Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 11 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

China floods: चीनमध्ये अस्मानी संकट! सर्प फार्मची भिंत कोसळली; 900 विषारी साप पुराच्या पाण्यात वाहून आल्याचा VIDEO VIRAL

China Flood Snakes: चीनमधील ग्वांग्शी प्रांतात आलेल्या पुरामुळे शेताची भिंत कोसळली आणि त्यातून ९०० विषारी साप रस्त्यावर फेकले गेले. या भीषण दृश्यामुळे लोकांमध्ये मोठ्या प्रमाणावर घबराट पसरली आहे.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Jul 11, 2026 | 01:26 PM
china floods snakes escaped guangxi farm collapse typhoon maysak submerged cities casualties

china floods snakes escaped guangxi farm collapse typhoon maysak submerged cities casualties

Follow Us
Follow Us:
  • ९०० सापांचा थरार
  • नागरिकांमध्ये दहशत आणि मृत्यू
  • चक्रीवादळ आणि पुराचे थैमान

Guangxi snake farm wall collapse flood 2026 : निसर्गाचा कोप किती भयंकर असू शकतो, याचा प्रत्यय सध्या चीनमधील नागरिकांना येत आहे. चीनमध्ये (China) आलेल्या प्रलयंकारी पुरामुळे आधीच जनजीवन विस्कळीत झाले असताना, आता एका अत्यंत धक्कादायक आणि भीतीदायक घटनेने लोकांची झोप उडवली आहे. चीनच्या ग्वांग्शी प्रांतात (Guangxi Province) मुसळधार पाऊस आणि पुरामुळे एका मोठ्या सर्प प्रजनन केंद्राची (Snake Farm) भिंत पत्त्यांसारखी कोसळली. या भिंतीच्या ढिगाऱ्यातून तब्बल ९०० साप एकाच वेळी बाहेर पडले आणि थेट निवासी भागातील पुराच्या पाण्यात फेकले गेले. या सापांमध्ये अनेक अत्यंत विषारी नागांचा (Venomous Snakes) समावेश असल्याने संपूर्ण परिसरात कमालीचे दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

ग्वांग्शी प्रांताला चीनमधील एक प्रमुख आणि सर्वात मोठे सर्प प्रजनन केंद्र मानले जाते. या भागात पारंपारिक चिनी औषधे, महागड्या चामड्याच्या वस्तू आणि इतर उत्पादनांसाठी वेगवेगळ्या शेतांवर आणि फार्म्समध्ये अंदाजे ३० दशलक्ष (३ कोटी) सरपटणारे प्राणी पाळले जातात. मात्र, मायसॅक चक्रीवादळामुळे (Typhoon Maysak) झालेल्या ढगफुटीसदृश पावसामुळे या भागातील एका स्थानिक धरणाला तडा गेला आणि त्याच्या पाण्याच्या प्रचंड प्रवाहाने या सर्प शेताची भिंत पाडली. भिंत तुटताच आत असलेले शेकडो साप पाण्याच्या तीव्र प्रवाहाबरोबर आजूबाजूच्या गावांमध्ये आणि शहरांमधील रस्त्यांवर पसरले.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Uranium Price: सोन्यापेक्षा महाग असणारे युरेनियम ऑस्ट्रेलिया कोणत्या देशांना विकतो? नुकताच भारताशी झालाय मोठा करार

कमरेपर्यंतच्या पाण्यात सापांचा वेढा; थरकाप उडवणारा व्हिडिओ व्हायरल

सोशल मीडिया आणि जागतिक वृत्तवाहिन्यांवर (उदा. मॉस्को न्यूज) सध्या या घटनेचा एक अत्यंत भीतीदायक व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये सापांचा एक मोठा कळप पाण्याच्या जोरदार प्रवाहाबरोबर मानवी वस्त्यांकडे पोहत जाताना स्पष्ट दिसत आहे. स्थानिक लोक स्वतःचा जीव वाचवण्यासाठी कमरेपर्यंतच्या गढूळ पाण्यात हातात लांब काठ्या घेऊन उभे आहेत. पुराचे पाणी घरांमध्ये शिरल्यामुळे हे साप आता थेट लोकांच्या घरात, छतांवर आणि झाडांवर आश्रय घेत आहेत. हांगझोऊ (Hangzhou) शहरातून आलेल्या एका अत्यंत वेदनादायक बातमीनुसार, पुराच्या पाण्यात अचानक झालेल्या सर्पदंशामुळे एका महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे, ज्यामुळे प्रशासकीय यंत्रणा अधिकच सतर्क झाली आहे.

انهيار سد في الصين يتسبب بفرار 900 ثعبان من مزرعة والسلطات تحذر المواطنين بعد تسرب أفاعٍ سامة منها الكوبرا إلى المناطق المحيطة. pic.twitter.com/XKwMhIKM0t — موسكو | 🇷🇺 MOSCOW NEWS (@M0SC0W0) July 10, 2026

credit – social media and Twitter

या अनपेक्षित संकटाचा सामना करण्यासाठी आणि सापांना पुन्हा पकडण्यासाठी चीनच्या स्थानिक प्रशासनाने युद्धपातळीवर मोठे प्रयत्न सुरू केले आहेत. ग्राम अधिकारी वू झी (Wu Xi) यांनी दिलेल्या माहितीनुसार, सुदैवाने पळून गेलेल्या सापांपैकी बहुतांश साप हे बिनविषारी प्रजातींचे आहेत. मात्र, तरीही धोका टाळण्यासाठी मासेमारीची मजबूत जाळी, विषरोधक औषधे आणि ‘स्टन गन’ (Stun Guns) ने सज्ज असलेल्या १० तज्ज्ञ सर्पमित्रांचे आणि जवानांचे एक विशेष हायटेक पथक तयार करण्यात आले आहे. हे पथक बोटींच्या साहाय्याने गल्लीबोळांत फिरून सापांचा शोध घेत आहे. गावकऱ्यांना कोणत्याही सापाला स्वतःच्या हाताने हाताळू नये किंवा त्यांच्या जवळ जाऊ नये, असा कडक इशारा देण्यात आला आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : PM Modi: ऑस्ट्रेलियन महिला कॅमेरामनच्या ‘अशा’ इशाऱ्याने पंतप्रधान मोदींनाही लावले मागे वळायला; ‘या’ मजेदार प्रसंगाचा VIDEO VIRAL

६२ नद्यांनी ओलांडली धोक्याची पातळी; २० जणांचा मृत्यू

चीनमधील केंद्रीय हवामान खात्याने आणि आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांनी दिलेल्या अधिकृत आकडेवारीनुसार, परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. मुसळधार पावसामुळे देशातील तब्बल ६२ प्रमुख नद्यांमधील पाण्याची पातळी पुराच्या धोक्याची पातळी ओलांडून वाहत आहे. पूर्व हुबेई प्रांतात आलेल्या भीषण वादळामुळे, ढगफुटीमुळे आणि सोसाट्याच्या वाऱ्यामुळे ११ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, अनेक जण अद्याप बेपत्ता आहेत. सापांचा प्रादुर्भाव आणि पुराशी संबंधित वेगवेगळ्या दुर्घटनांमध्ये देशात आतापर्यंत एकूण २० हून अधिक लोकांनी आपले प्राण गमावले आहेत.

‘मायसॅक’ चक्रीवादळाच्या (Typhoon) या विनाशकारी स्वरूपामुळे चीनमधील ९३,३०० हून अधिक नागरिकांना याचा थेट आणि गंभीर फटका बसला आहे. शेकडो एकर शेती पाण्याखाली गेली असून मोठी आर्थिक हानी झाली आहे. सुरक्षेचा उपाय म्हणून प्रशासनाने ५४,४६० हून अधिक लोकांना तातडीने त्यांच्या घरातून बाहेर काढून सुरक्षित छावण्यांमध्ये हलवले आहे. या आधीच गंभीर असलेल्या नैसर्गिक आपत्तीत, पाण्यात मुक्तपणे पोहणारे आणि घराघरांत शिरणारे हे धोकादायक साप स्थानिक लोकांच्या शारीरिक आणि मानसिक त्रासात आणखी भयानक भर घालत आहेत.

Web Title: China floods snakes escaped guangxi farm collapse typhoon maysak submerged cities casualties

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 11, 2026 | 01:26 PM

Topics:  

  • China
  • snake viral video
  • Video Viral

संबंधित बातम्या

30 सेकंदात 195 वेळा Kiss… ब्राझीलच्या कपलला खतरनाक रेकाॅर्ड, गिनीज वर्ल्ड बुकमध्ये झाली नोंद; Video Viral
1

30 सेकंदात 195 वेळा Kiss… ब्राझीलच्या कपलला खतरनाक रेकाॅर्ड, गिनीज वर्ल्ड बुकमध्ये झाली नोंद; Video Viral

Taarak Mehta शोच्या सेटवर तोडफोड? गोकुलधाम सोसायटीचा व्हिडीओ पाहताच प्रेक्षकांची धडधड वाढली… अखेर निर्मात्यांनी सत्य सांगितलंच
2

Taarak Mehta शोच्या सेटवर तोडफोड? गोकुलधाम सोसायटीचा व्हिडीओ पाहताच प्रेक्षकांची धडधड वाढली… अखेर निर्मात्यांनी सत्य सांगितलंच

अजब-गजब! अंगठी खरेदी करायला गेला अन् 40 लाखांची डायमंड रिंग गिळून आला, पुढे जे घडलं… Video Viral
3

अजब-गजब! अंगठी खरेदी करायला गेला अन् 40 लाखांची डायमंड रिंग गिळून आला, पुढे जे घडलं… Video Viral

अपना बना ल ना पूरा राजा…! शाळेच्या टीव्हीवर अश्लील गाणं लावून मुख्याध्यापक बेधुंद होऊन झोपला, सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाले दृष्य
4

अपना बना ल ना पूरा राजा…! शाळेच्या टीव्हीवर अश्लील गाणं लावून मुख्याध्यापक बेधुंद होऊन झोपला, सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाले दृष्य

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.