक आणि वसाहतवादी इस्रायली यांच्या दडपशाहीचे प्रकार दिवसेंदिवस वाढत चालले आहेत . यामुळे वेस्ट बँकमधील पॅलेस्टिनी नागरिकांमध्ये उपेक्षेची भावना तीव्र होत आहे .

इस्रायलच्या वसाहतींचा विस्तार , पॅलेस्टिनींची घरे पाडणे , शेतीवर अतिक्रमण करणे तसेच त्यांना त्यांच्या दैनंदिन हालचालींमध्ये व्यत्यय आणून त्यांना त्रास देणे या सगळ्यामुळे तेथील नागरिकांचे जीवन अजूनच कठीण बनले आहे . यासगळ्यानंतर मात्र २७ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या निवडणुकीत आपल्याला कोणतेही प्रतिनिधित्व किंवा प्रभावी राजकीय स्थान नसल्याची खंत या नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे .

Nobel Prize: नोबेल शांतता पुरस्काराचे सर्वात तरुण मानकरी मार्टिन ल्यूथर किंग ज्युनियर; वाचा त्यांच्या संघर्षाची रंजक गोष्ट

वेस्ट बँकमधील लोकांचे म्हणणे काय

वेस्ट बँकमधील जाबल अल बाबा या बेदुईन समुदायातील नागरिकांच्या मते , इस्रायली प्रशासन त्यांच्या दैनंदिन जीवनातील जवळपास प्रत्येक गोष्टीवर नियंत्रण ठेवायला लागले आहे . घर बांधणे , पाण्याची उपलब्धता , रस्त्यांचा वापर, शेती वरील आक्रमण तसेच एका शहरातून दुसऱ्या शहरात जाणे येणे यावरसुद्धा त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे .

या भागातील लोकांचे म्हणणे आहे कि इस्रायलच्या या अशा अमानवी धोरणांमुळे आमचे जीवन आणि भविष्य यावर नकारात्मक परिणाम होणार आहे .मात्र सरकार निवडण्याच्या प्रक्रियेत मात्र त्यांना सहभागी होता येत नाही . दुसरीकडे वेस्ट बँकमधील इस्रायली वसाहतींमध्ये राहणाऱ्या ज्यू नागरिकांना इस्रायलच्या राष्ट्रीय निवडणुकीत मतदानाचा अधिकार आहे . यासगळ्यामुळे या दोन्ही समुदायामधील राजकीय अधिकारांचा फरक अधिक ठळकपणे समोर येत आहे .

Marco Rubio India Visit: अमेरिकेचे परराष्ट्र सचिव 6 महिन्यांत दुसऱ्यांदा भारतात; मुंबई अन् जामनगर दौऱ्यामागचे मोठे कारण काय?

वसाहतींच्या विस्तारामध्ये विस्थापनाचा धोका

वेस्ट बँकमध्ये इस्रायली वसाहतींचा विस्तार हा पॅलेस्टिनी नागरिकांसाठी मोठा चिंतेचा विषय बनला आहे . खासकरून जेरुसलेम जवळील E १ प्रकल्पामुळे अनेक बेदूईन समुदायांना विस्थापनाचा धोका निर्माण झाला आहे . या प्रकल्पामुळे वेस्ट बँकेचा भौगोलिक संपर्क ही विस्कळीत होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे .

पॅलेस्टिनी नागरिकांना घर बांधण्यासाठी परवानगी मिळवणे अत्यंत कठीण असल्याचा आरोप केला जातो . परवानगी नसल्याचा कारणावरून अनेक घरांवर कारवाई केली जाते . मात्र त्याच परिसरात इस्रायली वसाहतींच्या बांधकामाला प्रोत्साहन दिले जात असल्याचा विरोधाभासही नागरिकांकडून मांडला जात आहे .

सरकार बदलले तरी परिस्थिती बदलणार का

२७ ऑक्टोबरच्या निवडणुकीत इस्रायलमध्ये कोणाचे सरकार येणार , याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे . मात्र पॅलेस्टिनी नागरिकांना निवडणुकीच्या निकालातून आपल्या परिस्थितीत फारसा बदल होईल ,अशी अपेक्षा नाही . इस्रायलमधील सत्ताधारी आणि विरोधी पक्षांच्या धोरणांमध्ये वसाहतींच्या मुद्द्यावर फारसा मूलभूत फरक नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे . त्यामुळे इस्रायली आगामी निवडणुकीत पॅलेस्टिनींसाठी आशेचा किरण ठरणार कि त्यांची राजकीय उपेक्षा कायम राहणार .

💡

Frequently Asked Questions

  • Que: वेस्ट बँकमधील पॅलेस्टिनी नागरिकांची नाराजी का आहे ?

    Ans: इस्रायलच्या वसाहतींचा विस्तार , घरांची पाडकामे आणि हालचालींवरील निर्बंधामुळे पॅलेस्टिनी नागरिक त्रस्त आहेत . त्यांच्या जीवनावर परिणाम करणाऱ्या निर्णयांमध्ये त्यांचा आवाज नाही .

  • Que: २७ ऑक्टोबरच्या निवडणुकीत पॅलेस्टिनी नागरिकांची भूमिका काय आहे .

    Ans: वेस्ट बँकमधील पॅलेस्टानी नागरिकांना इस्रायलच्या राष्ट्रीय निवडणुकीत मतदानाचा अधिकार नाही . त्यामुळे इस्रायलचे सरकार निवडण्याचा प्रक्रियेत त्यांना सहभागी होता येत नाही .

Web Title: Israel palestine news settlement expansion bulldozing of homesyet palestinians have no voice in the electionscp

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 14, 2026 | 04:17 PM

Topics:  

  • israel-palestine war
  • Marathi News
  • World news

संबंधित बातम्या

Strait of Hormuz: ‘युद्धनौका होर्मुझच्या सामुद्रधुनीजवळ आल्या तर…’ इराणचा अमेरिकेला थेट इशारा; 5 घातक शस्त्रांसह लष्कर सज्ज
1

Strait of Hormuz: ‘युद्धनौका होर्मुझच्या सामुद्रधुनीजवळ आल्या तर…’ इराणचा अमेरिकेला थेट इशारा; 5 घातक शस्त्रांसह लष्कर सज्ज

च्युइंग गम मिठाई नाही! गुजरात हायकोर्टाचा मोठा निर्णय, १२.५% व्हॅट आकारणीचा निर्णय कायम
2

च्युइंग गम मिठाई नाही! गुजरात हायकोर्टाचा मोठा निर्णय, १२.५% व्हॅट आकारणीचा निर्णय कायम

Nobel Prize: नोबेल शांतता पुरस्काराचे सर्वात तरुण मानकरी मार्टिन ल्यूथर किंग ज्युनियर; वाचा त्यांच्या संघर्षाची रंजक गोष्ट
3

Nobel Prize: नोबेल शांतता पुरस्काराचे सर्वात तरुण मानकरी मार्टिन ल्यूथर किंग ज्युनियर; वाचा त्यांच्या संघर्षाची रंजक गोष्ट

Chandrapur News: मोबाईल-इंटरनेटचा अभाव, तरी व्हिडिओ दाखवण्याची सक्ती; चंद्रपुरात मुख्याध्यापकांना नोटिसा बजावल्याने संघटना नाराज
4

Chandrapur News: मोबाईल-इंटरनेटचा अभाव, तरी व्हिडिओ दाखवण्याची सक्ती; चंद्रपुरात मुख्याध्यापकांना नोटिसा बजावल्याने संघटना नाराज

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.